चतुःश्लोकी भागवत - श्लोक ४३

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


तुष्टं निशाम्य पितरं लोकानां प्रपितामहम् ॥ देवर्षिः परिपप्रच्छभवा न्यन्माऽनुपृच्छति ॥४३॥

॥ टीका ॥
देखोनी नारदाची पूर्ण भक्ती ॥ जाणोनी उत्तमोत्तमस्थिती ॥ स्वानंदें तुष्टला प्रजापती ॥ कृपामूर्ति निजबोधें ॥९३॥
नारदासी तुष्टला पिता ॥ जो सकळ जयाचा प्रपिता ॥ पूर्ण देखोनि प्रसन्नता ॥ जाहला विनविता सप्रेमभावें ॥९४॥
तूं नातळोनि मायामोहासी ॥ निजात्मबोधें विश्व सृजिसी ॥ तुज प्रसन्न झाला हृषीकेशी ॥ तो प्रसाद आह्मासी कृपेनें दीजें ॥७९५॥
ऐसें बोलतां चालिलें स्फुंदन ॥ अश्रुपूर्ण झाले नयन ॥ रोमांचित कंपायमान ॥ सर्वांगीं स्वेदकण टवटविन्नले ॥९६॥
हर्षें बाष्प दाटलें कंठीं ॥ पुढारीं न बोलवे गोष्टी ॥ ते देखोनियां निजदृष्टी ॥ स्रष्टा निजपोटीं निवाला थोर ॥९७॥
यासी पूर्ण ब्रह्म बोधितां ॥ वचनें पावेल परमार्था ॥ होय अधिकारी पुरता ॥ ऐसें विधाता जाणोंसरला ॥९८॥
मग नारदासी आपण ॥ सद्भावें दिधलें आलिंगन ॥ पुत्रासुखें निवाला पूर्ण ॥ अधिकारी रत्न परमार्थीं ॥९९॥
ऐक राया परीक्षिती ॥ जें तुवां पुसिलें मजप्रती ॥ तेंचि नारदें प्रजापती ॥ निजज्ञानार्थीं पुसियेलें ॥८००॥


References : N/A
Last Updated : August 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP