चतुःश्लोकी भागवत - श्लोक १०

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


॥ श्लोक ॥
प्रवर्तते यत्र रजस्त मस्तयोः सत्वं च मिश्रं न च कालविक्रमः ॥ न यत्र माया किमुतापरे हरेरनुव्रता यत्र सुरासुरार्चिताः ॥१०॥

N/A॥ टीका ॥
ज्या लोकाची निजस्थिती ॥ शुद्धसत्वजन वर्तती ॥ रजतममिश्रित गती ॥ ज्या लोकाप्रती असेना ॥६९॥
नवल ते लोकींचा ठसा ॥ बाल्यतारुन्यवृद्धदशा ॥ नाहीं तेथें तिन्ही वयसा ॥ क्षय आहे कैसा हें नेणिजे ॥१७०॥
तेथें समूळ माया नाहीं ॥ मांकलिविक्रम कैंचा ते ठायीं ॥ मोहलोभादिद्वेष पाही ॥ मायेच्याठाईं वर्तती ॥७१॥
उगमीं वाकडी लागे नेटें ॥ तेणें नदनदीपूर लोटे ॥ तेंवीं माया विषयसंघट्टें ॥ चढणी नेटेंपाटें मोहादिदशा ॥७२॥
जेथें उगम नाहीं मायेचा ॥ तेथें रागदशे ठाव कैंचा ॥ परमानंदें पूर्ण साचा ॥ हरिप्रियांचा समूह नांदे ॥७३॥
भक्तिप्रतापें जे आथिले ॥ यालागीं ते देवदैत्यीं पूजिले ॥ मायामोहातीत जाहले ॥ अढळ बैसले वैकुंठीं ॥७४॥
देवाची माया ऋद्धिसिद्धी ॥ दैत्यांची माया विघ्नें बाधी ॥ भक्त नढळतीच दृढबुद्धी ॥ जिणोनी उपाधि पूज्य झाले ॥१७५॥
शोधिती सत्त्व अतिसात्विकें ॥ जे हरिभक्त हरिप्रेमाधिकें ॥ जे झाले श्रीहरिसारिखे ॥ त्यांचें स्वरूप सुखें शुक सांगे ॥७६॥


References : N/A
Last Updated : July 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP