अदान्तस्याविनीतस्य वृथा पण्डितमानिनः । न गुणाय भवन्ति स्म नटस्येवाजितात्मनः ॥२६॥

दमन नाहीं इन्द्रियांतें । म्हणोनि अदान्त म्हणिजे यातें । अविनीत म्हणोनि औद्धत्यें । वर्ते श्रेष्ठांतें न गणूनी ॥१९०॥
ऐसिया अदान्ता अविनीतांची । वृथापाण्डित्यगर्वितांची । विद्यायोग्यता विफळ त्यांची । दुर्गुणांची ऋद्धि फळे ॥९१॥
अंत्यजें घेतला द्विजविंडब । तेथ कें सदाचाराचा वाढे कोंभ । अनाचाराचें थांवे थोंब । बाह्य दंभ लसलसित ॥९२॥
मनोजय़ केला नसतां । विद्या न होती सद्गुणफळीता । या लागिं अजितात्मकां या दृप्तां । वध तत्त्वता योग्य असे ॥९३॥
सर्पें केलें जें पयःपान । परिणमे काळकूट होऊन । पावक पूजिला इन्धनें करून । परि तो क्षोभून प्रज्वळे ॥९४॥
अजितात्मका अदान्ता अविनीता । बहुधा वेदशास्त्रीं ही योग्यता । परि ते नोहे सद्गुणभरिता । देहाहंतावैगुण्यें ॥१९५॥
ऐसियांचा देहाभिमान । समूळ झाडावया लागून । इतुक्याच अर्थाचें कारण । मज संपूर्ण इहलोकीं ॥९६॥

एतदर्थो हि लोकेस्मिन्नवतारो मय कृतः । वध्या मे धर्मध्वजिनस्ते हि पातकिनोऽधिकाः ॥२७॥

इतुक्याचि अर्थाचिया काजें । येथ अवतार धरणें माझें । अधर्मनिष्ठ धार्मिकव्याजें । त्यां म्यां वधिजे पापिष्ठां ॥९७॥
स्मृतिशास्त्राध्ययनाभिमान । अदान्त गर्वित अविनीत पूर्ण । आगीं आर्यचिह्नें मिरवून । अनार्याचरण औद्धत्यें ॥९८॥
सुहृदत्वें जे स्नेहपात्र । क्रिया अभीष्ट अदान्त अपवित्र । मज कारणें ते सर्वत्र । वध्य स्वतंत्र विधिनियमें ॥९९॥
आपली चोरूनि दुष्टचर्या । बाह्या मिरविती श्रेष्ठ क्रिया । ऐसियांचिया हननकार्या । मी अवतरलों इहलोकीं ॥२००॥

एतावदुक्त्वा भगवान्निवृत्तोऽसद्वधादपि । भावित्वात्तं कुशाग्रेण करस्थेनाहनत्प्रभुः ॥२८॥

इत्यादिकें अमर्षवाक्यें । बोलूनियां यदुनायकें । षड्गुणैश्वर्य असतां असिकें । तर्‍ही अविवेकें कवळिला ॥१॥
तीर्थयात्रेचा संकल्प केला । तैंहूनि दुष्टवधही विसर्जिला । तथापि न चले होणाराला । प्रमाद घडला तद्योगें ॥२॥
होणाराची बळिष्ठता । राम षड्गुणी सर्वज्ञ पुरता । हेममृगातें झाला वधिता । स्त्रीवचनार्था वशवर्ती ॥३॥
व्यास नारद आणि कृष्ण । इत्यादिकीं धर्म बोधून । जर्‍ही केला सावधान । तथापि स्त्रीरत्न पणीं हरवी ॥४॥
यास्तव भवितव्य जें होणार । त्याचा ब्रह्माही परिहार । करूं न शके हा विचार । श्रेष्ठमुनिवर विवारिती ॥२०५॥
यास्तव सर्वज्ञ संकर्षण । षड्गुणैश्वर्यसंपन्न । भवितव्यार्थें प्रक्षोभून । कुशाग्रें ताडन करी सूता ॥६॥
सहज हस्तीं होता कुश । तेणें सूतातें सरोष । ताडितां पावला पंचत्वास । घडला दोष मुनि म्हणती ॥७॥
प्रभु समर्थ सर्वज्ञ राम । होणारास्तव त्यास ही भ्रम । पडोनि विसरला यात्राङ्गनेम । क्षोभें विषम आचरला ॥८॥
कुशाग्रें सूतातें करितां हनन । तेणें तत्काळ त्यजिले प्राण । मुनिमानसें जालीं खिन्न । करिती बाह्मण हाहाकार ॥९॥

हाहेति वादिनः सर्वे मुनयः खिन्नमानसाः । ऊचुः सङ्कर्षणं देवमधर्मस्ते कृतः प्रभो ॥२९॥

हाहाकार करिती मुनी । जाले विमनस्क आसनीं । म्हणती सर्वथा लाङ्गलपाणी । अधर्म करणी तुज घडली ॥२१०॥
पभो अवधारीं परीक्षिती । मुनिवर म्हणती रामा प्रति । द्योतमान तुझी मती । दैवें अनुचितीं घातलीं ॥११॥
आदिपश्चात न विचारितां । दीर्घ विवेकें न विवरितां । सूतवधाची हत्या माथां । घेतली तत्वता प्रमादें ॥१२॥
अदान्त अविनीत अजितात्मक । ऐसा स्वमनीं तां विवेक । करूनि वधिला पौराणिक । आम्हां सम्यक न पुसतां ॥१३॥
ब्रह्मासन या दीधलें आम्हीं । सप्रेम होऊनि श्रवणकामीं । तें सविस्तर ऐकें स्वामी । सक्रोधऊर्मी सांडूनी ॥१४॥

अस्य ब्रह्मासनं दत्तमस्माभिर्यदुनन्दन । आयुश्चात्माक्लमं तावद्यावत्सत्रं समाप्यते ॥३०॥

कलिमलसिन्धुनिस्तरणार्थ । सहस्राब्दिक सत्र येथ । आरंभिलें तैं प्रार्थिला सूत । वक्ता समर्थ पौराणिक ॥२१५॥
कलिमलाब्धि माज नौका । हरिगुणकीर्तनश्रवणात्मका । जाणोनि आश्रय केला निका । पौराणिका सूताचा ॥१६॥
आम्ही समस्त ऋषीश्वर । आरंभूनि दीर्घसत्र । नैमिषारण्यीं जालों स्थिर । हरिगुणचरित्रश्रवणार्थ ॥१७॥
ब्रह्मा अध्वर्यु आणि होता । यजमान सदस्यादि उद्गाता । तैसाचि सूत प्रवचनार्था । पुराणवक्ता प्रतिष्ठिला ॥१८॥
सत्रसमाप्तिपर्यंत जाण । यासि दिधलें ब्रह्मासन । जैसा ब्राह्मण तैसाचि मान्य । प्रतिलोम गौण न मनावा ॥१९॥
तुवां नेणोनि हा वृत्तान्त । प्रतिलोमज जाणूनि सूत । अनम्र अधार्मिक उद्धत । देखोनि घात या केला ॥२२०॥
श्रेष्ठांमाजि तुङ्गासन । न करी प्रह्वण अभ्युत्थान । प्रतिलोमजा करितां हनन । अल्प दूषण असेना ॥२१॥
ऐसा निश्चय करूनि मनीं । प्रवर्तलासि तूं शासनीं । परि हे अयोग्य केली करणी । बैसली भूर्घ्नि द्विजहत्या ॥२२॥
ऋत्विज सहस्राब्दपर्यंत । अहोरात्र शुचिष्मंत । तैसाचै पुराणवक्ता सूत । ब्रह्मासनीं प्रतिष्ठिला ॥२३॥
जंव वरी सत्र सिद्धी पावे । तंव वरी आम्ही तपःप्रभावें । यासि सामर्थ्य दिधलें बरवें । तें तूं आघवें अवधारीं ॥२४॥
तों वरी निश्चळ ब्रह्मासनीं । शरीर याचें न पवे ग्लानी । निद्रा तंद्रा क्रमें करूनी । नोहे हानी स्फूर्तीची ॥२२५॥
बळ प्रज्ञा आयुष्यवृद्धी । आम्ही या दिधली वरद सिद्धी । ब्रह्मासनाची मर्यादाविधी । जाणोनि कोविदीं या भजिजे ॥२६॥
येणें कोण्हा अभ्युत्थान । न कीजे प्रह्वण अभिवादन । जेथवरी यातें ब्रह्मासन । तंव हा ब्राह्मण पूज्यत्वें ॥२७॥
ऐसें येथींचें साद्यंत गुज । नेणोनि वधिला प्रतिलोमज । तरी ब्रह्मवध घडला तुज । वृष्णिवंशज धुरंधरा ॥२८॥
तथापि तूं यदुनायक । योगमायानियामक । अवगलासि मनुष्यवेख । परि सम्यक योगेश्वर ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP