अध्याय ७४ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रुत्वा द्विजेरितं राजा ज्ञात्वा हार्दं सभासदाम् । समर्हयद्धृषीकेशं प्रीतः प्रनयविह्वलः ॥२६॥

तेथ राजा युधिष्ठिर । ऐकूनि विप्रवाणीचा गजर । जाणोनि सदस्यांचें अंतर । जाला निर्भर स्वानंदें ॥२७॥
सर्व भूतळींचे भूपती । भीष्मप्रमुख जे महारथी । त्यांचें हृद्गत जाणोनि प्रीती । अग्रीं श्रीपति अर्चितसे ॥२८॥
रुग्णा प्रियतम पथ्य कथिलें । कीं तृषिता अमृत प्राप्त झालें । कीं जात्यंधासि नेत्र आले । तेंवि मानिलें सुख धर्में ॥२९॥
कृष्ण प्राणाचा प्रियतम । कृष्ण त्रिजगाचा हृदयंगम । कृष्ण केवळ पुरुषोत्तम । हें जाने धर्म हृत्कमळीं ॥२३०॥
कृष्णें रक्षिलें जोहरीं । कृष्णें पांचाळी नोवरी । योजिली पाण्डवां स्वयंवरीं । कृष्ण कैवारी सर्वस्वीं ॥३१॥
कृष्णें पाठीची सुभद्रा बहिणी । अर्जुन प्रवर्तला तिचे हरणीं । तैं बोधूनि यादवश्रेणी । पाणिग्रहणीं समर्पिली ॥३२॥
जरासंधा समरांगणीं । भूतळीं जिंकूं न शके कोण्ही । कृष्ण घेऊनि द्विज अवगणीं । अघटित करणी करूनियां ॥३३॥
निर्दळिलें बार्हद्रथा । मुक्त केल्या नृपांच्या चळथा । येरव्हीं मागध जित असतां । केंवि हा होतां राजसूय ॥३४॥
कृष्ण आमुचा प्रिय प्राण । कृष्ण आमुचें ध्येय ध्यान । कृष्णवेगळा त्रिजगीं आन । श्रेष्ठ नाहीं हें मी जाणें ॥२३५॥
परंतु आपुले मखप्रसंगीं । आज्ञा न देतां सदस्यवर्गीं । अर्पितां अग्र्‍यार्हण श्रीरंगीं । लागे आंगीं मूर्खत्व ॥३६॥
म्हणोनि प्रार्थिले सदसस्पति । तेथ सहदेव बाळमति । बोलिला तें सर्वांप्रति । मान्य झालें मम भाग्यें ॥३७॥
महर्षि ब्रह्मर्षि देवर्षी । भूभुजवरिष्ठजे राजर्षी । सर्वां मान्य हृषीकेशी । अग्रपूजेतें पूज्यतम ॥३८॥
ऐसी आज्ञा सदस्यगणीं । दिधली ते म्यां धरिली मूर्ध्नीं । परमानंदें चक्रपाणी । अग्रपूजनीं बैसविला ॥३९॥
ऐकूनि सभ्यांचें अनुमत । धर्मराजाही सप्रेमभरित । भावी लक्षून अभीष्ट कृत्य । पूजा भगवंत मान्य करी ॥२४०॥
रत्नपीठीं सदस्याग्रणीं । प्रतिष्ठूनि चक्रपाणी । द्विजगणांच्या मंत्रपठनीं । धर्म पूजनीं प्रवर्तला ॥४१॥
विधिप्रबोधी धौम्यवचनें । धर्म तैसेंचि तनुवाड्मनें । आचरे जेंवि सूत्रचळनें । करी नर्तन सायखडें ॥४२॥
कनकपात्र मांडूनि तळीं । धर्म हरिचरणा प्रक्षाळी । कनककलशीं गंगाजळीं । धारा ओती सहदेव ॥४३॥
हृदयीं नयनीं निढळीं मौळीं । पाद स्पर्शोनि पुशिले चैलीं । पीठीं प्रतिष्ठूनि ते काळीं । साङ्ग आदरली सपर्या ॥४४॥
चंद्रकान्ताच्या चौरंगीं । मृदुल चित्रासन झगमगी । हंसतूळिका तदुपयोगी । क्षीरोदचौघडि त्याउपरी ॥२४५॥
गमे क्षीराब्धि तिये काळीं । आपणा सांडूनि कां वनमाळी । आला म्हणोनि आसनातळीं । वसनसंभ्रमें विराजला ॥४६॥
करूनि पादप्रक्षालन । आसनीं उपविष्ट श्रीभगवान । उभयभगीं भीमर्जून । उपचारदानें ओळंगती ॥४७॥
व्यजनचामरें घेऊनि चौघे । द्रौपदीतनय उभयभागें । छत्र धरूनि तिष्ठे मागें । प्रतिविंध्यनामा तें काळी ॥४८॥
रत्नजडित श्रीपादुका । धरूनि अभिमन्यु ठाकला निका । निर्जर निरखोनियां कौतुका । मानिसी हरिखा हऋतकमळीं ॥४९॥
मंगळवाद्यें वाजती मदुरें । सात्वक कीर्तनें करिती गजरें । सुरवर गर्जती जयजयकारें । सुमनासारें वर्षती ॥२५०॥
नारदसनकाद्क वैखानस । पूर्णानंदें पावले तोष । धर्में पूजितां हृषीकेश । त्रिजगीं उल्हास उथळला ॥५१॥
पादावनेजन पात्रीं धरिलें । म्हणाल काय केलें । न्यसपुत्रें निरोधिलें । तेंही कथिले जातसे ॥५२॥

तत्पादावनेजनाआपा शिरसा लोकपावनीः । समर्थ सान्ज्यमयः सुकुटुंबोऽबहन्मुदा ॥२७॥

कृष्ण पादावज्नेजनआष । निरसिती ब्रह्माण्डगर्भींच्या तापा । तीथें पक्षाळिनी निजतापा । जनसंकल्पस्तववजनिता ॥५३॥
लोकपावनी मंदाकिनी । दुसरेन जन्मली श्रीकष्णचरणीं । परमादनंदें वाहिली मूर्ध्नीं । शंभुसमान युधिष्ठिरें ॥५४॥
भार्या बंधु अमात्य मंत्री । कुटुम्बेंसहित सह परिवारीं । धर्मराजें सर्वगात्रीं । आणि पवित्रीं स्वीकेली ॥२५५॥
पादावजेजन वंदिले ऐसें । त्यावरीं अर्जुन जालें कैसें । कुरुवर्या तें सावध परिसें । म्हणे संतोषें शुकवक्ता ॥५६॥

वासोभिः पीतकौशेयैर्भ्षणश्च महाधनैः । अर्हयित्वाश्रुपूर्णाक्षो नाशकत्समविक्षितुम् ॥२८॥

परिधानप्रावरणादि उपचारें । अर्पिलीं बहुविध पीताम्बरें । रत्नखचित भूषणें रुचिरें । परमभाम्बरें लेवविलीं ॥५७॥
मुकुट कुंडलें कंठाभरणें । केयूराङ्गदें करकंकणें । मुद्रिकांवरी जडिलीं रत्नें । भास्करकिरणें लाजविती ॥५८॥
आपाद वैजयंतीमाळा । कौस्तुभ श्रीवत्साङ्काजवळा । माणिक मुक्तफळांच्या किळा । तेजागळिया देदीप्य ॥५९॥
जडित मेखळा कटितटीं । सुरत्नजडिता क्षुद्रघटी । तोडरीं दितिजांचीं मुखवटी । वांकी नूपुरें रुणझुणती ॥२६०॥
ऐसीं अर्पूनि वस्त्राभरणें । ब्रह्मसूत्र पृथगाचमनें । त्यावरी दिव्य विलेपनें । मलयजचंदनें कस्तूरिका ॥६१॥
केशरतिळक रेखिला पिंवळा । कुङ्कुमाक्षता माणिक्यकिळा । आंगीं चंदन चर्चिला धवळा । मंदारमाळा समर्पिल्या ॥६२॥
मुकुटीं तुरंबिले अवतंस । निर्विकल्प कल्पतरूचे घोष । सुगंधशलाका आग्नेयांश । योजूनि धरिती द्विभागीं ॥६३॥
कनकपात्रीं एकारती । फळपुष्पान्नें रत्नज्योती । कुरवंडूनि विसर्जिती । श्रीकृष्णमूर्तीवरूनियां ॥६४॥
दिव्योपहार नैवेद्य सुरस । अमृतोपम फळविशेष । ताम्बूलद्रव्यें त्रयोदश । अर्पिलीं जाजीफळप्रमुखें ॥२६५॥
कायावाचामनधनेंसीं । साङ्गोपाङ्ग दक्षिणेशीं । धर्म अर्पीं बंधुवर्गेंसी । अनन्यप्रेमें हरिचरणीं ॥६६॥
बहळ उधळूनि परिमळरोळा । श्रवणीं पौष्पज मधु चर्चिला । दिव्य पोतास उजळिला । कनकपर्यळीं नीरांजनें ॥६७॥
बहुविध आरतिया गायनें । द्विजवर करिती सूक्तपठनें । चहूं वेदींचीं भिन्नभिन्नें । शाखापरत्वें बहुशाखीं ॥६८॥
अनेक वाद्यांचिया ध्वनी । गंधर्व गाती तानमानीं । सात्वत नाचती कीर्तनीं । नामस्मरणीं सर्व सभा ॥६९॥
पुष्पाञ्जळी समर्पून । सबंधुधर्में साष्टाङ्गनमन । करूनि सप्रेमें प्रदक्षिण । स्तवनीं मौन विसर्जिलें ॥२७०॥
ॐनमोजी श्रीजनार्दना । त्रिजगज्जनका जयवर्धना । जगत्पति जलजेक्षणा । जन्ममरणा जहि अजिता ॥७१॥
करुणासिन्धु कलुषान्तका । कपटकटाहविपाटका । कलिमलकरटिकुम्भभंजका । कंठीरवा कंसारे ॥७२॥
मंगलायतना मंगलनामा । मंगलजनका मंगलधामा । मंगलपूर्णा पूर्णकामा । पुरुषोत्तमा पुरातना ॥७३॥
ऐसी अनेकपरी स्तुति । करूनि पुढती केली प्रणति । सप्रेम लक्षूनि श्रीकृष्णमूर्ति । प्रेमाश्रुपातीं भू भिजवी ॥७४॥
चरणापासूनि मुकुटवरी । स्वर्चित पाहों न शके हरी । दृष्टिदोषाचिये परिहारीं । करी कुरवंडी भेदाची ॥२७५॥
परमानंदीं निमग्न वृत्ति । फावली चिन्मात्रैकविश्रान्ति । ऐसिये दशेच्या सज्जनपंक्ति । प्रत्यय भोगिती तो तेव्हां ॥७६॥

इत्थं सभाजितं वीक्ष्य सर्वे प्रांजलयो जनाः । नमो जयेति नेमुस्तं निपेतुः पुष्पवृष्टयः ॥२९॥

ऐसा धर्में अग्रपूजनीं । सप्रेम पूजिला चक्रपाणी । त्यातें सदस्यीं देखोनी । हृदयभुवनीं संतुष्ट ॥७७॥
बद्धाञ्जलि समस्त जन । उभे ठाकलै निरभिमान । करिती जयशब्दें गर्जन । नमोनमस्ते म्हणोनियां ॥७८॥
पुष्पाञ्जलि कृष्णावरी । सर्व टाकिती जयजयगजरीं । मंत्रपुष्पें ऋषीश्वरें । स्वस्ति म्हणोनी टाकिलीं ॥७९॥
विमानीं दाटल्या सुरवरथाटी । तिहीं केलिया पुष्पवृष्टी । परमानंदें ब्रह्माण्डमठीं । तिये घटिकेचा न समाये ॥२८०॥
कृष्णपूजनें लोकत्रय । ऐसें जालें आनंदमय । विरोधी भक्तांचा समुदाय । निसर्गभजनीं प्रवर्तला ॥८१॥
जयामाजी जितुकी शक्ति । तदनुसार ते करिती भक्ति । जिह्वा रसस्वादाची भोक्ती । रुचि औपस्थीं ते नेणे ॥८२॥
रसना करितां षड्रसपान । तेणें क्षोभे जेंवि अपान । सुरभिगंधा शंसी घ्राण । त्याचें भंजन करी स्वयें ॥८३॥
एकचि देहीं विरोध करणा । तैसाचि सज्जना दुर्जना । परस्परें विरोध भजना । दृष्ट सज्जना न साहती ॥८४॥
यावरी तेंचि निरूपण । ऐका होऊनि सावधान । धर्में करितां हरिपूजन । क्षोभें दुर्जन उठावला ॥२८५॥

इत्थं निशम्य दमघोषसुतः स्वपीठादुत्थाय कृष्णगुणवर्णनजातमन्युः ।
उत्क्षिप्य बाहुमिदमाह सदस्यमर्षी संश्रायवन्भगवते परुषाण्यभीतः ॥३०॥

एका जळें मोगरे जाती । दिव्य सौरभ्यें मघमघिती । पुंगळवेली पाल्हालती । तयाचि जलें दुर्गंधा ॥८६॥
नातरी माधुर्यें गोस्तनी । तैक्त्यें प्रसवे इंद्रवारुणी । आसुरीदैवीसंपत्ति गुणीं । तेंवि हे दोन्ही दुष्टेष्ट ॥८७॥
अग्रपूजनीं पूजितां हरि । साधु गर्जती हरियशोगजरीं । दमघोषतनय तें ऐकूनि श्रोत्रीं । क्षोभें अंतरीं प्रज्वळला ॥८८॥
इत्थं म्हणिजे पूर्वोक्तरीती । कृष्णयशाच्या ऐकूनि उक्ति । अत्यंत क्रोध उपजला चित्तीं । जो प्राणान्तीं अनावर ॥८९॥
सवेग तेणें क्रोधेंकरून । उठिला निजासनापासून । दक्षिण बाहु उभारून । सदस्यांलागून निखंदी ॥२९०॥
बोले सदस्यांकारणें । कृष्णातें करी ऐकवणें । मर्मस्पर्शें कठोर वचनें । निर्भयपणें मुमुर्षु ॥९१॥
श्रवणाप्रति लागती कटु । जियें ऐकतां उपजे विटु । ऐसीं वचनें घडघडाटु । बोले पापिष्ठ तें ऐका ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP