मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
आरती मोहनीराची

आरती मोहनीराची

मध्वमुनीश्वरांची कविता


प्रवरातीरनिवासिनि अविनाशिनी अंबे ॥ चपळ तुझें मी बाळक मजला न विसंबे ॥ तीर्थांमध्यें जरी हे तनु तिंबे । तरीच माझ्या हृदयीं तव महिमा ॥१॥
जयदेवी जयदेवी जय अंबुजदलनयने । मंगळ आरती करितों निर्मळ शशिवदने ॥ध्रु०॥
देव दानव मिळुनी मंथिलें उदधीसी ॥ धन्वतरिनें नेलें सर्वही सिद्धीसी ॥ कलश सुधेचा घेऊनी गेले जे द्वेषी ॥ शरण निघाले निर्जर तै मग जगदीशीं ॥२॥
देवासाठीं झाला सुंदर कामिनी ॥ कंदुक खेळत आली मंद गजगामिनी ॥ मोहित झाले दितीसुत देखुन भामिनी ॥ वदती अमृत वाढुनी देवो स्वाभिनी ॥३॥
देवतपंक्तिमध्यें राहू बसला हो ॥ अंतरीं चिंती घेइन धणिवरी रसलाहो ॥ नारायणीच्या चक्रें अवचट चसलाहो ॥ चंद्रसूर्यालागीं रागें डसला हो ॥४॥
सुवर्णवहनें दानव वधिले संग्रामीं ॥ सुरवर वर्षति सुमनें निर्भय निजधामीं ॥ मोहनीराजा चरणा शरणांगत आम्ही ॥ म्हणती मध्वनाथा शोभे हा स्वामी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP