TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
अभंग २ रा

स्फुट प्रकरणें - अभंग २ रा

मध्वमुनीश्वरांची कविता


अभंग २ रा
धामणगांवांत बोधराज संत । नांदतसे भक्त एकनिष्ठ ॥१॥
एकनिष्ठ भाव एकनिष्ठ भक्ति । रात्रंदिवस चित्तीं पांडुरंग ॥२॥
भक्ताचा निश्चय पाहावया देव । येतां पंढरीराव जाहाला तेथें ॥३॥
कोणे एके दिनीं आला पांडुरंग । धरुनिया सोंग गोसाव्याचें ॥४॥
भोपळ्या आणि काठी काखे लावी झोळी । विभूति चर्चिली सर्वांगासी ॥५॥
अल्लख वचन मागतसे दान । सिधा बोधल्यानें दिला तेव्हां ॥६॥
सिधा घेऊनिया मग बोले तया । म्हणे बोधराया मागणें आहे ॥७॥
भागीरथी सून द्याल जरी आम्हां । पांडुरंग तुम्हां कृपा करील ॥८॥
येऊनी बोधला सांगे कांतेपाशीं । गोसावी सुनेसी मागताहे ॥९॥
मग तीही म्हणे सुनेच्या विभागा । मज कांहीं सांगा आज्ञा स्वामी ॥१०॥
यमाजीनंदन शेता गेला होता । धांवत धांवत गेला तेथें ॥११॥
यमाजीनंदना घरीं आला गोसावी । भागीरथी द्यावी म्हणतसे ॥१२॥
पुत्र म्हणे ताता हें काय विचारावें । मार्गस्थ करावें गोसाव्यासी ॥१३॥
येऊनी बोधला म्हणे भागीरथी । पतिव्रता सती आहेस तूं ॥१४॥
गोसावी तिष्ठतो द्वारीं तुजसाठीं । म्हणे आळ मोठी आहे मामा ॥१५॥
सांगाल वचन तें मज प्रमाण । यमाजीनंदन आला तेव्हां ॥१६॥
सासुबाई मामा वंदिला भ्रतार । निघाली बाहेर घरांतुनी ॥१७॥
अतितासी सती घाली नमस्कार । स्वामी कृपा करा चला म्हणे ॥१८॥
बोधराज म्हणे सुने भागीरथी । फिरोनी गुमाती येऊं नको ॥१९॥
अवश्य म्हणोनी निघाली तीं दोघें । पंढरीचे मार्गें जाती झालीं ॥२०॥
गांवांमध्यें निंदा करोनी हांसती । चळला म्हणती बोधराज ॥२१॥
बोधल्याचे घरीं आनंदांत सारीं । कामधाम करी नामःस्मरणें ॥२२॥
नित्य निरंतरीं विठ्ठल उच्चार । हा त्याचा व्यापार सर्वकाळ ॥२३॥
पाव कोस आलीं गांवाआलीकडे । विठ्ठल रूपडें झालें बाबा ॥२४॥
पायीं ब्रिदावळी पीतांबर नेसले । वनमाळा कुंडलें शोभताती ॥२५॥
चरणासी मिठी घाली भागीरथी । दयाब्धी श्रीपति नारायणा ॥२६॥
आळशावरी गंगा पातली सहज । पुरले मनोरथ दर्शनाचे ॥२७॥
भागीरथी बाई येथुनिया जाई । येरी धरी पाय विठोबाचे ॥२८॥
पांडुरंगा तुझें जाहलें दर्शन । आतां परतोन न जाई मी ॥२९॥
घरीं गेल्यावरी लावितील शब्दा । तुम्ही आह्मी प्रसिद्ध जाऊं चला ॥३०॥
मामाजी बोलिले तें तुह्मीं ऐकिलें । म्यांही ह्मणीतलें नाहीं आतां ॥३१॥
अकस्मात आली भागीरथी सून । सांगा ते निधान पांडुरंगा ॥३२॥
बोधल्याचे घरीं आले भगव्वान । सर्वत्र चरण वंदिताती ॥३३॥
जनासी कळले भागीरथी आली । घेऊनिया माऊली पांडुरंगा ॥३४॥
सर्वत्र मिळोनी वंदिताती सारा । ज्योती रामेश्वर बोधराज ॥३५॥
संताचीही कीर्ति पुराणें बोलती । पापें भस्म होती अधमाची ॥३६॥
आषाढी कार्तिकी महिमा पंढरी । जाहलीं वारकरी चौघेजण ॥३७॥
सोडोनी घरदार हा त्यांचा व्यापार । नामाचा गजर करिताती ॥३८॥
जन्मासी येऊनी केलेसें साधन । चुकविलें त्यानें जन्ममरण ॥३९॥
चौर्‍यासीची फेरी चुकली येरझारी । नामाचे गजरीं सर्व जाळी ॥४०॥
मध्वनाथ ह्मणे जन्मास येऊन । चुकविलें बंधन संसाराचें ॥४१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-05-28T20:05:12.3970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तर्‍हि

 • उअ . तरी ; तरीहि ; तरी पहा . थोंटा बधिर दमेकरी । तर्‍ही ताठा न संडी । - दा २ . ३ . ३३ . मेला कर्ण तर्‍हि कसा , तच्छोके संजया न मेलो मी । - मोकर्ण ६ . २२ . याच्या जोडीचा शब्द जर्‍ही . [ सं . तर्हि ; म , तरि + हि ] 
RANDOM WORD

Did you know?

सत्यनारायण पूजेला धर्मशास्त्रीय आधार आहे काय? हे व्रत किती पुरातन आहे?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.