अध्याय ६८ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नूनं नानामदोन्नद्धाः शांतिं नेच्छंत्यसाधवः । तेषां हि प्रशसो दंडः प्रशूनां लुगडो यथा ॥३१॥

नानामदें जे उद्धत । ते नेणती आपुलें हित । दुष्ट अशान्त दुर्विनीत । भ्रान्त उन्मत्त दुरात्मे ॥२३॥
जे कां असाधु दुर्जन । इच्छितां तयांचें कल्याण । मदोन्मत्त ते विक्षेपून । करिती हेलन बहुतेक ॥२४॥
कुलीनत्वाभिजात्यमद । शिष्टाचारें शीळमद । वीर्यशौर्यें प्रबळमद । आणि श्रीमद धनाढ्यें ॥२२५॥
यौवनभरें वयसामद । श्रुताध्ययनें विद्यामद । रूपलावण्यसौन्दर्यमद । सत्तामद भूपाङ्गें ॥२६॥
इत्यादिमदें जे उन्नद्ध । त्यांसी प्रशमार्थ न कीजे बोध । बोधें होती ते विरुद्ध । दण्ड प्रबोध त्यां योग्य ॥२७॥
ज्ञानविहीन पशूंचें जिणें । हित नुमजे त्यांकारणें । त्यांसी प्रबोध डंगारणें । येती तेणें स्वस्थाना ॥२८॥
लगुड म्हणिजे काष्ठदंड । घडिघडी तेणें ठेंचितां तोंड । तरी ते वोढाळ तरमुंड । देती मुसाण्ड पुढें पुढें ॥२९॥
हेचि तयांची शिकवण । कीजे क्षणाक्षणा ताडन । यावांचूनि विवेकहीन । निजकल्याण न मानिती ॥२३०॥
वेदशास्त्रीं नाहीं गति । ईश्वरनिष्ठा न बाणे चित्तीं । पादत्राणें तयांप्रति । तादन युक्तिप्रबोध ॥३१॥
ऐसे दुर्जन हे कौरव । नेणतीं स्वहिताचें गौरव । आम्हीं रक्षिला स्नेहभाव । इहीं अपाव तो केला ॥३२॥

अहो यदून्सुसंरब्धान्कृष्णं च कुपितं शनैः । सांत्वयित्वाऽहमेतेषां शममिच्छन्निहागतः ॥३२॥

साम्बनिग्रहणाची वार्ता । ऐकोनि यदुचक्रा समस्तां । कौरवनाशा प्रवर्ततां । आम्हीं तत्त्वता वारिलें ॥३३॥
ब्रह्माण्डाचिया उतरडी । इच्छामात्रें घडी मोडी । तया कृष्णाच्या पडिपाडीं । कायसीं बापुडीं कौरवें हीं ॥३४॥
अहो आश्चर्य वाटे थोर । करावया कुरुकुळा संहार । यादव क्षोभले महाक्रूर । झाला श्रीशर सक्रोध ॥२३५॥
रथ गज अश्व पदातिदळ । युयुधानप्रमुख यादवदळ । कुरुकुळ करावया निर्मूळ । क्रोधें तत्काळ उठावले ॥३६॥
यांचें इच्छूनियां कल्याण । हळुहळु शान्त करूनियां कृष्ण । प्रार्थूनियां उग्रसेन । केलें आगमन म्यां येथ ॥३७॥
कौरवां यादवां माजी कळी । न व्हावी कोणे एके काळीं । ऐसी आम्हीं इच्छा केली । ती भंगैलीं इही दुष्टीं ॥३८॥

त इमे मंदमतयः कलहाभिरताः खलाः । तं मामवज्ञाय मुहुरुर्भाषान्मानिनिऽब्रुवन् ॥३३॥

ते हे मंदमति दुर्जन । कलहाकारणें उदित जाण । क्षेम इच्छित्या मातें पूर्ण । अवज्ञा हेळणें उपेक्षिलें ॥३९॥
वारंवार दुष्ट वचनें । निंदा दुरुक्ति हेलनें । ऐकवूनियां मजकारणें । गेले उठोनि नगरांत ॥२४०॥
तुच्छ मानूनि म अज हलधरा । वृद्धा उद्धवा बुद्धिसागरा । कौरव चढले अहंकारा । वदले उत्तरां निकृष्ट ॥४१॥
तयां उत्तरांचा विस्मय । स्मरोनि मानी रेवतीप्रिय । कौरवीं केला परमान्याय । जें अमृत विषमय मानिलें ॥४२॥
 
नोग्रसेनः किल विभुर्भोजवृष्ण्यंधकेश्वरः । शक्रादयो लोकपाला यस्यादेशानुवर्तिनः ॥३४॥

कौरवांतें आज्ञापन । करावया असमर्थ उग्रसेन । कौरवांचें हें दुर्भाषण । विस्मयेंकरून अनुस्मरें ॥४३॥
भोज अंधक वृष्णि सर्व । कुक्कुर सात्वत मधु दाशार्ह । इत्यादि यदुकुळांचा राव । कौरवीं अनर्ह तो केला ॥४४॥
इंद्र अग्नि वैवस्वत । निरृति वरुण सह मारुत । कुबेर ईशान लोकनाथ । अतंद्रित आज्ञेतें ॥२४५॥
उग्रेसेनाची आज्ञा माथां । वंदूनि वर्तणें लोकनाथा । ते कौरवीं केली वृथा । मानूनि आढ्यता स्वपदाची ॥४६॥
आत्मसंभावित हे स्तब्ध । केला स्नेहभाव विरुद्ध । लोकत्रयीं जो प्रसिद्ध । तो महत्वें वृद्ध इहीं केला ॥४७॥
असो उग्रसेनाची कथा । त्रिजगज्जनका श्रीकृष्णनाथा । लज्जा न वटे यां हेळितां । प्रकट सामर्थ्या जाणोनी ॥४८॥

सुधर्माऽऽक्रम्यते येन पारिजातोऽमरांघ्रिपः । आनीय भुज्यते सोऽसौ न किलाध्यासनार्हणः ॥३५॥

सुधर्मा सभा स्वर्गींहून । द्वारके प्रतिष्ठिली आणून । अमराङ्घ्रिपाचें सेवन । भोगी प्रसूनें ललनांशीं ॥४९॥
ब्रह्माण्डसाम्राज्यपट्टाभिषेक । करूनि निर्जर शक्रादिक । किङ्करवृत्ती एकें एक । तिष्ठती सम्यक ज्या सदनीं ॥२५०॥
त्या कृष्णासी नृपासन । पाण्डुर च्छत्रें आतपत्राण । उभय चामरें किरीट व्यजन । अयोग्य म्हणोनि जल्पती हें ॥५१॥
साम्राज्यश्रियेचें ऐश्वर्य । भोगार्ह एक कौरवधुर्य । अनर्ह मानिती यदुवर्य । यथार्थ कोण हे गोष्टी ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP