TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

श्लोक ११ ते १५
किन्नु तेऽविदितं नाथ सर्वभूतात्मसाक्षिणः । कालेनाव्याहतदृशो वक्ष्यऽथापि तवाज्ञया ॥११॥

सर्वभूतांचा अंतरात्मा । सर्वसाक्षी भूतग्रामा । तुज काय अविदित पुरुषोत्तमा । सर्वज्ञगरिमा हे तुझी ॥७२॥
कालकलनेच्या प्रवाहीं । सर्वत्र ज्ञानें लोपती पाहीं । अव्याहत दृक् तुझ्या ठायीं । म्हणोनि नाथ तूं सर्वांचा ॥७३॥
भूत भावी वर्तमान । तूं अव्याहत त्रिकालज्ञ । तथापि तुझिये आज्ञेवरून । करितों कथन तें ऐक ॥७४॥

यावंत्यः सिकता भूमेर्यावंत्यो दिवि तारकाः । यावंत्यो वर्षधाराश्च तावतीरददं स्म गाः ॥१२॥

स्वमुखें कीर्ति नुच्चारिजे । समर्थाज्ञा नुल्लंघिजे । दोहीमाजी आज्ञाकाजें । स्वकीर्ति वर्णिजे निर्दोष ॥७५॥
तरी भूमीचे रजःकण । जितुके भरती गणनेकरून । किंवा गगनीं तारागण । कीं धारागणन मेघांचें ॥७६॥
यांची गणना जितुकी भरे । तितुकीं गोदानें निजकरें । देता झालों ज्या प्रकारें । तेंही आदरें अवधारीं ॥७७॥

पयस्विनीस्तरुणीः शीलरूपगुणोपपन्नाः कपिला हेमशृंगीः ।
न्यायार्जिता रूप्यखुराः सवत्सा दुकूलमालाभरणा ददावहम् ॥१३॥

बहुत दुग्ध जयांचिये कांसे । सद्गुणी सुशील प्रथम वयसे । कपिला रूपसा मानसें । प्रसन्न होती देखिलिया ॥७८॥
ऐसिया न्यायार्जित सवत्सा । मुक्तप्रवाळप्रोतपुच्छा । पात्रप्रतिकृतिअनिच्छा । स्वर्णशृंगी रौप्यखुरा ॥७९॥
क्षौमाम्बरें झांकूनि पृष्ठि । सर्वाभरणीं मंडित यष्टि । ग्रीवाभूषणें माला कंठीं । देता झालों द्विजवर्या ॥८०॥
दानपात्र जे ब्राह्मण । समासें त्यांचेही सद्गुण । स्वामीपाशीं करितों कथन । सादर श्रवण करीं प्रभो ॥८१॥

स्वलंकृतेभ्यो गुणशीलवद्भ्यः सीदत्कुटुंबेभ्य ऋतव्रतेभ्यः ।
तपःश्रुतब्रह्मवदान्यसद्भ्यः प्रादां युवभ्यो द्विजपुंगवेभ्यः ॥१४॥

सुष्ठु अलंकारवंत । ब्रह्मवर्चस्वी वेदमूर्त । सार्थाध्ययनें पारंगत । क्रियामंडित तदुचित जे ॥८२॥
सफळ विद्या विनयितेकरून । बुद्धीचें फळ अनाग्रह पूर्ण । फळ पापाचें याञ्चाव्यसन । तपस्वी फळवान् दातृत्वें ॥८३॥
श्रौतस्मार्ताद्यनुष्ठानें । सफळ ज्यांचीं वेदाध्ययनें । दत्तभुक्तें ज्यांचीं धनें । रतिसंतानें सफळ वधू ॥८४॥
सुशीळा साध्वी वनिता सदनीं । परापवाद अनृत वदनीं । अभेध्य मानिती श्वपळाहूनी । इत्यादि सद्गुणीं मंडित जे ॥८५॥
आर्यवर्यचर्या पाहीं । शील न भंगे काळीं कहीं । कुटुंबसुखदुःखाच्या ठायीं । हर्षामर्षा नातळती ॥८६॥
यथोक्त अनुष्ठानाच्या भरीं । कुटुंब खेद पावतां घरीं । सज्ज न होती तत्परिहारीं । अनाचारीं स्पर्शोनी ॥८७॥
अवस्थात्रयीं सत्यव्रती । न करिती दंभाची प्रवृत्ति । निष्कामतपस्वी ईश्वरप्राप्ती । श्रुतिवेदान्तीं श्रवनपर ॥८८॥
तपश्चर्यादिगुणेंकरून । ज्यांतें जाणती जगाचे श्रवण । ब्रह्म म्हणिजे निगमाध्यापन । उत्कृष्ट वदान्य अमृतत्वें ॥८९॥
धीर उदार सत्यव्रती । सुशीळ तपस्वी पुण्यकीर्ति । ऐसिया दानपात्रां द्विजांप्रति । यथानिगुती अर्चूनी ॥९०॥
विष्टमधुपर्कपुरस्सर । शाखाध्ययनें गोत्रोच्चार । करूनि स्वसत्तापरिहार । त्यागोत्पादन तत्सत्ता ॥९१॥
एवमादि विधिविधानें । यथासाङ्गें गोप्रदानें । पूर्वोक्त सत्पात्रांकारणें । दिधलीं द्रव्यें तें ऐकें ॥९२॥

गोभूहिरन्यायतनाश्वहस्तिनः कन्याः सदासीस्तिलरूप्यशय्याः ।
वासांसि रत्नानि परिच्छदानथानिष्टं च यज्ञैश्चरितं च पूर्तम् ॥१५॥

चतुर्धा भूमिदानाची परी । वृत्तिसदनायतनक्षेत्रीं । चारी प्रकार सविस्तरीं । श्रोतीं चतुरीं परिसावें ॥९३॥
जीविकोद्देशें मिराशी करणें । वृत्तिभूमि त्यातें म्हणणें । नांदावया निलय देणें । सदानदानें त्या भूमी ॥९४॥
वापीकूपजलाशयें । यज्ञस्थानें देवालयें । धर्मशाळा प्रपानिलयें । आयतनरूपा या भूमी ॥९५॥
सजल निर्जल क्षेत्रें कृषि । वाटिका वनें वृक्षविशेषीं । इत्यादि चतुर्विध भूदानासी । सत्पात्रासी समर्पिलीं ॥९६॥
याचि प्रकारें हिरण्यदानें । ग्रंथ वाढेल बहुव्याख्यानें । अश्वगजादि शिबिका यानें । विप्रांकारणें समर्पिलीं ॥९७॥
कन्यादानें सालंकृतें । दासदासीसमृद्धियुक्तें । विप्रांकारणें यथोचितें । दिधलीं बहुतें भगवंता ॥९८॥
रौप्यप्रमुख अष्ट लोह । तिलपात्रादि धान्यनिचय । वितानें जवनिका शय्याविषय । उपबर्हणें सतूळिका ॥९९॥
नानाविध वसनदानें । वज्रमुक्तादि अनेक रत्नें । सोपस्करें रथादि यानें । अश्वसारथी शिबिरेंसीं ॥१००॥
संस्थापूर्वक शत क्रतु । यजिले अच्छिद्र सालंकृत । वनोपवनें बहुधा पूर्त । वापीकूपादि निर्मिलीं ॥१॥
ऐसें सांगूं कोठवरी । हृदयस्थ जाणसी श्रीहरि । सुकृत करितां पदिलों घोरीं । काय निमित्त तें ऐका ॥२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-05-10T21:27:10.4430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

taphridium

  • पु. Bot. टॅफिडिअम 
RANDOM WORD

Did you know?

मृत व्यक्तीच्या तेराव्याचा विधी काय असतो? त्या दिवसाचे महत्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.