कोऽन्वयं नरवैदूर्यः कस्य वा कमलेक्षणः ।
धृतः कया वा जठरे केयं लब्धात्मनेन वा ॥३१॥

कोण हा नररत्न पुरुषश्रेष्ठ । कोणे वंशीं जन्मला स्पष्ट । सहज भासे अंगलोट । श्रीवैकुंठपडिपाडें ॥३३॥
रातोत्पलदलमृदुलचरण । कमळकोमळ करतळ अरुण । फुल्लारवर्तुळ पंकजवदन । कमलेक्षण कमनीय ॥३४॥
कवणे सुभगेनें निजजठरीं । धरूनि वाहिला नवमासवरी । तत्समसादृश्यता शरीरीं । इंगितें श्रीहरीसम गमती ॥२३५॥
येणें कोण हे पाविजेली । पूर्णैश्वर्यें दैवाथिली । पौलोमीही ठेंगणी केली । निजलावण्यें पैं इणें ॥३६॥
याचिये अर्धाङ्गी हे बाळा । सुकृतें सौभाग्यसुखसोहळा । भोगितां देखोनि निवती डोळां । त्यांचा आगळा अभ्युदय ॥३७॥
ऐसी कल्पना करितां हृदयीं । रुक्मिणी मोहें कवळिली पाहीं । पुन्हा वितर्क करिते कायी । तें सर्वही अवधारा ॥३८॥

मम चाप्यात्मजो नष्टो नीतो यः सूतकागृहात् ।
एतत्तुल्यवयोरूपो यदि जीवति कुत्रचित् ॥३२॥

म्हणे माझाही आत्मज गेला । प्रसूतिगृहींहूनि जो नेला । कोठें असेल जरी वांचला । तरी असेल येतुला रूपवयें ॥३९॥
याचिऐसा तेजःपुंज । पंचरात्र म्यां मुखपंकज । पाहिलें तें गमतें बोज । मानी चोज तें ऐका ॥२४०॥

कथं त्वनेन संप्राप्तं सारूप्यं शार्ङ्गधन्वनः ।
आकृत्यावयवैर्गत्या स्वरहासावलोकनैः ॥३३॥

म्हणे हें आश्चर्य वाटतें थोर । शाङ्गर्धन्वा गमे अपर । तत्सारूप्य हा सुंदर नर । कैसे परी लाधला ॥४१॥
कृष्णासमान आकृतिठसा । पूर्णावयवीं कृष्णाचि ऐसा । गमनागमनें पदविन्यासा । कृष्णाचि सरिसा भासतसे ॥४२॥
कृष्णाऐसी स्वरमाधुरी । कृष्णाऐसी स्मितभा वक्त्रीं । कृष्णसादृश अपाङ्गनेत्री । कौशल्यकुसरी समसाम्य ॥४३॥
ऐसें तर्कितां मोहऊर्मीं । विशेषें झळंबे हृदयपद्मीं । म्हणे बहुतेक तोचि हा मेघश्यामें । मदुदरसद्मीं संभव जो ॥४४॥

स एव वा भवेन्नूनं यो मे गर्भे धृतोऽर्भकः ।
अमुष्मिन्प्रीतिरधिका वामः स्फुरति मे भुजः ॥३४॥

यदर्थीं कारण हेंचि दृढ । याचेचि ठायीं मत्प्रेम वाड । वाम भुजही स्फुरणारूढ । लवे सुघड वामाक्ष ॥२४५॥
जो कां श्रीकृष्णवीर्याङ्कुर । माझिये जठरीं जाला स्थिर । यास्तव उभयसदृशाकार । हा मम कुमर निश्चयें ॥४६॥
गेला आला कवणे रीती । यदर्थीं भ्रमित माझी मति । ऐसें विवरीं रुक्मिणी चित्तीं । तंव आला श्रीपति तें ऐका ॥४७॥

एवं मीमांसमानायां वैदर्भ्यां देवकीसुतः ।
देवक्यानकदुंदुभ्यामुत्तमश्लोक आगमत् ॥३५॥

विदर्भरायाची कुमारी । म्हणोनि वैदर्भीं नामोच्चारीं । ऐसें ते जंव मनीं विवरी । तंव तेथ शौरि पातला ॥४८॥
आनकदुंदुभि देवकीसहित । पुण्यश्लोक पातला तेथ । भूतभविष्यार्थ ज्यातें विदित । विज्ञातार्थ तो भगवान ॥४९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP