अध्याय ५३ वा - श्लोक २७ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


न्यमीलयत कालज्ञा नेत्रे बाष्पकुलाकुले । एवं वध्वाः प्रतीक्षंत्या गोविंदागमनं नृप ॥२७॥

नेत्रीं अश्रूंचिया धारा । दुःखें कांपतसे थरथरा । धरितां न धरवे धीरा । विकळ सुंदरा जातसे ॥९९॥
अद्यापि कृष्णागमनकाळा । नाहीं अतिक्रमली वेळा । ऐसें मानूनि लावी डोळां । बाष्पाम्बुकलासंयुक्त ॥१००॥
ऐसी प्रतीक्षा नोवरी । करीत असतां चिंतातुरी । तंव कृष्णागमनसूचकें पुरीं । चिह्नें शरीरीं उमटलीं ॥१॥

वाम ऊरुर्भुजो नेत्रमस्फुरन्प्रियभाषिणः । अथ कृष्णविनिर्दिष्टः स एव द्विजसत्तमः ॥२८॥

तंव लविन्नला डावा डोळा । बाहु स्फुरती वेळोवेळा । हें तंव चिह्नें गे गोपाळा । प्राप्तिकरें पैं होती ॥२॥
भो भो राजा कुरुनरपाळा । ऐसी सचिंत भीमकबाळा । तियेचि अवसरीं गोपाळा । हृदयकमळामाजि गमे ॥३॥
मग कृष्णें सांगितलें द्विजासे । वेगीं जावें भीमकीवासीं । थोर अवस्था होतसे तिसी । उद्वेगेंसीं अपार ॥४॥
तिसी द्यावें आश्वासन । उदैक आहे तुझें लग्न । तुवा असावें सावधान । पाणिग्रहण मी करीन ॥१०५॥

अंतःपुरचरीं देवीं राजपुत्रीं ददर्श ह । सा तं प्रहृष्टवदनमव्यग्रात्मगतिं सती ॥२९॥

आठां भावांची परवडी । उभवूनि स्वानंदाची गुढी । द्विज धांविन्नला लवडसवडी । घातली उडी तत्काळ ॥६॥
अंतःपुरामाजि रुक्मिणी । कृष्णवेधें सचिंत मनीं । ब्राह्मण तयेतें देखोनी । भुज उभवूनियां आश्वासी ॥७॥
भीमकी करितां चिंता । त्म्व द्विज देखिला अवधिता । हरिखें वोसंडली चिता । प्रसन्नता देखोनी ॥८॥

आलक्ष्य लक्षणाभिज्ञा समपृच्छच्छुचिस्मिता ।
तस्या आवेदयत्प्राप्तं शशंस यदुनंदनम् ।
उक्तं च सत्यवचनमात्मोपनयनं प्रति ॥३०॥

पहिला बाह्मण हा अतिदीन । याचें पालटलें दिसेअ दिह्न । दिसताहे प्रसन्नवदन । कृष्णागमनेंसीं पैं आला ॥९॥
कृष्णदर्शनाचे प्राप्ती । द्विजाची पालटली देहस्थिति । आनंदमय झालो वृत्थि लिहितासाठीं द्विजाची ॥११०॥
जीवप्रायाणाची सुमुहूर्तता । कीं भक्तिनवरत्नांचें तारूं बुडतां ।  कीं धैर्याचा स्तंभ खेचतां । झाला रक्षिता सुदेव ॥११॥
कीं मरतया अमृतपान । कीं अवर्षणीं वर्षे घन । दुकळलिया जेंवि मिष्टान्न । तेंवि आगमन द्विजाचें ॥१२॥
मोहअंधारीं मणि पडिला । तो युक्तीच्या हातीं चांचपडिला । न सांपडतां दीप लाविला । कृष्णगमनसुखचा ॥१३॥
यापरी आला तो ब्राह्मण । कृष्णगमनें भीमकीप्राण । घेऊनि आला संपूर्ण । जीवदानी सुदेव ॥१४॥
ब्राह्मण म्हणे नाभी आतां । घेऊनि आलों वो अनंता । देखिला गरुडटका झळकता । आनंद चित्ता न समाये ॥११५॥
आंगींची उतटली कांचोळी । मुद्रिका दाटल्या आंगोळी । सर्वांगी हरिखेली वेह्लाळी । जीवें वोवाळी द्विजातें ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP