अध्याय ४७ वा - श्लोक ५१ ते ५५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


गत्या ललितयोदारहासलीलाऽवलोकनैः । माध्व्या गिरा हृतधियः कथं तं विस्मरामहे ॥५१॥

कृष्णपरिष्वंगाकारणें । कात्यायनीव्रताचरणें । प्रथम हेमंतीं यमुनास्नानें । केलीं अरुणें नुदैजतां ॥७७॥
तया व्रताच्या शेवटीं । कृष्णें येऊनि यमुनातटीं । चीरें हरिलीं चुकवूनि दृष्टि । कदंबापृष्ठीं वळघला ॥७८॥
शीतार्दिता यमुनाजळीं । बैसोनि प्रार्थितां वनमाळी । तेणें अभीष्ट केली रळी । ते तुजजवळी सांगतसों ॥७९॥
तुम्ही व्रतस्था नग्न स्नानें । करितां घडलीं सुरहेळणें । तस्मात् प्रायश्चित्त करणें । मदनुशालनें वनिता हो ॥५८०॥
नीपानिकटीं अवघ्या जणी । येऊनि वंदावा दिनमणि । हें ऐकोनि अंतःकरणीं । करी झडपणी जनलज्जा ॥८१॥
तथापि अभीष्ट सुखाची प्राप्ति । यास्तव लज्जा ठेविली परती । निःशंक येऊनि कृष्णाप्रति । जोडल्या हस्तीं रवि नमिला ॥८२॥
तेव्हां प्रसन्न होऊनि हरि । वरद वदला अभीष्टोत्तरीं । पुण्योदयाच्या येतील रात्री । कामना पुरी तैं करीन ॥८३॥
तेथूनि आशा लागली मना । वाढली दिवसेंदिवस कामना । कृष्णें करितां वेणुगायना । भरलों वना हृतचित्ता ॥८४॥
कृष्णीं जाऊनि मिनलों कैशा । नधरत सागरीं सरिता जैशा । कृष्णसंगें क्रमिल्या निशा । त्या मानसा आठवती ॥५८५॥
वनीं जीवनीं पुलिनीं भुवनीं । श्रीकृष्णाच्या आलिंगनीं । सुख भोगिलें तें अनुदिनीं । विस्मृति मनीं पडों नेदी ॥८६॥
रासक्रीडेचीं इंगितें । श्रीकृष्णाचीं विचेष्टितें । त्यांचा विसर पाडितां चित्तें । न पडे कल्पांतीं पैं आम्हां ॥८७॥
श्रीकृष्णाची ललितगति । सस्मित उदार अपांगपातीं । सुधा न सरे तन्मधुरोक्ति । इहीं इंगितीं मन मोही ॥८८॥
चित्तें हिरोनि नेलीं ऐसीं । नुसतीं प्रेतें फिरतों पिसीं । आतां विस्मृति पडेल कैसी । निजमानसीं तूं विवरीं ॥८९॥
ऐसें बोलोनि उद्धवाप्रति । त्म्व जाकळी कृष्णास्मृति । तेणें विवश कृष्ण स्मरती । तें तूं नृपति अवधारीं ॥५९०॥

हे नाथ हे रमानाथ व्रजनाथार्तिनाशन । मग्नमुद्धर गोविंद गोकुलं वृजिनार्णवात् ॥५२॥

श्वसित म्हणती भो भो नाथा । तुज विण दिसतसों अनाथा । आम्हां जाकळी विरहव्यथा । कीं समर्था नेणसी तूं ॥९१॥
रमानाथ तूं त्रिजगद्भर्ता । कृपापांगें निवविसी आर्ता । प्रपन्नार्तिहर सुखकर्ता । आमुची वार्ता कां त्यजिली ॥९२॥
इंद्र वरुण मम कुबेर । अग्नि नैरृति वायु ईश्वर । ऐसे तुझे पादुउकाधर । आम्हां सहचर तो कीं तूं ॥९३॥
अनंत ब्रह्माण्डपालनपटु । व्रजीं अवतरूनि आम्हां निकटु । क्रीडाकौतुकें एकवटु । केलीं निपट स्निग्धत्वें ॥९४॥
सकळव्रजाचा तूं नाथ । तुवां त्यजितां व्रज अनाथ । अर्थ स्वाअर्थ्ह आणि परमार्थ । आम्हां सत्पथदर्शक ॥५९५॥
इंद्र वर्षतां सक्रोध घणवा । व्रजार्थ गिरिवर धरिला कवणा । व्रज वांचविला गिळूनि वणवा । तैं भेरी पणवा सुर वाती ॥९६॥
ऐशा अनेक व्रजार्ति हरिल्या । सुरसंपदा व्रजीं भरिल्या । प्रेमपोषका व्यक्ति धरिल्या । बहु उद्धरिल्या व्रजरामा ॥९७॥
आतां निष्ठुर जालासि कैसा । अक्रोरें नेतां दूरदेशा । हरिलें आमुचिया मानसा । तें कां परेशा नाठविसी ॥९८॥
कें प्रथुरेचा राज्यलोभ । रमानथ तूं पद्मनाभ । आमुचें पुरवूनि बालभ । कें दुर्लभ हों पाहासी ॥९९॥
गोविंद तूं गोगणवेत्ता । तरी कां नेणसी गोकुलव्यथा । आमुची जाणूनि विरहावस्था । भो व्रजनाथा ते निरसीं ॥६००॥
तूं गेलासि मथुरापुरीं । गोकुळ बुडतें भवदुस्तरीं । दुःखार्णवापासूनि तरीं । धांव मुरारि कृपाळुवा ॥१॥
हा हा करूनि चुरिती हात । कंठ दाटोनि स्फुंदती रुदत । म्हणती आमुचा प्राणनाथ । कां पां समर्थ अंतरला ॥२॥
अहा अहा रे अदृष्टा । नाहीं पुरतां सुकृतसांठा । कृष्ण भोगूनि असंतुष्टा । शेखीं संकटा वरपडलों ॥३॥
करुणवत्सला मुरारि । गोकुळ पडलें दुःखसागरीं । निष्ठुर न होईं अंतरीं । तारीं झडकरी कृउपाळुवा ॥४॥
शुक म्हणे गा परीक्षिति । ऐशा विरहिणी विलपती । उद्धवें देखोनि आपुल्या चित्तीं । म्हणे यां श्रीपति तुष्टला ॥६०५॥

श्रीशुक उवाच - ततस्ताः कृष्णसंदेशैर्व्यपेतविरहज्वराः ।
उद्धवं पूजयांचक्रुर्ज्ञात्वाऽत्मानमधोक्षजम् ॥५३॥

त्यानंतरें कौरवपाळा । कृष्णसंदेश ऐकोनि अबळा । वरपडिलिया विरहानळा । उद्धवें सकळा निवविल्या ॥६॥
कृष्णप्रणीत अध्यात्मयुक्ति । उद्धवें बोधितां बोधकशक्ती । प्रतीति येतां वनिताचित्तीं । सुखविश्रांति पावल्या ॥७॥
प्रतीति म्हणाल कैसी कोण । तरी नंदनंदन नोहे कृष्ण । ज्याहूनि अर्वाक् अक्षजज्ञान । तो हा भगवान अधोक्षज ॥८॥
आत्मा व्यापक अधोक्षज । सर्वात्मकत्वें तेजःपुंज । आपण तोचि अभिन्न सहज । हें निजगुज उमजल्या ॥९॥
जाणोनि अधोक्षज आपण । सर्वात्मकत्वें पाहती कृष्ण । ऐशा अनुभवें संपन्न । पूजिती पूर्ण उद्धवा त्या ॥६१०॥
उद्धवें त्यांचिया प्रेमभावें । विशेषप्रार्थनागौरवें । कृष्णकौतुकाविष्टजीवें । केला स्वभावें व्रजवास ॥११॥

उवास कतिविन्मासान्गोपीनां विनुदञ्छुचः । कृष्णलीलाकथां गायन्नमयामास गोकुलम् ॥५४॥

गोपिकांचें श्रमापहरण । करावयार्थ प्रेरी कृष्ण । हरि आज्ञा हे मुकुटीं धरून । उद्धव आपण स्थिर झाला ॥१२॥
सकळां व्रजौकसांची भक्ति । नंदयशोदेची ही आर्ति । जाणोनि निववी मधुरा उक्ती । हरिगुणकीर्ति वर्णूनी ॥१३॥
कृष्णगुणांचें करिती कथन । तेथें सादर करी श्रवण । प्रेमें परिसती त्यापें पूर्ण । हरिगुणवर्णन स्वयें करी ॥१४॥
ऐसा व्रजजन निजसंगती । गातां ऐकतां कृष्णकीर्ति । उद्धवें पावविली विश्रांति । अहोराती नित्य नवी ॥६१५॥
एवं कित्तेक मासवरी । उद्धवें राहूनियां व्रजपुरीं । गोपिकांचा संताप दुरी । केला यापरी कृतवर्या ॥१६॥

यावंत्यहानि नंदस्य व्रजेजऽवात्सीत्स उद्धव । व्रजौकसां क्षणप्रायाण्यासन्कृष्णस्य वार्तया ॥५५॥

नंदगोकुळीं जितके दिवस । केला होता उद्धवें वास । क्षणप्राय तो व्रजौकसांस । वाते क्लेशपरिहारें ॥१७॥
हरिगुणकीर्तनसुधापानें । नितांत निवती श्रवणें मनें । उद्धवसहवास येणें गुणें । अल्प मानणें व्रजौकसीं ॥१८॥
व्रजौकसांचें आर्तिहरण । ना तें उद्धवा प्रेम गहन । कृष्णक्रीडावनोपचरन । निवे पाहोनि तें ऐका ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP