TransLiteral Foundation

श्लोक ११ ते १५
गोपजातिप्रतिच्छन्ना देवा गोपालरूपिणः । ईडिरे कृष्णरामौ च नटा इव नटं नृप ॥११॥

गोपजातीची गवसणी । घेऊनि अनुसरले जे कृष्णीं । ते गोपाळ वृंदावनीं । देवयोनि जाणावे ॥११॥
म्हणोनि निंदेचा नेणती वारा । रंगी स्तविती येरयेरां । श्रीकृष्णा आणि बलभद्रा । सत्कारगिरा गौरविती ॥१२॥
रंगीं होता रसोत्पत्ति । नट नटांतें प्रशंसिती । तैसे गोपाळ धन्य म्हणती । राम यदुपति नाचतां ॥१३॥
बालक्रीडेचिया परी । रामगोपाळश्रीहरि । क्रीडा करिती परस्परीं । तें अवधारीं भूभुजा ॥१४॥

भ्रामणैर्लंघनैः क्षेपैरास्फोटनविकर्षणैः । चिक्रीडतुर्नियुद्धेन कामपक्षधरौ क्कचित् ॥१२॥

कोठें कोठें परिभ्रमणें । एकमेकांतें प्रतिज्ञापणें । आक्रमिती साभिमानें । बहुताडणें करचपळें ॥११५॥
एकमेकां उल्लंघिती । प्रतिज्ञामानें अतिक्रमिती । आस्फोटनें आवेशती । आकर्षिती परस्परें ॥१६॥
द्वंद्वयुद्धें मल्लयुद्धें । बाहुयुद्धें एकांगयुद्धें । क्रीडाभ्यासें करिती सिद्धें । कंसादियुद्धें साधावया ॥१७॥
चूडाकरणापूर्वील केश । त्यांतें म्हणिजे काकपक्ष । तिहीं शोभती रामरमेश । काकपक्षधर ऐसे ॥१८॥
कोठें क्षेपती परस्परें । कोठें आक्षेपिती निकरें । कोठें विक्षेपउत्तरें । अभिमानपरें बोलती ॥१९॥
ऐशा अनेक अर्भकलीला । मिथ्या क्रीडती कौरवपाळा । तैसेचि अनुसरती गोपाळा । खेळामेळा क्रीडती ॥१२०॥

क्कचिन्नृत्यत्सु चान्येषु गायकौ वादकी स्वयम् । शशंसतुर्महाराज साधु साध्विति वादिनौ ॥१३॥

कोठें नाचती गोपाळ गजरीं । तेथें रामकृष्ण ताल धरी । होऊनिया सप्तस्वरीं । गीतवाद्यें साहित्यें ॥२१॥
अन्य गोपाळ नाचती जेथ । गायक वादक होऊन तेथ । संगीतकलाकौशल्यपथें । साहित्यातें पुरविती ॥२२॥
भलाभला म्हणोनि त्यासी । स्वमुखें श्रीकृष्ण प्रशंसी । ऐसे रामकृष्ण संवगडियांसी । संतोषासी पावविती ॥२३॥
नृत्यें लाजविल्या अप्सरा । गानें गंधर्वकिन्नरां । वाय्दें सिद्धसाध्यां चतुरां । चमत्कारां चोजविती ॥२४॥

क्कचिद्बिल्वैः क्कचित्कुंभैः क्क चामलकमुष्टिभिः । अस्पृश्यनेत्रबंधाद्यैः क्कचिन्मृगखगेहया ॥१४॥

कोठें कोठें बिल्वफळा । संग्रहूनि खेळती खेळा । कोठें कुंभीफळीं आगळा । दाविती सोहळा क्रीडेचा ॥१२५॥
कोठें धात्रीफळांच्या मुष्टि । चिंतूनि प्रतिज्ञापरिपाटीं । प्रवर्ततीं निजअभीष्टीं । जिंकिल्या तुष्टि मानिती ॥२६॥
कोठें खेळती डोळे झांकणीं । एक बैसवूनि मुखरणी । नेत्र एकाचे बांधोनी । येर लपोनि राहती ॥२७॥
अवघे लपोनि ठेलिया गडी । मुखरणी त्याचे नेत्र सोडी । स्पर्शों जातां अतितांतडी । पडे मुरकुंडी गडियाची ॥२८॥
मुखरणीतें न स्पर्शितां । जरी त्या स्पर्शे पैं हुडकिता । तरी डाई आली त्याचिये माथां । चक्षु झांकविता तो होय ॥२९॥
तैसाचि हुडकी तोही पुन्हा । वेगां स्पर्शों धांवें आनां । ऐसें करोनि नेत्रपिधाना । क्रीडा नाना क्रीडती ॥१३०॥
दावूनि मृगाचे अनुकार । चेष्टा करिती कुरंगाकार । कोठें पक्ष्याचे प्रकार । चेष्टा अपार दाविती ॥३१॥

क्कचिच्च दर्दुरप्लावैर्विविधैरुपहासकैः । कदाचित्स्पंदोलिकया कर्हिचिन्नृपचेष्ट्या ॥१५॥

कोठें उडती दर्दुरा ऐसे । येरां चरणीं धरिती तोषें । त्यांच्या सोडवणेच्या मिसें । गडी विशेषें विनविती ॥३२॥
ऐशी मंडूकक्रीडारीति । राम गोपाळ श्रीपति । ठायीं ठायीं क्रीडताती । बालचरितीं संमत जें ॥३३॥
एकमेकां उपहासवाणी । बोलती कैतवें ठकूनी । ठकल्या हांसती आनंदोनी । अवघे मिळोनि एकातें ॥३४॥
कित्तेक साखर वदनीं माती । ऐसें एकातें पुसती । तेणें दावितां अवघे म्हणती । इतुकी माती या वदनीं ॥१३५॥
ऐशा अनेक व्यंग्योक्ति । मिथ्या बोलोनि उपहासिती । कोठें हिंदोळां वळंघती । हालविती येरयेरां ॥३६॥
वटवृक्षाच्या पारंविया । त्यांच्या करोनि हिंदोळिया । परस्परें देती पाळिया । बैसोनियां त्यांवरी ॥३७॥
चाळीस पन्नास एक एका । बैसतां मोजिनि देती झोका । ऐशा पाळिया पृथकपृथका । गोपदारकां समस्तां ॥३८॥
कोठें नृपाचिये क्रीडेपरी । सिंहासनावरी श्रीहरि । बैसवोनि सर्वोपचारीं । गोपकुमारें वोळगिजे ॥३९॥
सचिव प्रधान अमात्य मंत्री । एक होती वेत्रधारी । एक पृथक नियोगाचारी । स्वयें अज्ञाधारी म्हणविती ॥१४०॥
देश दुर्ग भांडागार । एक म्हणविती सेनाधर । एक वार्तिकि चार हेर । एक किंकर वोळगणे ॥४१॥
चामर पादुका आतपत्र । एक धरिती निशाण छत्र । एक दुंदुभि वाजंत्र । चित्रविचित्र वाजविती ॥४२॥
ऐशा अनेक राजचेष्टा । दावूनि मानिती अभीष्टा । तें सुख दुर्लभ नीलकंठा । नेणें स्रष्टा स्वप्नींही ॥४३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-05-01T20:40:49.6530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

coopt

  • सहकारी करून घेणे 
RANDOM WORD

Did you know?

हल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.