अध्याय १५ वा - श्लोक ३४ ते ३८

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


बलस्य लीलयोत्सृष्टखरदेहहताहताः । तालाश्चकंपिरे सर्वे महावातेरिता इव ॥३४॥

जो कां सगळा ब्रह्मांडगोळ । मौळीं वाहे जैसा तीळ । तो हा एथ प्रत्यक्ष बळ । रोहिणिबाळ म्हणवीतसे ॥८॥
तेणें एथ लीलेंकरून । केलें दैत्यनिबर्हण । देहपातें ताल भग्न । तेणें वन विध्वंसिलें ॥९॥
धेनुकदेहें पडिले ताल । ते अन्य तालांसि झाले काळ । चंडानिळें पक्कपिंपळ । होय विदल ज्यापरी ॥२१०॥
ऐसें सकंप तालवन । झालें एथें आश्चर्य कोण । राया प्रत्यक्ष संकर्षण । श्रीभगवान अनंत ॥११॥

नैतच्चित्रं भगवति ह्यनंते जगदीश्वरे । ओतप्रोतमिदं यस्मिंस्तंतुष्वंग यथा पटः ॥३५॥

जो या जगाचा ईश्वर । म्हणोनि म्हणिजे जगदीश्वर । तो उत्पत्तिस्थितिसंहार - । कर्ता साचार स्वसत्ता ॥१२॥
जो या जगाचें उपादान । विश्वीं एकला दुजेनवीण । ओतप्रोत तंतुपूर्ण । जो अभिन्न विश्वपटीं ॥१३॥
व्याप्यव्यापक ओतप्रोत । ज्याच्या ठायीं आभासत । आडवा उभा तंतु सत्य । रूपा येत पटत्वें ॥१४॥
तैसा विश्वीं विश्वात्मक । जो अनंत एकला एक । सताल भंगिला धेनुक । हें कौतुक त्या किती ॥२१५॥

ततः कृष्णं च रामं च ज्ञातयो धेनुकस्य ये । क्रोष्टारोऽभ्यद्रवन्सर्वे संरब्धा हतबांधवाः ॥३६॥

ऐसा मारिला धेनुकासुर । त्यानंतरें ज्ञाति इतर । धेनुकातुल्य महाशूर । पैं अपार क्षोभले ॥१६॥
मारिला देखूनि आपुला बंधु । तेणें अवघेचि सक्रोधु । रामकृष्णांप्रति क्षुब्ध । धांवती युद्ध करावया ॥१७॥
ऊर्ध्वमुखें चौताळती । अवघे आक्रोशें भुंकती । पुडिलांपायीं टांफरती । डसों धांवती संवगडियां ॥१८॥

तांस्तानापततः कृष्णो रामश्च नृप लीलया । गृहीतपश्चाच्चरणान् प्राहिणोत्तृणराजसु ॥३७॥

नृपासि म्हणे शुक भगवान् । रामकृष्ण लीलेंकरून । सक्रोध येतां रासभगण । सरसावूनि ऊठिले ॥१९॥
गोपाळांचा देखूनि भार । त्यावरीं सक्रोध पडतां खर । रामकृष्ण त्यांसमोर । होऊनि सत्वर हांकिती ॥२२०॥
डसों धांवती पाडोनि कान । टांफरिती ते लववूनि मान । कुत्सित शब्दें भरिती गगन । वताळ फिरूनि हाणिती ॥२१॥
तंव ते प्रतापजगजेठी । मागील चरण धरूनि मुष्टीं । देऊनि शतवार घरटी । तालामुकुटीं झुगारिती ॥२२॥
एकामागें एक खर । ऐसे टाकिती शतसहस्र । तेणें तृणराज समग्र । झाले चकचूर भंगोनी ॥२३॥

फलप्रकरसंकीर्णं दैत्यदेहैर्गतासुभिः । रराज भूः सतालाग्रैर्धनैरिव नभस्तलम् ॥३८॥

रासभदैत्यांचीं शरीरें । पडतां मोडतीं तालाग्रें । फळें कोमळें शुष्क निबरें । चित्रें विचित्रें मिश्रितें ॥२४॥
नीलतालाग्र सपत्र । त्यांमाजीं रासभदेह धूसर । वमितरक्तें अरुणतर । फळें प्रचुर त्यांमाजीं ॥२२५॥
जैसे हस्तचित्रांचे मेघ । निळे धवळे विचित्ररंग । तैसा शोभला भूभाग । खरप्रेतादि तालफळीं ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP