अध्याय १० वा - श्लोक ८ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नारद उवाच - न ह्यन्यो जुषतो जोप्यान् बुद्धिभ्रंशो रजोगुणः । श्रीमदादाभिजात्यादिर्यत्र स्त्रीद्यूतभासवाः ॥८॥

नारद म्हणे आपुल्या मनीं । मदोन्मत्ता केवढी हानि । स्वहित भंगे नुपजे ग्लानि । वृथा जन्मोनि मरताती ॥३२॥
दृष्ट अष्ट मदांची मांदी । बळें ओळंघली ज्यांचिये खांदीं । ते पुरुष तिहीं घातले बंदी । असाध्य द्वंद्वी हे त्यांचे ॥३३॥
कुल शील आंगीचें बळ । विद्या वयसा लावसा लावण्य अष्ट मदांची थाटी । जगाचे झोंबोनि कंठी । स्वहितगोष्टी विसरवी ॥३४॥
एका रजोगुणाचिये पोटीं । ऐशी अष्ट मदांची थोटी । जन्मोनि जगाचे झोंबोनि कंठीं । स्वहितगोष्टी विसरवी ॥१३५॥
केवळ रजोगुणें । ज्याचेनि प्रपंची जग शाहणें । त्यामाजीं कामें घालूनि ठाणें । निजांगवणें जग झोडी ॥३६॥
कामिल्या ऐसें जोडे आमिष । तेथ लोभाचा होय प्रवेश । जेथ कामना होय फोंस । क्रोधावेश ते ठायीं ॥३७॥
पूर्णकामें खवळे मद । अपूर्ण काम शोकप्रद । ऐसें मोहसंतानवृंद । अवघें विशद रिपुषट्क ॥३८॥
प्राणप्रवृत्ति शरीर । दीपें प्रकाशें मंदिर । तेंवि श्रीमदें हे दुर्विकार । दुष्ट अघोर खवळती ॥३९॥
राग तृष्णा संग लोभ । इत्यादि रजोगुणांचा क्षोभ । देहाभिमानाचें करी थोंब । दृश्यदंभ दृढावी ॥१४०॥
पंचप्राण दशविधकरणें । प्रकाशूनि रजोगुणें । साच दृश्याचें केले जिणें । विषयभानें भुलवूनी ॥४१॥
झालिया दृश्याचा उभारा । काम वावरे इंद्रियद्वारां । विषयलोभें द्वेष खरा । भेदासि थारा जगभरी ॥४२॥
एक मध्यस्थ एक द्वेष्य । एक इतर एक पोष्य । एक बंधु एक वंश्य । तोष्य पोष्य ज्योष्यादि ॥४३॥
एक सुहृदय एक मित्रु । एक उदास एक शत्रु । एक पापात्मा एक पवित्रु । भेद विचित्र हा ऐसा ॥४४॥
आपणा मानूनि शरीरमात्र । माझें म्हणे कलत्र पुत्र । आप्त स्वजन कुल गोत्र । वृत्तिक्षेत्र दृढममता ॥१४५॥
संपादल्याचा रक्षणलोभ । संपादावया वृत्तिक्षोभ । तोचि स्वार्थाचा समारंभ । देहवालभ रूढवी ॥४६॥
मजचि असावें वृत्तिक्षेत्र । माझे विजयी व्हावे पुत्र । विश्वीं व्हावे महत्त्वपात्र । पदार्थमात्र मज व्हावे ॥४७॥
गाणें नाचणें वाचणें । ऐशीं अनेक चतुरपणें । स्वार्थें कवळिला रजोगुणें । आपणा होणें अभिलाषी ॥४८॥
नाना व्यवसायदक्षता । मजचि असावी तत्त्वता । वीर्यशौर्यविख्यातता । विश्वपूज्यता मज व्हावी ॥४९॥
घवघविता विष्ठा देखे बिदीं । तेथ परावे पशु येऊं नेदी । आपुल्या भक्षावें चतुष्पादीं । स्वार्थबुद्धि एथवरी ॥१५०॥
अनेकपरीचा स्वार्थविशेष । अष्टमदाचा हव्यास । करूनि वाढवी रागद्वेष । रजें पुरुष कवळिला ॥५१॥
मंदिरें करावीं पाचबंदी । स्रक्चंदनभोगसमृद्धि । स्वयें भोगावया शत्रुमांदीं । मर्दूनि द्वंद्वी प्रतिकूळ ॥५२॥
ऐशी उदंड करिती हांव । परी ईश्वराची अगाध माव । ज्या प्राण्याचें जैसें दैव । तितुकें वैभव तो भोगी ॥५३॥
तस्मात् सर्वांमाजि क्रूर । श्रीमदचि परम थोर । याच्या बळें अवघे येर । होती सधर दुर्मद ॥५४॥
सर्वही दुर्मदांचा भार । सेव्य मानूनि कवळी नर । तथापि बुद्धीचा अंकुर । विचारपर तेथ उरे ॥१५५॥
तेथ श्रीमदाचा आवेश । तत्काळ करा बुद्धिभ्रंश । म्हणाल त्याचाचि कां उत्कर्ष । तो विशेष अवधारा ॥५६॥
एक श्रीमदाच्या पोटीं । स्त्री मद्य द्यूत हे त्रिपुटी । जीमाजीं अपार विकारकोटी । जेणें उठाउठी बुद्धि भ्रंशे ॥५७॥
तेथें बुद्धिभ्रंशतेची थोरी । स्वयें देवर्षि जेंवि विवरी । एथ जाणोनि विवेक चतुरीं । पुन्हा ते परी न करावी ॥५८॥

हन्यन्ते पशवो यत्र निर्दयैरजितात्मभिः । मन्यमानैरिमं देहमजरामृत्युनश्वरम् ॥९॥

श्रीमदांध झालिया बुद्धि । तैं विसरती स्वहितशुद्धि । जरामरण आधिव्याधि । हे त्रिशुद्धि न गणिती ॥५९॥
अजर अमर मानूनि देह । स्वैराचरणीं धरिती मोह । विषयभोगांचा प्रवाह । तेणें निर्वाह मानिती ॥१६०॥
परांचीं हरिजती दारा सदनें । जीवें घेऊनि धनापहरणें । निर्दयपणें पशु मारणें । दुष्टीं करणें हीं तीन्ही ॥६१॥
पिंडपोषणाचिये चाडे । मन सैराट धांवे जिकडे । दुष्टीं तिहीं तें कीजे कोडें । सहसा कुडें न म्हणोनि ॥६२॥
दिविभोग अप्सरामैथुन । वांछूनि अनावर धांवे मन । निर्दयें करूनि पशूंचें हनन । म्हणती यज्ञ विधिप्रणीत ॥६३॥
प्रवृत्तिज्ञानें वेद पढले । दिविभोगार्थ स्वर्गीं चढले । ऐसे भवार्णवीं जे पडले । ते नाडले श्रीमदें ॥६४॥

देवसंज्ञितमप्यन्ते कृमिविड्भस्मसंज्ञितम् । भूतध्रुक् तत्कृते स्वार्थं किं वेद निरयो यतः ॥१०॥

जाणोनि देहमात्र स्वयमेव । नृपति म्हणविती मनुष्यदेव । दीक्षित म्हणविती भूदेव । ऐसें वैभव ज्या देहा ॥१६५॥
ऐसाही देह पडतां अंतीं । ऐका तयाची परिणामगति । श्वानजंबुकादिक भक्षिती । ते हागती तैं विष्ठा ॥६६॥
अथवा अग्नि क्रव्याद नाम । दग्ध करी तैं ते भस्म । हें द्विविध चुकल्या वर्म । कृमीचें धाम दुर्गंधि ॥६७॥
ऐसा कुत्सित देह आपण । मानूनि धरिती देहाभिमान । भूतद्रोही होती पूर्ण । यथेष्टाचरण करूनी ॥६८॥
भोगावया स्वैर भोग । हिम्साचरणें द्रोहिती जग । ऐसा श्रीमदाचा प्रसंग । विवेकमार्ग विसरवी ॥६९॥
जिव्हालोभें वधिती पशु । द्रव्यलोभें हिंसादोषु । जारकर्माचा हव्यासु । आणि विशेष मद्यादि ॥१७०॥
ऐसे केवळ देहाभिमानी । भूतद्रोही मद्यपानी । भूतद्रोहें निरयश्रेणी । घडे निदानीं भोगणें ॥७१॥
ऐसा श्रीमदांध जो झाला । तो काय जाणें स्वार्थ आपुला । नेणे म्हणोनि द्रोह केला । नरक जोडिला देहलोभें ॥७२॥
देह कोणाचा न विचारूनी । अहंतादात्म्यें कौटाळूनी । श्रीमंदांधावीण हे करणी । इतर कोणी नाचरती ॥७३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP