अध्याय ३ रा - श्लोक १४ ते १६

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


स एव स्वप्रकृत्येदं सृष्ट्वाग्रे त्रिगुणात्मकम् । तदनु त्वं ह्यप्रविष्टः इव भाव्यसे ॥१४॥

देवकीगर्भीं सामावलों । देहधर्मीं निबद्ध झालों । जन्ममरणा सांपडलों । शुद्ध निघडलों कैं म्हणसी ॥४८॥
तरी सूर्य जैसा प्रकाशबळें । उजळी भूमंडळींचीं जळें । तेथें उपजवी प्रतिमंडळें । म्हणती अबळें तत्प्रविष्ट ॥४९॥
तैसा आदिअंतीं एकला एक । स्वमाया विश्व त्रिगुणात्मक । सृजूनि प्रवेशला म्हणती मूर्ख । हीनविवेक अल्पज्ञ ॥२५०॥
जेंवि आकाश एकलें एक । स्वयें प्रसवोनि जेंवि उदक । व्योमा करी त्रिगुणात्मक । तो विवेक अवधारा ॥५१॥
एक वास्तव व्योम असे । दुसरें सोडुगण बिंबलें दिसे । तिसरें जलगर्भीं बिंबलें असे । जलावकाशें कोंदलें ॥५२॥
तैसा तूं प्राकृत त्रिपुटी - । माजीं प्रविष्ट मूढदृष्टि । भाससी परी ते प्राकृत गोष्टी । सत्यसंतुष्टि अप्रविष्ट ॥५३॥
दृशीं अप्रविष्टची तूं हरि । भाससी प्रविष्टाचियेपरी । जेवीं नभ घटामाझारीं । प्रविष्टासरी भासतें ॥५४॥
घटजन्मापूर्वीं नभ । घटभंगींही स्वयंभ । माजीं प्रवेशलें हें भाव । भ्रांति सगर्भ जाणिवा ॥२५५॥
देहात्मभावने भुललें । दृश्य ममत्वें घेतलें । स्वात्मविचारीं सूतलें । प्रविष्ट जालें तें म्हणती ॥५६॥
येचि अर्थाचा विवेक । बोले दृष्टांतें श्रीशुक । सादरचित्तें पारमार्थिक । श्रोते निष्टंक परिसोत ॥५७॥

यथेमेऽविकृता भावास्तथा ते विकृतैः सह । नानावीर्याः पृथग्भूता विराजं जनयन्ति हि ॥१५॥
संनिपत्य समुत्पाद्य दृश्यन्तेऽनुगता इव । प्रागेव विद्यमानत्वान्न तेषामिह संभवः ॥१६॥

जैसे हे अविकृत भाव । अष्टधा भेदें ज्यांचें नांव । ते विकारीं मिळोनि सावयव । विराटप्रभव करिताती ॥५८॥
ते किमर्थ विकारीं मिळती । ऐशी आशंका कोणी करिती । तरी पृथक्त्वें समर्थ नव्हती । कार्यप्रवृत्तिवैशिष्ट्यें ॥५९॥
म्हणोनि विकारेंशीं सन्निपात । पावोनि जाले एकीभूत । मग विराट रचिलें त्यांत । प्रविष्टभास ज्यापरी ॥२६०॥
तरी अविकृत भाव कोण । विकाराचें काय लक्षण । हें उमजे जैसें निरूपण । सावधान परिसावें ॥६१॥
अव्यक्त महत्तत्व अहंकार । आणि महाभूतांचा विस्तार । हें प्राकृताष्टक निर्विकार । नोहे स्वतंत्र कार्यपटु ॥६२॥
जेवीं वृक्षगुल्मलतांचा कंद । तेथूनि मूळें फुटती अध । अंकुर फुटोनि वाढे ऊर्ध्व । हेतु मध्य दोहींचा ॥६३॥
तेंवि प्रपंचाचें बीज । अव्यक्तचि राया बुझ । दोहीं सवा वृद्धि तुज । उमजे गुज तें ऐकें ॥६४॥
ईश्वराचा देह कारण । तोही अव्यक्तचि जाण । तेथूनि महत्तत्त्वादि अभिवर्धन । भूतादि भिन्न भौतिकें ॥२६५॥
तैसेंचि अपरोक्ष ज्ञान केवळ । होतां चित्तशुद्धि निर्मळ । तें मनोजयाचें योगबळ । लाहोनि प्रांजळ उदैजे ॥६६॥
तेव्हां अव्यक्त भेदूनि देहकारण । चौथें तुरीय जें विज्ञान । जें कां स्वस्वरूपानुसंधान । शुद्धस्फुरण ब्रह्मात्मकत्वें ॥६७॥
जहदजहल्लक्षणातीत । सोलींव सच्चिदानंदभरित । उन्मनी ऐसें योगी म्हणत । स्फुरणातीत जालिया ॥६८॥
एकीसवा हें मूळ वाढे । एकीसवा प्रपंच विरूढे । भूत भौतिक कांडेनकांदें । अव्यक्तबुडें प्रसविजे ॥६९॥
तें अव्यक्त म्हणजे महद्ब्रह्म । शबलमाया हें त्याचेंचि नाम । मूळ अन्यान केवळ तम । बीजभ्रम अव्याकृत ॥२७०॥
तामस अभिमान रुद्र । शून्यचि व्योम निर्विकार । तेथें कल्पनेचा शून्यांकुर । तो शीतळ समीरचांचल्यें ॥७१॥
तेथ निश्चयेंशीं सत्ता स्पुरे । तेचि झळकोनि तेजाकारें । तृतीय भूत जालें खरें । परस्परें पृथक्त्वें ॥७२॥
चांचल्यगर्भींचें शीतळ । तेजें द्रवोनि जालें जळ । सर्वजीवबीज पघळ । प्लावनशीळ तें आप ॥७३॥
विसर घनावोनि दृढ । निद्रा होय गाढमूढ । कां धूम्र दाटोनि निबिड । होती वाड मेहुडीं ॥७४॥
परिमळ होय पोतांस घन । कां सिंधुतोया लवणपण । नानास्वातीचें जीवन । होय कठिण मुक्तत्वें ॥२७५॥
तैशी अविद्याशक्ति नाथिली । भूतभ्रमें कालवली । उत्तरोत्तर घनावली । धारण्यें जाली ते धरणी ॥७६॥
लोळी नसतां न वाजे घांट । फांसे नसतां सारिपाट । सूत्रेंवीण रितें काष्ठ । पडे अचेष्ट सायखडे ॥७७॥
तैसा अव्यक्तादि पृथ्वीवरी । प्राकृत सर्ग हा अविकारी । पृथक्त्वें अनुपकारी । कार्यविचारीं वैशिष्ट्यें ॥७८॥
व्योम असोनि कोणा ठावें । वायु असोनि कोणा शिवे । तेजें कोणा प्रकाशावें । कोणें प्यावें जीवन ॥७९॥
कोणा पृथ्वीचा आधार । कोणा आमोदस्वीकार । नोहे विशिष्ट कार्यपर । हा सर्ग अविकार पृथक्त्वें ॥२८०॥
एवंभाव हे अविकार । आतां ऐकावे विकार । जे षोडश म्हणे भाष्यकार । उपनिषदाधार मांडूक्य ॥८१॥
गर्भोपनिषद्व्युत्पत्ति । गारुड प्रेतकल्प पिंडोत्पत्ति । तैसेचि सांख्याचिये मतीं । विकार वदती पंचवीस ॥८२॥
तेथ व्यापक विष्णु जाण । तोचि सात्त्विक अभिमान । ईश्वराचा लिंगदेह जाण । ज्या अभिधान हिरण्यगर्भ ॥८३॥
तें प्राकृताचेंचि विकृत । ऐका तयाचा वृत्तांत । तरी व्यापक विष्णु एथ । आकाश होय अंतःकरण ॥८४॥
तो विपरीतज्ञानाचा अधिष्ठाता । वास्तव ज्ञान निष्कामभक्ता । ऐसें द्वैविध्य जो प्रतिपादिता । निर्विकल्पता सविकार ॥२८५॥
अरणिगर्भाग्नि अविकार । कुंडीं गुप्त तो सविकार । इंधनस्पर्शें अतिसत्वर । बहुप्रकार प्रकाशी ॥८६॥
तैसा महदाकाशींचा कूटस्थ । जैसा तैसा सर्वदा स्वस्थ । अंतःकरणाकाशींचा दीप्त । होय निमित्त इंधनें ॥८७॥
ज्ञानाज्ञान द्विप्रकार । बंधमोक्ष सारासार । नानायोनिसर्गसंसार । स्फुरणाधार ते ठायीं ॥८८॥
तेथील शीतल प्रकाश । तोचि चंद्रमा सोल्हास । त्याचि सुखाचा अभिलाष । भवाभास उपजवी ॥८९॥
अयथार्थ ज्ञानें जैसें बाळ । चंद्र म्हणोनि कवळी जळ । प्राप्तिसंकल्प होय विफळ । करी तळमळ जळमग्नें ॥२९०॥
प्रबुद्ध पाहे साचार बिंब । भोगी स्वानंदाचा लाभ । नानासंकल्पविकल्पक्षोभ । वायुगर्भ ऐसाची ॥९१॥
मनश्चंद्रींचा आनंद । विषयीं भावूनि रमती मुग्ध । ते पावती नाना खेद । कर्मबंध भवस्वर्गीं ॥९२॥
ज्ञानी लक्षूनि मनश्चंद्रा । हरिती क्षुधा तृषा निद्रा तंद्रा । पावती कैवल्यसाम्राज्यभद्रा । सुखसमुद्रा सेविती ॥९३॥
सुखचि होऊनि सुखीं मिळती । पुढती भेदा नातळती । त्यांचे विकार हे अघळे गळती । कैसेनि कळती मग कोणे ॥९४॥
सत्वगर्भी रजाचा अंश । तो हा मनोरूपें करी लसलस । संकल्पचेष्टा बालकास । तैसें मनास चांचल्य ॥२९५॥
तेथ तमाचें अल्प मेळवण । पडतां घणावे चांचल्य पूर्ण । तेव्हां उमजे शहाणपण । तें रूप जाण बुद्धीचें ॥९६॥
पूंस लावितां वावडीस । गगनीं करी नीट प्रवेश । पूंस तुटलिया निःशेष । खाय विशेष गोल्हांटें ॥९७॥
जैशी वळवंटाची खिरी । रुचे लवणाच्या संस्कारीं । पयाज्यशर्करा गोडिरी । असतां पुरी रुचेना ॥९८॥
जैसें दोहींसवा भिंग । न करी कोण्हीच उपयोग । तेथ पृष्ठभागीं देतां रंग ।होय अव्यंग दर्पण ॥९९॥
तैसें तमाचेनि संमिश्रलेशें । सत्त्वीं विपरीत ज्ञान प्रकाशे । तेव्हां प्रियाप्रिय निश्चयावेशें । तोषरोषें तापिजे ॥३००॥
बालक अज्ञान बुद्धीविणें ।मिंदा स्तुति दोन्ही नेणे । तोंवरी तोषरोषांचें जिणें । रूपा येणें करीना ॥१॥
बुद्धि उठतां तेचि । देहीं । प्रियाप्रियाच्या निश्चयीं । प्रियें तोषे चंद्रोदयीं । तापवी अप्रियीं रविप्रभा ॥२॥
एवं सत्यासत्यनिवाडा । माजीं बुद्धीचिया उजिवडा । शीतोष्णतेजें केला पुढी । दोहीं कडां रविचंद्र ॥३॥
तोषचंद्रें आनंद धवळे । रोषसूर्यें सर्वांग पोळे । एवं चंद्रसूर्य मोकळे । निश्चळबळें उजळले ॥४॥
कृतनिश्चयाचें साधन । त्यागभोगीं अनुसंधान । सर्व कार्याचें चित्त जीवन । आपोनारायण या हेतु ॥३०५॥
तेणें साधन आविष्कारें । अभिमान संभ्रमें वोथरे । अन्यव्यावृत्तिसंहारें । क्षोभें भरे तो रुद्र ॥६॥
ऐसा सात्त्विक विकारसर्ग । कर्तृसंज्ञेचा हा भाग । नसतां करणांचा संयोग । तोंवरी व्यंग अवघाची ॥७॥
त्यालागीं क्षोभोनि रजोगुण । त्रिविध करणांचें निर्माण । चेष्टा ज्ञान क्रिया करण । हा सर्ग जाण वैकारिक ॥८॥
मनाचें चांचाल्य निवडून । झालें पंचधा चेष्टाकरण । व्यान समान उदान । प्राणापान इत्यादि ॥९॥
बुद्धि निश्चयें प्रकाशमान । तेंचि पंचधा चेष्टाकरण । श्रोत्र त्वक् चक्षु जिव्हा घ्राण । बाह्यज्ञान इहीं पांचें ॥३१०॥
इहीं प्रपंच साच वाते । जीवचैतन्या सुखदुःख भेटे । मन भांबावे इयावाटे । मानी गोमटें विषयांतें ॥११॥
तैसें चित्तानुसंदानें । प्रवर्त्तती क्रियाकरणें । वाक्पाणिपादशिश्नें । गुदाभिधानें पंचधा ॥१२॥
ऐसा राजस वैकारिक । सर्ग जालिया सम्यक । मग उभारे भ्रामक । तमात्मक तो ऐका ॥१३॥
जैसा मुळींचा जोंधळा । तोचि विरूढोनि कणसा चढिला । परिणमोनि रूपा आला । जाणों मागिला तोचि हा ॥१४॥
कां दिठी धांवतां पोकळीं । नभीं भूमिका कैंची काळी । नेत्रभ्रमें आरोपिली । जेवीं नाथिली स्वप्रभा ॥३१५॥
कां दर्पणींचा मुखाभास । कां पर्वतदरीचा प्रतिघोष । तैसा साजील तमावेश । विषयाभास विस्तारी ॥१६॥
पांचभौतिकें त्रिगुणात्मकें । कर्त्तृकरणें जें सात्त्विकें । तींचि होती विषयोन्मुखें । चिदात्मकें प्रकाशें ॥१७॥
राजससर्ग तेंचि ज्ञान । तामस ज्ञेयत्वें भासोन । कर्त्ता भोक्ता ज्ञातेपण । कर्त्तृकरणीं उभारी ॥१८॥
ते पंचभूतांचे विशेष । शब्द स्पर्श रूप रस । गंधादिक जे तामस । ज्ञेय यांस म्हणावें ॥१९॥
ऐसे पंचवीस विकार । मिळोनि हिरण्यगर्भशरीर । षोडश म्हणती भाष्यकार । तो प्रकार अवधारा ॥३२०॥
क्रिया ज्ञान चेष्टाकरणां । मनासहित षोडश जाणा । मनाचिमाजीं अंतःकरणा - । दिक अवघींच जाणावीं ॥२१॥
आपणामाजीं जें विकारे । त्यासिच विकार म्हणणें खरें । माजिल्या भ्रमें बाह्य स्फुरे । म्हणोनि तन्मात्रें त्यागिलीं ॥२२॥
स्थानु कल्पूनिया पुरुष । भयविकार अंतरास । स्थाणु नेणे त्या भयास । तेवीं विषयांस जाणिजे ॥२३॥
माजील सकाम विकारें । स्वप्नीं कामिनी अवतरे । संगीं आपुलें वीर्य क्षरे । परी तीस लेंकुरें न होती ॥२४॥
एवं षोडश विकार । त्यासि भाविजे अविकार । सन्निपातें एकाकार । विराटशरीर उभविलें ॥३२५॥
ते या विकारीं अविकारभाव । प्रवेशले गमती सावयव । परी ते जैशी अवघी माव । तो अभिप्राव अवधारीं ॥२६॥
महदादि पूर्वींच विद्यमान । सन्निपातें गमती अभिन्न । ते प्रविष्ट म्हणती अज्ञ । जाणती सर्वज्ञ अप्रविष्ट ॥२७॥
विकारापूर्वीं ते अविकार । विकारलोपीं तैसेंचि स्थिर । माजीं प्रवेशले हा विचार । मूर्ख साचार मानिती ॥२८॥
आकाश निर्विकार पूर्वींच असे । मध्य घटमठादि आभासे । माजीं प्रवेशलें ऐसें भासे । घटादिनाशें न नासे तें ॥२९॥
एवं दृष्टांत व्युत्पत्ती - । सारिखा म्हणों जरी श्रीपति । तरी हे अवघीच प्रकृति । तूं परंज्योति परमात्मा ॥३३०॥
दार्ष्टांत म्हणजे उंच माडी । तेथ दृष्टांत लावूनि शिडी । प्रमेय वस्तु जे अवघडी । तिची जोडी त्या यत्नें ॥३१॥
गुंजेसमान तुकिजे सोनें । कीं सूर्यनाम मसी लेखणें । तैसेंच हेंही दृष्टांत देणें । श्रीभगवानें मानिजे ॥३२॥
एवं भाव जे प्राकृत । ते सृष्टीपूर्वींच कारणीभूत । सृष्टीउपरी त्या प्रवेश तेथ । हें अघटित ज्यापरी ॥३३॥
करूनि दृष्टांता शेवट । तैसाचि तूंही अप्रविष्ट । हें दार्ष्टांती योजी स्पष्ट । वक्ता श्रेष्ठ शुकमुनि ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP