शाहीर हैबती - लग्नाविषयीं

सहदेव - भाडळी ज्योतिषमतावर हैबतीबुवा घाडगे यांचीं कवनें.


( लावणी )
सहदेव मतावरुनि दाखले पहा याची चौकशी ।
वर्जवार तिथि नक्षत्रावर लग्नें देतां कशीं ॥ध्रु०॥
बुधवारी अष्टमी हस्त नक्षत्र आलें जरी ।
तरी लग्न देऊं नका काळ पडेल दोहीं घरीं ।
गुरुवारीं रेवती आणिक पहा दशमी आली जरी ।
नवरी अथवा नवरा मरेल तिथ संभाळा बरी ।
बिजे उत्तरा आदितवारा वर्‍हाड पडतील फशी ।
वर्जवार तिथी नक्षत्रांवर लग्नें देता कशीं ॥१॥
सोमवारी चौथ स्वाती तरी लग्न देऊं नका ।
पहायची कल्पना दोहीं घरी बसेल कीं हो धका ।
मंगळवारी षष्टी अनुराधा वारस तिथ घेऊं नका ।
विहीण किंवा व्याही मरतिल पुढें मारतिल हका ।
शुक्रवारीं अनुराधा वारस विघ्न करविली पाशीं ।
वर्जवार तिथी नक्षत्रांवर लग्न देतां कशीं ॥२॥
सोमवारी पुष्य पुनर्वसु पाडवा येईल ।
अनर्थ होईल पुढें नवरीचा बाप विष खाईल ।
तिजेस पडती तीन उत्तरा वरा नाश होईल ।
मूळ शनिवार किंवा रविवार उभयतांस खाईल ।
भरणी रोहिणी मंगळवारीं काळ उभयतां पाशीं ।
वजवार तिथि नक्षत्रांवर लग्नें देतां कशी ॥३॥
घातवार घातचंद्र टाकून निष्पंचक उत्तरा ।
त्यापरि लग्नें द्या सांभाळूण तरिच ज्योतिषी खरा ।
कवि हैबती म्हणे पंचांग पाहुनी गणती करा ।
तंत्र मंत्र तांत्रिक याची ओळख कांहीं धरा ।
आळस करूं नये शाहिरा का डोळे झाकशी ।
वर्जवार तिथी नक्षत्रांवर लग्नें देतां कशी ॥४॥


लग्नाविषयीं
( लावणी )
भाडळीचा तो होरा ऐका लक्ष्य देऊन अंतरीं ॥
ज्योतिष ऐका तुम्ही सत्वरीं ॥ध्रु०॥
पूर्ण ज्योतिषी असेल त्यानें पाहावी वेळ घटिका ॥
करूं नये आळस पडेल तो फिका ॥
दिवस रात्रीं आठ वेळेचा विचार करीं तूं निका ॥
पाहूं नका काळाच्या कौतुका ॥
जरा मनामधिं शांत होऊनी तिथि नक्षत्रादिका ॥
नाहीं तर कार्या बसेल तो धका ॥
वार योग कर्णाचा मुहूर्त ध्यानीं आणी चालका ॥
पहा जरा कार्या लागेल बुका ॥
सत्य बोलावें म्हणे हैबती ज्योतिषाची टिका ॥
सहदेव सांगे भाडळी आका ॥
चंद्रबळ पाहुनी कार्या जाईं तूं सत्वरी ॥
ज्योतिष ऐका तुम्ही सत्वरीं ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP