TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

शाहीर हैबती - रामायण

शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.


रामायण
( उत्तर )
पिंडीं कोण दैवते रामलक्ष्मण भरतासी ।
याचा पर्या कसा सांगतो निवडुन अर्थासी ॥ध्रु०॥
पिंड तीन तांदुळ साठ वीस होते एकांत ।
त्यांत साठ दैवतें पुढें सांगीत यमकांत ।
एक पिंड तो दोन शतेंच्याळीस जव जोकांत ।
सवा तोळा वजन असे आहे वाल्मिक श्लोकांत ।
ऐकावी दैवते ग्रन्थ अन्वयी मतितार्थासी ॥१॥
नवनारायण भास्कर दहावा दैवत रामासी ।
शेषी मंगळ गण अष्ट असे भरताचे नामासी ।
वरुण अष्टवसु कुबेर शत्रुघन आजमासी ।
पुढील दैवते आतां परीसावीं वचनार्थासी ।
याचा पर्या कसा सांगतो निवडुन अर्थासी ॥२॥
सत्वचिरंजीव रुद्र एकादशी मारुतिची भरती !
विवेक भक्ति दोन्ही विज्ञातील पूर्विच अवतरती ।
बिभिषण त्रिजटा दोनोसी ते त्यातील जमा धरती ।
मूळ काव्यार्थ अन्वये शुकाचार्याची टिका वरती ।
समजीची खुण पाहावी शिवरामायण ग्रंथासी ॥३॥
तांदुळ दैवत पिंड वजन कथिले अर्थावरून ।
नये प्रत्ययांतरीं घ्या ग्रन्थीं शोध करून ।
कवि हैबती करि कवन ग्रंथाची सड धरून ।
नाथनिरंजन वरद अक्षर येति रसभरून ।
कृपा आहे परिपूर्ण मने आठवि गुरुनाथांसी ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-03-16T03:45:37.9630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नकशान

  • न. ( कु .) नराणी ; नखें काढावयाचें हत्यार . ( नख . नखजान .) 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site