श्रीमहालक्ष्मीची आरती

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरूपें तूं स्थूलसूक्ष्मीं ॥धृ०॥
करविरपूरवासिनी सुरवरमुनिमाता ॥ पुरहरवर्दायिनी मुरहर प्रियकांता । कमलाकारे जठरीं जन्मविला धाता । सहस्रवदनी भूधर न पुरे गुण गातां ॥१॥
मातुलिंगे गदा खेटक रविकिरणीं । झटके हाटक - वाटी पीयुषरसपाणी । माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी । शशिकवदना राजस मदनाची जननी ॥२॥
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी । सांख्य म्हणती प्रकृति निर्गुण निर्धारीं । गायत्री निजबीजे निगमागम सारी । प्रकटे पद्मावती निजधर्माचारी ॥३॥
अमृतभरिते सरिते । अघदुरितें वारी । मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं । वारीं मायापटला प्रणमत परिवारीं । हे रूप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ॥४॥
चतुराननें कृश्चित कर्माच्या ओळी । लिहिल्या असतिल माते माझे निज भाळीं । पुसोनि चरणातळीं पदसुमनें क्षाळीं । मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी । जय देवी जय देवी महा० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP