मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
माहीत नाही कितीदा तिचा स...

डॉ. भाग्यश्री कुलगुडे - माहीत नाही कितीदा तिचा स...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


माहीत नाही कितीदा
तिचा सराईत हात
फिरत राहायचा
चहाच्या करपल्या पातेल्यावर
कणकेच्या परातीवर
सिलिंडरमागच्या जाळीवरही

लख्ख होणारं पातलं
तेलकट कढया
छोटे - मोठे कोपरे
सुखावत राहायचे तिला
डागविरहिततेतून...

न दिसणार्‍या जखमा
नात्यांचं रुतणारं जोखड
संस्कारांच्या न तुटणार्‍या बेड्या
अस्पष्टच होत जायच्या
त्या लखलखीत परावर्तितात...

ती पुनःपुन्हा घासत राहायची
ओट्याची फरशी
धूत राहायची मळकट कपडे
कोपरा फाटलेलं पायपुसणं
पिळत राहायची पिळे

शोधत राहायची
पारा उडालेल्या
गंजक्या पत्राला चिकटलेल्या
निर्जीव काचेमधल्या त्या
स्पष्ट - अस्पष्ट प्रतिमेतून
तिच उरलं अस्तित्व !

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP