मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
माहीत नाही यापुढचं आयुष्...

प्रभा सोनवणे - माहीत नाही यापुढचं आयुष्...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


माहीत नाही यापुढचं
आयुष्य कसं असेल ?
वय उरणीला लागल्यावर
आठवतात
तारुण्यातले अवघड घाट
वळण - वळसे...
स्वप्नवत् फुलपंखी
अभिमंत्रित वाटा...

ठरवून थोडीच लिहिता येते
आयुष्याची कादंबरी ?
काय चूक आणि काय बरोबर
हेही कळेनासं होतं
काळाच्या निबिड अरण्यातले सर्प
भिववतात मनाला
कुठल्या पाप - पुण्याचा
हिशेब मागेल काळ ?

मनात फुलू पाहताहेत
आजही कमळकळ्या
त्या उमलू द्यायच्या की
करायचं पुन्हा परत
भ्रूणहत्येचं पाप ?
की निरीच्छ होऊन
उतरायचं नर्मदामैयेत
मगरमत्स्यांचं भक्ष्य होण्यासाठी ?

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP