मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
श्रीगुरुदेवचरणमहिमा

करुणासागर - श्रीगुरुदेवचरणमहिमा

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


( १ )
ॐ नमो जी श्रीगुरुराया। म्हणोनि सद्भावें लागें पायां ।
तंव मीपण गेलें वायां । घेऊनियां तूंपणा ॥
नवलं पायांचें कठिणपण । वज्रें न तुटे लिंगदेह जाण ।
त्याचेंही केलें चूर्ण । अवलीळा चरण लागती ॥
पायीं लागतांचि बळी । तो त्वां घातला पाताळीं ।
पायीं लवणासुरा खंडळी । वतुर्वळी निर्दाळितां ॥
त्याचें शोषोनियां विख । केला निर्विख निःशेष ॥
पाय अतिशय दारुण । शकटासी लागतां जाण ।
त्याचें तुटलें गुणबंधन । गमनागमन खुंटलें ॥
पायांचा धाकु सबळां । पायें उद्धरिली अहल्या शिळा ।
पाय नृगें देखतां डोळां । थित्या मुकला संसारा ॥
आव्डीं पाये चिंतिती दास । त्यांच्या मनुष्यधर्मा होय नाश ।
पायें यमलोक पाडिला वोस । पायें जीवास जीवनाश ॥
पायवणी शिरीं धरिलें शिवें । तो जगातें घेतु उठिला जीवें ।
त्यासी राख लाविली जीवेंभावें । शेखीं नागवा भंवे श्मशानीं ॥
ऐसें पायांचें करणें । शिवासी उरों नेदी शिवपणें ।
या जीवांसी कैचें जीवें जिणें । मानितें मानणें उरों नेदी ॥
एकनाथमहाराज ॥

( २ )
ब्रह्मादिक देव समर्थ । त्रिभुवनीं वंद्य यथार्थ ।
गुरुचरणावेगळें अन्य तीर्थ । निरर्थक ॥
सकल भुवनें सृष्टि । पाहतां व्यष्टि समष्टि ।
मोक्षमार्ग हा दृष्टि । चरणांगुष्टीं सद्गुरुच्या ॥
रंगनाथस्वामी ॥

( ३ )
ईश्वराचें ईश्वरपण । सद्गुरुचरणीं होतें लीन ।
म्हणोनि ईश्वराहूनि गुरुचरण । अधिक भजावे ॥
ईश्वरें कीजे गुरुसेवा । तरीच पाविजे वैभवा ।
नाहीं तरी तया देवा । कवण म्हणे ॥
नारायणमहाराज ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP