श्रीकल्याणकृत पदें - गणपति

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


१. ( राग - कल्याण; ताल - त्रिवट )
नाम तुझें संकट वारीं रे ॥ध्रु.॥
मंगळमूर्ति मंघळकीर्ति । मोरेश्वरा निर्धारीं रे ॥१॥
सर्वारंभीं मूळारंभीं । चिंतामणि चिंता हरी ॥२॥
सकळ कार्यसिद्धि आगमनिगमविधी । करितां कल्याण करीं ॥३॥

२. ( राग - मालकंस; ताल - तेवरा )
नमन गणराया । मति दे माधवगुण गाया ॥ध्रु.॥
मंगळमूर्ति मंगळकीर्ति । मंगळविद्या मज दे स्फूर्ति ॥१॥
सर्वारंभीं पूजिति गणपति । श्रुतिपरत्परा तुजला गाती ॥२॥
चिंतामणि भय चिंता वारीं । विघ्नविनाशन दुरित निवारीं ॥३॥
मोरेश्वरा तूं कल्याणदाता । दे वर श्रीवर उत्तम गातां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP