TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

प्रासंगिक कविता - प्रसंग १०

समर्थ रामदासांनी हिन्दी भाषेत रसाळ पदे लिहीली आहेत.


प्रसंग १०
( शके १६०३ माघ वद्य ९ शनिवारीं दोनप्रहरीं श्रीसमर्थ परंधामास गेले. तत्पूर्वीं थोडा वेळ त्यांनीं श्रीरामरायापुढें बसून श्रींची प्रार्थना केली व जें शेवटचें मागणें मागितलें तें पुढील अभंगांत आहे. )
आज्ञेप्रमाणें परमार्थ । केला जाण म्यां यथार्थ ॥१॥
आतां देहाचा कंटाळा । आला असे जी दयाळा ॥२॥
आहे एकचि मागणें । कृपा करोनियां देणें ॥३॥
ज्याची दर्शनाची इच्छा । त्याची पुरवावी आस्था ॥४॥
ऐसें सखया वचन । त्यासी देईन दर्शन ॥५॥
तेरा अक्षरी मंत्राचा । जप करील तो साचा ॥६॥
त्याची संख्या तेरा कोटी । होतां भेटेन मी जगजेठी ॥७॥
भय न धरावें मनीं । बहु बोलिलों म्हणोनी ॥८॥
नलगे आसनीं बैसावें । नलगे अन्नही वर्जावें ॥९॥
येतां जातां धंदा करितां । जपसंख्या मात्र धरितां ॥१०॥
एका तेरा कोटींतचि । पापनाशन जन्मांतरिंची ॥११॥
मग तयासी दर्शन । देउनि मुक्त त्या करीन ॥१२॥
ऐसा वर होतां पूर्ण । दास जाला सुखसंपन्न ॥१३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-09T02:12:10.9000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धडा

 • पु. ( राजा . ) किनार्‍यावर गलबत . पडाव , ठेवण्याची आच्छादित जागा , ठिकाण . गलबत भाड्याने न देतां धड्यावर ओढून ठेवले आहे . 
 • पु. १ विवक्षित मुदतीत तयार करण्यास पंतोजीने शिष्याला नेमून दिलेला , पाटी इ० कांवर लिहून दिलेला पाठ . २ ( पुस्तक इ० कांतील ) पाठ . तिसर्‍या पुस्तकांतील शेवटला धडा वजनाविषयी आहे . ३ ( ल . ) ( एखाद्यास ) वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेला नियम ; शिस्त ; उदाहरण ; ( काम इ० करण्याकरिता घालून दिलेली ) पद्धत ; सरणी वहिवाट ; रिवाज . कासया पडिला जी धडा । उगाचि वेडा आणि वांकडा । - तुगा ७१६ . यजमान धडा घालून देतो त्याप्रमाणे गुमास्ते वागतात . ४ हिय्या ; हिंमत ; धाडस ; निश्चय . आतां मनाचा धडा करुन करंजा खातो . - कफा २ . ५ ( एखादी वस्तु मिळाल्याने ) विवक्षित कालपर्यंत ती मिळविण्याविषयी होणारी निश्चिंतता . एक पितांबर घेऊन ठेविला म्हणजे बारा वर्षांचा धडा होतो . [ सं . दृढ ? ] 
 • पु. पोटांत होणारा एक रोग . - मनको 
 • पुस्त्री . ( कु . ) घराचे जोते इ० कांची कड . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

देवक म्हणजे काय ? त्याचे महत्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.