मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
आज सुखाची मैफल झडली जुळल...

शीला जोशी - आज सुखाची मैफल झडली जुळल...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


आज सुखाची मैफल झडली

जुळल्या तारा हवबंधाच्या
सूरही जुळले सद्भावाचे
मने सुगंधाने दरवळली

‘ मी - तू ’ पण हे भाव निमाले
विद्वेषाचे पंख गळाले
प्रेमाश्रूंनी धरती भिजली

काळ लाजला, काळ हासला
झाले गे, सुटे अबोला
स्नेहाची मधुधून नादली

सरो न केव्हा भाग्य आजचे
ठरो न केवळ स्वप्न रात्रिचे
चिरंतनाची आस लागली

आज सुखाची मैफल झडली...

N/A

References : N/A
Last Updated : December 04, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP