भूपाळी दिगंबराची - उठि उठि दिगंबरा । स्वामि ...

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


उठि उठि दिगंबरा । स्वामि सद्गुरु दातारा ।
सर्व त्रैलोक्यउद्धरा । करुणाकरा उठि वेगीं ॥धृ॥
पंचपंच उष:काळ । सप्तपंच अरुणाचळ ॥
करितां षट्कर्में सोज्वळ । होती वेळ सर्वेशा ॥१॥
भागीरथींसी जाऊन । सारूनिया संध्यास्नान ॥
पंढरपुरासीं चंदन । लावावया जाणें कीं ॥२॥
कृष्णातीरासी जाऊन । कर्म माध्यान्हीं करून ॥
करवीर क्षेत्रामाजी जाण । भिक्षाटन मागणें ॥३॥
पंचालेश्वर सिद्धस्थान । तेथें सारुनी भोजन ।
सवेंचि सांभवी प्राशन । तुळजापुरीं करणें कीं ॥४॥
सेखाचळावरि आसन । करोनि माहूरासी जाण ।
तेथें करोनि शयन । जन्मस्थान पाहे पां ॥५॥
पश्चिमे गिरनार जाण । तेथें सारोनि आसन ।
मुद्रा खेचरि लावून । सोहंध्यान साधी कां ॥६॥
सर्व त्रैलोक्या माझारी । प्राणी कोणी स्मरण करी ।
तत्क्षणीं तेथवरी । जाणें लागे सर्वेशा ॥७॥
ऐकुनि भक्ताची करुणा । उठिला साधकांचा राणा ।
निरंजनाचिया मना । प्रेमानंद दाटला ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP