मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ९८१ ते १०००

दासोपंताची पदे - पद ९८१ ते १०००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


९८१
मन चंचळ नेणोंनि अधिष्ठान रे ! काये तयाचें सांगसी निश्चळपण ? रे !
मुद्राबंधु आसन वृथा ध्यान रे !
वेषु मायावी धरूंनि कवण ज्ञान ? रे ! ॥१॥धृ॥
धरीं, धरीं, रे ! आलया ! मनस धरीं रे !
तुझें तुतें जें न मनें तें न करीं रे !
दंभु माईकु कासया लोकाचारी ? रे !
येणें बहुत ठकले ये संसारी रे ! ॥छ॥
मनें मानिजे तो योगु अतिमान्यूरे ! मनें मानिला वितरागृ भजे धन्य रे !
मोक्षु ह्मणिजे भाॐ; तो मनोजन्यू रे !
दिगंबरू मनीं धरी; तुटैल सीणू रे ! ॥२॥

९८२
ऋषिपुत्र निजमनीं करिती विचारू. अपरमीत जळ ह जळधरू.
गति ते कुठली रे ? आमुची मति पांगुळली रे ! ॥छ॥
गर्जनेचा शब्दु नाइकवे कानीं !
पाहातां चि झापड पडताहे नयनी ! ॥२॥
जळचरें तळपती भयजनकु ठाॐ ।
येकु ह्मणती ::- चला, येतुसे भेॐ ! ॥३॥
असंगेंसीं संग आमुतें घडला. वनीं दीगंबरू सांडूंनि गेला. ॥४॥

९८३
येक ह्मणती ::- आलों अवधूत मेळें !
परतोनि जाययापंथु न कळे. ॥१॥धृ॥
मायया मोहलों रे ! भवसागरीं पडलों रे ! ॥छ॥
संसारसागरीं सोपान येतां; अत्यंत दुर्मळ येथूंनि जातां ! ॥२॥
येकीं निजमनीं निश्चित केलें. दिगंबरें वीण मार्गु न कळे. ॥३॥

९८४
येक ऋषिनंदन करिती चिंता; काय जालें ऐसे या अवधूता ? ॥१॥धृ॥
सागरीं प्रवेशली. सखा जळचरीं विसंचिला. ॥छ॥
संसारसागरीं बुडोंनि मेले, कोण जाणे कित्ती जळचरीं नेले ? ॥२॥
उपजला निर्धारु आमुचां देहीं ::- दिगंबरें वीण जाणें चि नाहीं. ॥३॥

९८५
येक आथविती श्रीदत्तगुण; दुःखें आक्रंदती; करिती रूदन. ॥१॥धृ॥
अरे ! संगु कां सोडिला ? रे ! दत्ता ! वेळु कां लागला ? रे ! ॥छ॥
वियोगदुःख हे प्रखर बाण; येयीं, दीगंबरा ! नीवारीं मरण. ॥२॥

९८६
कर्मटांचा संगु तूज न साहे. निर्धारितां गुणीं जालासि काये ? ॥१॥धृ॥
मानसें कुंठलीं रे ! दत्ता ! मति पांगूळली रे ! ॥छ॥
योगमूर्ती ! अरे ! परमनिःकामा ! केवि दिगंबरा ! भेटसी आह्मा ? ॥२॥

९८७
दृश्य निर्धारितां तें रूप नाहीं. सुंदर सावळें जाहालें कायी ? ॥१॥धृ॥
मन माझें वेधलें रे ! आत्मयां रूप कां चोरिलें  ? रे ! ॥छ॥
दृष्टिचें देखणें पांगूळ जालें. दिगंबरा ! तुझें रूप न कळे. ॥२॥

९८८
दर्शनामृत गुरो ! द्रव जळधरा.
चातकु निजमनसें न स्मरों परा. ॥१॥धृ॥
मार्गु तो न कळे रे ! जालों तुजवीण आंधळे रे ! ॥छ॥
योगमूर्ती ! परब्रह्म ! साकारा ! पाव दिगंबरा ! अनसुयेकुमरा ! ॥२॥

९८९
येक आक्रंदती; येक ते उगले;
रूप आठऊंन ध्यानस्थ ठेले; ॥१॥धृ॥
शब्द वीसरले; आत्मयां तून वीनटले रे ! ॥छ॥
येक ते अज्ञान नेणती काहीं; ध्याती दिगंबरु लोचनीं दोहीं. ॥२॥

९९०
सावळा, सुंदरु, बरवया बरवा
देखिला; मग केवि सोडवे जीवा ? ॥१॥धृ॥
चित्त हें गुंतलें रे ! रूपीं मन पांगूळलें रे ! ॥छ॥
योगसेवा आह्मा तुझेनि आंगे. जासि जेथें तेथें येउंन मागें. ॥२॥
दिगंबरें केला तत्वोपदेशु. भक्तासि फळला पूर्ण विश्वासू. ॥३॥

९९१
प्रसन्न जालासि तरि काये देसी ?
क्षोभलासि देवा ! तरि काये नेसी ? ॥१॥धृ॥
आत्मतागुंतलों रे ! दत्ता ! मीपण मूकलों रे ! ॥छ॥
चूकलों मीं तरि अपराधु; कवणा
भजतां हीं रूप न दिसे भजना. ॥२॥
दिगंबरा ! तुवां भेदू चि हरिला. पूर्ण विश्वासलों तूझया बोला. ॥३॥

९९२
तुज मीं जाणें; तूं जाणतासि मातें.
सत्य बोलों न ये लौकीकु येथें. ॥१॥धृ॥
मौनें चि राहिजसू; दत्ता ! केलें तें साहिजसू. ॥छ॥
दिगंबरा ! वर्म कळलें गुह्य. पासूंनि जातां चि करीन बाह्य. ॥२॥

९९३
भक्तजनसुरतरू ! संपूर्णकामा ! देवदेवा ! परमात्मया ! रामा ! ॥१॥धृ॥
केधवां भेटि देसी ? सांगपा, विश्रांति पाववीसी ? ॥छ॥
भक्तचिंतामणी ! अभयवरदा ! दिगंबरा ! निजानंदअगाधा ! ॥२॥

९९४
पवनाची गति न धरवे धरितां.
व्योम नीरवैव न गणवे गणिता. ॥१॥धृ॥
केवि मीं तूज पाहों ? रे ! आत्मयां ! निश्चळु केवि राहों ? ॥छ॥
अनंतगुणमय, गुणहीन पुडती केवि दीगंबरा ! जाणवे स्वमती ? ॥२॥

९९५
आयुष्य चर; वाहे सरसर सरिता; वेगु अवसरुन धरवे धरितां. ॥१॥धृ॥
यत्नु तो कुंठला रे ! अवधूता ! वयांतु पातला रे ! ॥छ॥
मनस चंचळपणें विश्रांति न पवे. दिगंबरा ! तुझें ध्यान करवे. ॥२॥

९९६
शरीर कर्मजगुणें अतिक्षीण जालें; करणगण पांगूळ; यत्न न चले. ॥१॥धृ॥
निर्वाण मांडले रे ! अवधूता ! वरि दुरित पावलें रे ! ॥छ॥
तापत्रय बहु; जाणवे वेथा. दिगंबरा ! आतां पाव समर्था ! ॥२॥

९९७
कवण कर्म कैसें ? विपरीत क्रीया,
जाणतां, वरि मनस पडताहे विषयां. ॥१॥धृ॥
सद्गुरू ! पाव ! बा ! रे ! आत्मयां ! अवधुता ! पाव. बा ! रे ! ॥छ॥
मातलें गुणरसें मन केवि धरवे ?
दिगंबरा ! तुझें स्मरण चि बरवें. ॥२॥

९९८
विवेकुदिनकरु गुणी अस्तमान; रात्रिकाल वरवें; पडलें खान. ॥१॥धृ॥
हरिलें योगधन; माये ! वो ! व्याकूळ पडलें मन. ॥छ॥
मागु पाहे तवं अंतरा आला. दिगंबरें चोरु धरूंनि दिधला. ॥२॥

९९९
वात पाहे तुझी अरे ! कमळनयना !
भेटि देयीं गुरो ! कालाग्निशमना ! ॥१॥धृ॥
माये तूं बापु माझा, रे ! आत्मया ! सारथी योगिराजा ! ॥छ॥
ऐसे चि अतिक्रमले जन्म अपार.
दिगंबरा ! आतां चुकवीं येरधार. ॥२॥

१०००
बापु माझा; तया जायीन पासीं ?
अंकदेशें वीण बैसैन कैसी ? ॥१॥धृ॥
कांमज शंकवाल ? अवो ! तुह्मी भय कित्ती दाखवाल ? ॥छ॥
आरत जीविचें तुह्मीं काये जाणा ? दिगंबरु मज आलवी खूणा. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP