मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ३२१ ते ३४०

दासोपंताची पदे - पद ३२१ ते ३४०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


३२१
देॐ देहिचा भेदासि खाये. श्रीदत्तु आंगीं न साहे. ॥१॥धृ॥
आतां न धरे मनु मानसकरणा ! न धरे मनु वो ! ॥छ॥
गुणी गुणाचा क्षयो, अगूणू दिगंबरु गुणगणहीनू. ॥२॥

३२२
कवणाची करूं आशा ? जळो दुराशा ! धिग्य जन्मु हा माझा ऐसा रे !
स्वभाॐ कैसा ?हे जगदीशा ! मी न ये, न ये गर्भवासा.
त्राहि गुरो ! त्राहि महेशा ! अवधूता तूं बापु कैसा ?
शंका वाटे. जहाली दुर्दशा रे ! ॥१॥धृ॥
रे ! सखया ! का मज सांडीयले ?
गुंति पडली. काहीं न चले रे ! सखया !
अपराध काये म्यां केले ? येणे जाणें तो मार्गु न कळे.
वाट पाहातां श्रमीत जाले डोळे. ॥छ॥
दीनाचें दीन होणें; पाये धरणें; न तुटे मरण परि तेणें रे !
देहचि देणें; पराधीन होणें; करूं नये तें सर्व करणें;
हित वीहीत सांडूनि देणें; जळो जना अधीन ते जीणें !
दिगंबरा ! ते कैसेनि साहाणें ? रे ! सखया ! ॥२॥

३२३
कवणाचा मूळीं पुत्रु ? कवण पाळी ?
एसी हे गति मज जाली वो !
आशा जळली, ये भव - जळी.
मज जीतचि भूली पडली. नाथिलीचि परवश जाली.
उपयोगा न येत गेली. मायेबापे दुरावली. ॥१॥धृ॥
बाइये ! काये मी करूं ? वो ! कवणी दीशा पाहों ?
कैसी वो ! निश्चळ राहों ? काहीं न चले उपाॐ. ॥छ॥
जननी जनकु माये ! अवधूतु न ये.
तेणें सांडिली माझी सोये वो ! दुःख न स्माये; स्पंदति आहें.
दिगंबरा ! परतोनि पाहें. अपराधी नेणें सोये.
चूकली करूं काये ? सांडू नेदी; न धरीं सोये. ॥२॥

३२४
कवणाची धरूं माया स्वजनजाया ?
स्वप्न, क्षणीक भ्रमु, वायां रे ! अजा अक्रीया नलगे क्रीया.
निजानंदा ! चिदव्यया ! संगु नाहीं गुणाश्रया. ॥१॥धृ॥
मन्ना रे ! ध्यासी तें पर काये ? तुझी करणी वायां जाये.
दृश्य भजनें विभ्रमु होये. संगु सांडीं निश्चळ ठाये. ॥छ॥
भौतीक सर्व जाण प्रपंचभान. भासे तुझे अज्ञान रे !
तदंग वेद न तें हीं तें जाण. दिगंबर ब्रह्म अगूण
भजा मना सनातन. ॥२॥

३२५
कवणें केलें वो ! काये ? नेणें मायें ! प्राणनाथु हा सेजें न ये वो !
धरीन पाये; तूं जाये वो ! सैये ! मज वियोगदुःख न साहे !
देहीं प्राणाचे काज काये ? ॥१॥धृ॥
बाइये ! चंदन आंगीं न साहे ! परिमळ तो वायां जाये !
चंद्रु चांदिणें करी काये ? प्राणनाथु वो ! कैसैनि ये ? ॥छ॥
सखी ह्मणे ::- वो काहीं अंतर नाहीं; दृश्य सांडूनि द्रष्टा पाहीं वो !
तूं तूंचि तुझांठायीं; दुजेपण वायी; दिगंबरु आत्मा अदेही.
स्वप्नवियोग मानिसील कायी ? ॥२॥

३२६
गुणी गुंपले गुण चितचैतन्य. विकळ पडलें माझें मन वो !
नेणें मीं खूण मंत्र विधान. साध्य कैसें तें साधन ?
भूललें वो ! अंतःकरण. ॥१॥धृ॥
बाइये ! वो ! वियोग तापु न साहे. कवणाचें धरूं पाये ?
भेटवा वो ! सद्गुरु माये. आठवण दुःखाची होये. ॥छ॥
चित्त चंचळ कैसें योगीं न बैसें ? तेणें विलंबु मज भासे वो !
दिगंबर ऐसें कें पां प्रकाशे ? पुनरपि वियोगु न दीसे. ॥२॥

३२७
संख्या न कळे; काळ क्रमले; कठिण गुण वेगळा गळे बाण वो !
भव विभ्रमु भेदु भयद भासती; भाव दैव न कळे कोण वो !
दुःख त्रीविध ताप तपती दुस्तर; तेणें बुद्धि जाहाली क्षीण वो !
देह वेचलें; भव जाहाले गळित; आतां नित्य लागलें ध्यान वो ! ॥१॥धृ॥
गे ! बाइये ! बहूं मी वंचलियें ! श्रीदत्त विसरलिपें वो !
गुणक्रमीं विगुंतलियें वो ! बहुकाळ दुरावलियें ! ॥छ॥
धन, स्वजन, जन, विजन सोषितां माझें नीत्य व्याकुळ मन वो !
काम क्रोध हे वैरी आंगीं जडलें; तेहीं ध्येलें करण - गण वो !
काये करूं मीं ? माझे न चळे करणें. वायांवीण जातील प्राण वो !
दिगंबरु वो ! मज भेटवा कव्हणी. सुखवृत्ति जाहाली क्षीण वो ! ॥२॥

३२८
शास्त्रश्रवणें मद मत्सर जाहालें; अहंकार पावले बळ वो !
कर्मसाधनीं दंभु दर्पु वाटला; तो पै भवभ्रमासि मूळ वो !
योगीं तपसीं सिद्धी नाना झोबती; दुःखादुःख केवळ फळ वो !
काये करूं मी ? माझें काहींचि न चळे !
भवबंधु न तुटे जाळ वो ! ॥१॥धृ॥
गे ! बाइये ! कामीं चूकलियें. अवधूतें दुराविलियें वो !
अवैराग्यें भूतलियें वो ! भवभ्रमें व्यथिलियें वो ! ॥छ॥
लक्ष ठेवितां गुरुचरणीं चंचळ मन बुद्धी वीसरे मनबोधु वो !
जपू जपतां तेथें सुषुप्ती धरिजे; तेणेयोगें आगळा खेदु वो !
नामकीर्तनी त्रासु विरसू संचरे; येरु नित्य आवडे वादु वो !
दिगंबरा वो ! प्रति मातु जाणवा कोण्ही. अती होतुसे बाधु वो ! ॥२॥

३२९
दुष्ट, दुःखद, दूरि, दुरुळ, दुस्तर, माये ! नित्य सासूरें मज वो !
कामू कल्पना माझें हृदय भंगिती. किती नित्य करणें काज वो !
धर्म विकळ; तळमळ वो ! सोषितां माझें सत्व आटलें नीज वो !
पंथू न कळे; माझें मनस पांगूळ; माये ! नित्य आठवीं तूज वो ! ॥१॥धृ॥
गे ! बाइये केव्हां देखइन मी वो ! आपुलें स्वजन, दत्तु गुणाचें नीधान ?
सकळ श्रमु माझा हरैल, सखिये ! मी केव्हां केव्हां सांगैन ? ॥छ॥
वाट पाहातां दीन क्रमलें बहुत; मातें तेंचि लागलें ध्यान वो !
सोये सांडिली; कैसें करूं मी ? सखिये ! माझे क्षीण जाहाले प्राण वो !
दीर्घस्वरें मीं सादु घालूंनि आळवीं; शंकामुक्त जाहालें मन वो !
दिगंबरें ! वो ! येईं; नयन श्रमलें माझे; भाव जाहाले क्षीण वो ! ॥२॥

३३०
कनकी कानक कटकादिक मान जीवनी जीवन जैसें भेदविहीन; ॥१॥धृ॥
तैसे परब्रह्म सगूण. माजें मनाचें तूं सार,
नीरजनयना ! माझें मनिचें तूं सार. ॥छ॥
हृदयीकमळीं द्वैत भाॐचि नाहीं. दिगंबरा ! सर्व - गतु तुं देहदेहीं. ॥२॥

३३१
अनुजीं तनुजीं प्रीति धरूंनि कायी ?
हितासि कारण येथें काहींचि नाहीं. ॥१॥धृ॥
श्रमकर सर्वही देही. माझें मज बाधिताहे.
आतां पुरे वेदना. माझें मज बाधिताहे. ॥छ॥
कमळनयनरूप देखैन कई ?
दिगंबरेविण मज गतिचि नाहीं. ॥२॥

३३२
नयन श्रमले; वाट पाहें; गे ! माये !
दिनें दिनु गेला; माझें कोण्हीचि न ये. ॥१॥धृ॥
आतां करूं काये ? वो ! सैये ! माझा जीउ हा न राहे.
अरे ! जगजीवना ! नीरजनयना !
मनमोहना ! माझा जीउ हा न राहे. ॥छ॥
सद्गुरू माउली माझी येईल कई ?
दिगंबरें ! तुजवीण येरे मज कायी ? ॥२॥

३३३
सकळकरणगण भ्रभीत माये !
मानस विकळ माझें स्थीर न राहे. ॥१॥धृ॥
हृदयीं वियोगु न साहे. मी वो ! जायीन माहेरा,
हे मज वासना, मी वो जायीन माहेरा. ॥छ॥
हृदयभुवनीं मातें संतोषु नाहीं.
दिगंबरेवीण माये करणें ॐ ! काई ? ॥२॥

३३४
कवण सुकृत पूर्व साधन माये !
सावळें सुंदर रूप नयनी मीं पाहे ! ॥१॥धृ॥
मन माझें वेधलें वो ! सैये ! माझें गुणाचें निधान,
पंकजनयनु, माझें गुणाचें निधान. ॥छ॥
न धरीं परति आतां या भवपुरा.
दिगंबरेंवीण मन नेघे उपचारा. ॥२॥

३३५
गुणकृतभान वायां हें जनजाळ. मायामय हें सर्व तरुणीचें जळ.
धनद धन हें सर्व दुःखासि मूळ. स्वप्न जैसें जैसें व्योमाचें फळ. ॥१॥धृ॥
कैसेनि माये तें सूख पाहें ? मन मानस जेथें विरोनि जाये. ॥छ॥
अर्थ साधूनि ध्यान नित्य मनासि. कामु कल्पना वेधु यया जीवासि.
परती नावडे. काये करूं ययासि ? दिगंबराची होये कैसेनि दासि ? ॥२॥

३३६
नानां तपस माझें जालें सुफळ. नयनीं देखिलें रूप शुद्ध श्यामळ.
करणगण हे जाले धर्म - विकळ. सुखें संपूर्ण जालें हृदयकमळ. ॥१॥धृ॥
मी मज माये ! मातें न साहे. नेणवे देह; गेह जाहाले काये ? ॥छ॥
ध्यानीं धरितां मन उन्मन जाले. जाणतेपण सर्व विरोनि गेलें.
गगनी गगन राहे, तैसेंचि ठेलें. दिगंबर गुणही गुणी स्फुरलें. ॥२॥

३३७
योगी योगज्ञ वेत्ते जाणती सार. शाब्दीकांप्रति नव्हे तत्त्व गोचर.
भक्त प्रेमळ त्यांचें नीवे अंतर. तें रूप नयनीं नीवळे निरंतर. ॥१॥धृ॥
श्रीयोगिराया ! लागैन पाया. वेधलें मन माझें; न सोडी तया. ॥छ॥
वेद वर्णिती जे ब्रह्मपुराण; शास्त्रें करिती वादु; वदती खूण;
देवां दुर्लभ ऐसें गुणनिधान; दिगंबर देखिलें तें नयनीं सगूण. ॥२॥

३३८
सकळ ही धन जन करूं मी काये ? विषयरसाची गोडी जीवा न साहे.
चित्तचैतन्य माझें गुंपलें माये ! भेटवा सद्गुरूं. याचे पाहीन पाये. ॥१॥धृ॥
आत्मया ! रामा ! सुखविश्रामा ! श्रीदत्ता ! तुझा संदू लागला आह्मां. ॥छ॥
साध्य साधन येर वृत्ति न साहे. हृदयीं गुंतलें मन. मी माजि पाहे.
गुणदोष - वीरहीत होऊंनि जाये. दिगंबरीं तन्मयत्व भोगीत आहे. ॥२॥

॥ केदारा ॥
३३९
कमळनयनरूप सावळें जीवीं बैसलें. पाहीन कवणें काळें.
मनस चंचळ; परि तें न चळे. गुणी गुंपलें नीवती कइं डोळे ? ॥१॥धृ॥
सखिये ! स्वजन धन वाउगें मज नलगे. जाइन तया संगें. ॥छ॥
शब्द श्रवण बाण लागती हृदयाप्रती वियोगवेग चित्तीं.
विषवीषय अवगमती, आड भासती,
दीगंबर - सूख - प्राप्ती. ॥२॥

३४०
हृदयकमळदळकोटर तुझें मंदिर कामें धरिलें बिढार.
क्रोध वेवहि; अति दुस्तर मदमत्सर जाहाले अति स्थीर. ॥१॥धृ॥
येइये ! येइये ! परमात्मया ! दत्तात्रया ! वेगु करी लवलाह्यां. ॥छ॥
योगधारणा स्तंभु पाडिला. ठाॐ मोडिला. आश्रय बोधु नेला.
जीवी बैसलीकर्म - शंकळा. धर्मु नाशला. दिगंबरा ! वेगीं चाला. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP