मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ६१ ते ८०

दासोपंताची पदे - पद ६१ ते ८०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


६१
बहु जन्म गेले कर्मसिंधु निस्तरतां; योग साहिले माये ! दुःखाची सरिता. ॥१॥धृ॥
सावळें रूप दावा नयनी; मनस चरणी लीन करीन गे ! माये ! ॥छ॥
दिगंबरेवीण योगु अयोगु सखिये ! मनस चरणीं राहे; तरीचि बरे वें. ॥२॥

६२
अवस्था नेणें मीं च्यार्‍ही; भा ॐ शरीरीं थारेचि ना. ॥१॥धृ॥
चित्त दुश्चित ठेलें; मन विरालें बाईये वो ! ॥छ॥
दिगंबरें मज लाविलें पीसें; मीं मज कैसें पारूषलें ? ॥२॥

६३
डोळांचें देखणें; सारा दृश्य निवारा बाइयानो ! ॥१॥धृ॥
मींपण न साहे आंगीं; मीं मजलागि वगळलियें. ॥छ॥
दिगंबरें मज ऐसें केलें. मीं मज नेलें चोरूनियां ! ॥२॥

६४
जाणणें सरलें वो ! माझें श्री योगिराजें स्वविषयीं. ॥१॥धृ॥
तें माझेंपण मातें दावां; आवडि जीवा होति असे ॥छ॥
काळाचा काळु निखळु काळा श्रीदत्तु आला बाइ वो ! ॥२॥
गवान गीळिलें येणें; अगुणगुणें प्रकटला. ॥३॥
दिगंबरीं आभासु नाहीं; देह अदेहीं सामावलें. ॥४॥

६५
प्राणांचा प्राणु, डोळ्यां डोळा, जीउ जिवला श्रीदत्तु. ॥१॥धृ॥
जाईन तेणेंसीं भेटी; रिघैन पोटीं जनकाची. ॥छ॥
दिगंबरु माये माझी आत्मा; व्यक्त चिदात्मा श्रीदत्तु. ॥२॥

६६
जळज लोचनें येणें अगुणगुणें गोवियेलें. ॥१॥धृ॥
मज मीं नकळे मातें; गुंपलें नुगवे तें मानस. ॥छ॥
दिगंबरें द्वैत मोडलें माये ! नीजे निजरूप अखंड पाहे. ॥२॥

६७
स्वप्निचें सुख भोगुंनि काये ? जागरीं होये लटीका. ॥१॥धृ॥
आतां निश्चळ राहीं मना ! कां दृढ कल्पना वाढविसी ? ॥छ॥
दिगंबर येक जोडीं सत्य दृश्य असत्य सांडूनिया. ॥२॥

६८
देहिचा देखणा देही आत्मा बाहीं आळंगिला. ॥१॥धृ॥
श्रीदत्तु माझें जीवन सखिये ! हृदयी राहे हेंचि करा. ॥छ॥
दिगंबरें - वीण नलगे कांहीं; मीपण तेंही सांडियेलें. ॥२॥

६९
सहजीं प्रपंचु सहजचि नाहीं; सहज ठाइकें ठायीं सहजचि. ॥१॥धृ॥
सहजाची खूण सहज जाणरे ! भावे न संभवे सहजची. ॥छ॥
सहज दिगंबर निजरूप विमळ भान मृगजळ पारुषलें. ॥२॥
जरा जन्म भूलि लागु पावला काळाचा;
शरीर वेचलें; काये पीटितासि वाचा ? ॥१॥धृ॥
सावधान रे ! मना ! सावधान रे !
स्वहीतविषयीं होयीं सावधान रे ! ॥छ॥
मन न धरितां तोचि लागईल चाळा;
दिगंबरु ध्यायीं; मुक्त होसी अवलीळा. ॥२॥

७१
गगनीं सूटला बाणु गेला न परते;
तैसें हें शरीर ज्ञात असे मरण पंथे. ॥१॥धृ॥
सावधान रे ! जना ! सावधान रे !
वय वोसरलें; आतां सावधान रे ! ॥छ॥
स्वप्न तें असत्य; भ्रमु न धरी गव्हारा !
सांडि हें ममत्व; ध्यायीं तया दिगंबरा. ॥२॥

७२
मन बहिर्मुख काये करी जपमाळा ?
वाचा - रंभु खोटा; सांडि सांडि आतां चाळा. ॥१॥धृ॥
सावधान रे ! सावधान रे !
हृदय नाशलें; होयीं सावधान रे ! ॥छ॥
वेषें न तारि - जे सत्य जाणपां !
निदानीं दिगंबरेवीण गति, वाउगीं बोलणी. ॥२॥

७३
काम - क्रोध - शोक - मोह - वणवां जळालें मन वणवां जळालें.
अंकुरून धरी; मोक्ष - बीज करपलें. ॥१॥धृ॥
सावधान रे ! मना सावधान रे ! दुर्लभ शरीर पुढें सावधान रे ! ॥छ॥
ऐसें हें शरीर पुढें नाहीं रे ! गव्हारा !
शरण रीघयीं वेगीं तया दिगंबरा. ॥२॥

७४
क्षणिक वैराग्य - बोल बोलतासि का हृदया ?
मावेंचें तें प्रेम नव्हे तारक आत्मयां. ॥१॥धृ॥
भ्रमु सांडि रे मना ! भ्रमु सांडि रे !
शाब्दीकें तरिजे, ऐसा भ्रमु सांडि रे ! ॥छ॥
वेष संपादूनि काज न दीस चतूरा !
शरण रीघयीं आदिगुरु दिगंबरा. ॥२॥

७५
श्रीदत्ता सद्गुरु तूं माझें योगधन; देवा माझें योगधन;
हृदयीचा ठेवा नित्य करीन जतन. ॥१॥धृ॥
चंचळ रे ! मन चंचळ रे ! पायीं स्थिराविजे; भारी चंचळ रे ! ॥छ॥
तुझेनि स्मरणें भवसागरु तरणें. दिगंबरा ! तया तूतें केवि विसरणें ? ॥२॥

७६
श्रीदत्ता ! सद्गुरु ! तूं आमची जननी.
भवार्क दुस्तर केवि सांडितासि वनी ? ॥१॥धृ॥
देईन रे ! प्राण देयीन रे ! तुझेनि स्मरणें प्राणु देयीन रे ! ॥छ॥
तुझें नित्य ध्यान; मन माझें उतावीळ;
दिगंबरा ! कृपामेघु ! कयी वोळसील ? ॥२॥

७७
आत्मा तूं, आमुतें तरि कायीसें बंधन ?
वाया योगु सेवा; कांही न करीं साधन. ॥१॥धृ॥
पाहिन रे ! तूतें पाहीन रे ! मीपण गाळुंनि तुतें पाहीन रे ! ॥छ॥
सत्य तूं साचार; येर माया मृगजळ.
दिगंबरा ! आतां मी तें न मनीं सकळ. ॥२॥

७८
उभा ना बैसला, सर्वपणें सदोदीतू, अखंडु, अव्ययो, आत्मारामु अवधुतू ॥१॥धृ॥
पाहीन वो ! माये ! पाहीन वो ! त्रीपूटीवेगळें रूप पाहीन वो ! ॥छ॥
वितुळलें भान; भावीं गगन बुडालें; दिगंबरा ! तुझें रूप रूपीं प्रकटलें. ॥२॥

७९
बापयाकारणें मेघु वोळे अंतराळीं; घनु वोळे अंतराळीं;
तैसा मीं चातकु; तरि येयीं यये काळीं. ॥१॥धृ॥
पाहीन रे ! वाट पाहीन रे !
न येस्सील तरि प्राणु देयीन रे ! ॥छ॥
दिगंबरा ! तूजवीण नेणें आन कांहीं.
आत्मयां ! सद्गुरू ! कयीं वोळसी हृदयीं ? ॥२॥

८०
सुरगणप्रणीत ! सकळदुःखxरxx !
भवदकेवळ ! कर्मकरणविमथना ! ॥१॥धृ॥
तुझां गुणीं मन माझें विगुंतलें.
ठाइकें ठायीं ठेलें; न चळे रेया ! ॥छ॥
दुरितदुस्तर - भवमयतमदहना !
दिगंबरा ! तूं मज हृदयीचा देखणा. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP