मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
ललितानंद

ललितानंद

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


नत्वा गुरुं गणपतिं, स्मृत्वांतस्त्रिपुरां परां
‘ सौंदर्यलहरी ’ स्तोत्रव्याख्यां कुर्वे यथाधिया.  १
नमुनि सद्गुरु, देव गजानना, । हृदयिं चिंतुनियां नगजानना,
‘ लहरिसुंदर ’ नामक हें टिका । कथित शंकरउक्ति, मर्‍हाटिका.  २
ज्याचा कीं डमरूनिनादजनितें व्याकर्णसूत्रें भलीं
शेषालागीं चतुदर्श प्रियकरें शंभूकृपें लाभलीं,
त्याचा जो अवतार, शंकर गुरु प्रख्यात भूमंडळीं
तद्वक्त्राब्जगिरा दुरंतविदुषां तज्ज्ञान आखंडली.  ३
नाना शास्त्रकलाकलापकुशलां व्याकर्णनैम्यायिकां
दुर्गम्यार्थ रहस्य हें; स्फुट नसे वेदांतमीमांसकां;
ज्योति:शास्त्रविदांसि लेश न कळे; कोण्हासही नाकळे;
हें तों आगमगुह्य बाळक म्हणे, मातें कसें पैं कळें ?  ४
‘ नाविष्णु: पृथिवीपति: ’ शुभमती हे बोलती भारती,
ज्याची पुण्यगती अलौकिक रिती विख्यात या भारतीं,
श्रीमद्गायकवाडवंशवसती या गुर्जरीं शाश्वती
आज्ञा शक्तिवती ममकृति फतेसिंहाख्यराजन्वती.  ५
आतां वंदुनि संत, सज्जन, महा श्रोते, द्विजां, पंडितां,
प्रार्थीं बाळक बोबडें शुभमती, वाणी नसो खंडिता.
द्यावें, हो, अभयाशिषा शुभमनें; संपूर्ण टीका घडे;
वाग्देवी वदनांबुजीं वसुनियां गूढार्थ हा सांपडे.  ६
गीर्वाणपद्मरचना सहजें निगूढा, । ते प्राकृतें समपदीं न घडेचि रूढा;
त्यामाजि शंकरगिरा गहना विशेषीं, । यालागिं दोश न दिजे पदअर्थशेषीं.  ७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP