मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
सिद्धचैतन्य

संतमालिका - सिद्धचैतन्य

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


उठोनिया प्रात:काळीं । जपा संतनामावळी । स्मरतां किल्मिष अवघें जाळी । देव पाळि आज्ञेसि. ॥१॥
केशव, अत्रि, कपिल मुनी, । व्यास, वशिष्ठ, नारदमुनी, । कौंडण्य, मार्कंडेय, कौशिक मुनि । ब्रह्मज्ञानी महापुरुष ॥२॥
अगस्ति, गौतम, वाल्मिक मुनि, । भारद्वाज, शुक, जमदग्नि, । विभांडक, गर्ग, शृंगमुनि । चिन्मयभुवनीं रातले ॥३॥
नळ, प्रल्हाद, हरिश्चंद्र, । श्रीयाळ, जनक, रुक्मांगद, । ध्रुव, उपमन्य, गोपीचंद, । ब्रह्मानंदें डुल्लती ॥४॥
जाटधना, मलुकदास, । कबिर, लतिब, कुर्मदास, । खेचरविसा, सूरदास, निजपदासि पावलें ॥५॥
वडवाळसिद्ध, नागनाथ, । मुकुंदराज, जडभरत, । वटेश्वर, निवृत्तिनाथ । पुरला हेत सर्वांचा ॥६॥
जवमित्र नागा, ज्ञानेश्वर, । सोपान, कोनेरि गंगाधर, । पिसाबहीरा, शुकसागर । ब्रह्मानंदें हेलावे ॥७॥
नामदेव, चांगाकोली, । नरहरि सोनार, सांवतामाळी, । गोरा, विठो लावुनी टाळी । हृदयकमळीं आलिंगितो ॥८॥
मुद्गलभट, मुक्ताबाई, । भानुदास, मिराबाई, । एका जनार्दनाचे पाई । आऊबाई, निरंजनि. ॥९॥
केशव स्वामि, निंबराज, । चोखा, तुका, भोजराज, । रामदासा मंत्रबिज । उपदेशिले रघुविरें. ॥१०॥
पाठकनामा, मन्मथ आया । प्राण गोपाळ मृत्यंजया । बहिणी, वेणि, जनी, साळ्या, । देवराया रातले ॥११॥
नरहरि, मालो, जयराम, । सेना, धागा, सिवराम, । सरला अंतरिचा काम । मेघ:शाम, कृष्णदास, ॥१२॥
सहजानंद, वामानंद, । याज्ञवल्कि, पूर्णानंद. । जन पंडित, शेखमहमद, । नश्वर पद पावले ॥१३॥
तुळसि, नानक भला, । मानपुरि, शिवलिंगयाला, । हरिदास, कान्हयाला । ठेविले पाई गोविंदें ॥१४॥
रमावल्लभ, दास भोळा, । रेणुकानंदन विठयाला, । चिन्मये, माधो, दासोबाला, । वर्षाव केला कृपेचा. ॥१५॥
वामन, चिद्घन, गोसाविनंदन, । लोला मुद्गला, तानसेन, । नारा, महादा, भगवंतानें । आपुले हातें कुरवाळिलें ॥१६॥
अज्ञान सिद्ध, नाथ प्रसिद्ध । मुक्तेश्वरे, मैराळ सिद्ध, । मार्कंड, रंगोबा प्रसिद्ध, । ठाउका आहे संतासि ॥१७॥
मल्लकार्जुन ब्रह्मचारी, । प्रत्यक्ष वेद जैसे चारी । काये सांगूं त्याचि थोरी । जन्मवरी गुरुसेवा ॥१८॥
संतमाळेचें भूषण । हा मिरवी नारायण, । भक्तासाठीं जगजीवन, । नाना वेष धरित असे ॥१९॥
संतमाळा ज्यांच्या कंठीं । संत निरूप ज्यांचे दृष्टी । संतवर्णनीं ज्यांची मिठी । मुक्तिभेटी येतील ॥२०॥
संतसेवा जयासी घडे । काळ येऊन पाया पडे । त्रिभुवनींचें ज्ञान घडे । येणें न घडे जन्मासी ॥२१॥
सिद्ध चैतन्य संता शरण । संत माझे जीव प्राण । चिन्मये मूर्ति त्याचें दैन । उणें कोठें असेना ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP