मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
उद्धवसुत

संतमालिका - उद्धवसुत

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


आतां वंदुं संतसज्जन । जे उद्धरती ह ईन जन । त अया संताचें महिमान । सांगतां नये बोले. ॥१॥
संत कृपेचे सागर । ज्ञान वर्षिते जळधर । भाविकासि परपार । पावविती कृपेनें. ॥२॥
संत परब्रह्म साकार । दिसती परि निराकार । जैसि जळाचि जळगार । तोयचि सत्य जाणिजे. ॥३॥
संताचिये संगती । जिव उद्धरिले येणें किती । ह्मणोनि संताची संगती । धरिती विवेकी अखंड ॥४॥
ते संत कोण कोण । ऐक तयाचें नामाभिधान । श्रवण भजन करितां, दहन । पातकें होति तयांचि. ॥५॥
मछंद्र, गोरक्षक, मिननाथ, । जे अवतार मूर्तीमंत । ज्ञानदेव, निवृत्तिनाथ, । सोपानदेव, मुक्ताबाई ॥६॥
मुकुंदराज महासमर्थ । केला विवेकासिंधु ग्रंथ । त्या विवेकसिंधुचा अर्थ । संतसज्जन जाणती. ॥७॥
नागनाथ, बहेरंभट पिसा, । रेणुकानंदन, जान तैसा । जे आवडती महेशा । अंतरापासूनि ॥८॥
नामदेव, चांगदेव, । विठा, नारायण, महादेव, । भगवंताचे प्रिय सर्व । भक्तराज सर्वेश ॥९॥
जनाबाई, मिराबाई, विनटले हरिपाईं । त्यांचा महिमा वर्णुं काई । हरिहर वर्णिती ॥१०॥
कबीर, कमाल, सुरदास, । नरसिमेहता, रोहिदास, । गोराकुंभार, मालुदास, । निज प्रण हरिचे ॥११॥
महाराज जनार्दन । येकनाथ अवतार पूर्ण । दामाजिपंताचें आख्यान । असे ठाउकं सर्वांसि. ॥१२॥
नरहरि सोनार, पंढरिसि । चोखामेळ हा परियसि । तुकोबावस्ति देहुसि । माणकोजि बोधला. ॥१३॥
श्रीमत् रामदासस्वामिसमर्थ । जेणें वाढविला परमार्थ । मारुतिअवतारचि निश्चितार्थ । विश्वकार्यार्थ होतसे ॥१४॥
हे जाणुनी अन्य सखे मन । उद्धवसुत करी नमन । संतसेवेचें महिमान । मुखें बोलावेंसें नाहीं ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP