मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
निसर्गाचे देणे - समृद्धीच...

पांडूरंग प्रभू माळी - निसर्गाचे देणे - समृद्धीच...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


निसर्गाचे देणे - समृद्धीचे लेणे
गवयाचे गाणे - लोकमान्य ॥१॥
चांगले कोणते वाईट कोणते
जिव्हाळ्याचे नाते - लोकमान्य ॥२॥
चांगले वाईट निवडावे नीट
इष्ट की अनिष्ट लोकमान्य ॥३॥
विचार मंथन सदैव चिंतन
अहिंसा वर्तन - लोकमान्य ॥४॥
बल शक्ती वीज घरोघरी आज
ज्ञान काम काज लोकमान्य ॥५॥
भली बुरी शक्ती - गती - अधोगती.
पारख प्रचिती - लोकमान्य ॥६॥
चंद्र सुर्य तारे - जीवलग प्यारे
वृक्षवल्ली वारे - लोकमान्य ॥७॥
निसर्ग निर्मिती - मुळीना गणती
अजामर ख्याती, - लोकमान्य ॥८॥
तुझी रे किमया - सजीव दुनिया
माया आणि छाया - लोकमान्य ॥९॥
जपा निसर्गासी ? नका छळू त्याशी ?
कृतघ्न का होशी निसरासी ॥१०॥
निसर्ग देवता - नका घालू घावा
तोचि ब्रह्मदेव, चक्र - पाणी ॥११॥
देता निरंतर - अन्न वस्त्र पाणि
सर्वांचा तो धनी - ! कृपा सिंधु ॥१२॥
कोटी जिवासाठी - देतो तूप रोटी
बापाचा बाप तो - जग जेठी ॥१३॥
ज्ञानेश्वर - ज्ञानी ? केली कृपा त्यांनी
झालो आम्ही ज्ञानी - ? माळी म्हणे ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP