पंक्ति

निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.


मयूरसारिणी.
गण - र, ज, र, ग.
रा ज रं ग युक्त योजि वृत्ता । शोभशील सज्जनीं सुवृत्ता.
हे मयूरसारिणी सुवाणी । रंजवी मना प्रमोदखाणी. ॥४६॥
रूपवती, रुक्मवती अथवा चंपकमाला.
गण - भ, म, स, ग.
यति - ५, ५.
भा म स गांतीं रुक्मवती हे । योजुन लोकीं सद्यश लाहें.
पंचकयुग्मीं साधिं यती तूं. । चंपकमाला भोगिं सती तूं. ॥४७॥
कमला.
गण - स, म, स, ग.
यति - ५, ५.
स म सा गां तीं वृत्त करी तूं. । कमलानाथीं प्रेम धरीं तूं.
यति दों बाणीं योजुनि आणीं; । सुजनीं शोभे तैं तव वाणी. ॥४८॥
मत्ता.
गण - म, भ, स, ग.
यति - ४, ६.
जाणों मत्ता म भ स ग युक्ता. । सर्वांमध्यें सखिं अति शक्ता.
अब्धीषंट्कीं भज यति मानें. । स्वर्गीं देवीं फिरशि विमानें. ॥४९॥
मनोहरा.
गण - न, र, ज, ग.
न र ज गीं मनोहरा बरी. । सुनर सेविती इला जरी,
परम पावती सुखासि ते; । सुजनमान्य ते, महामते. ॥५०॥
भामिनी.
गण - र, र, र, ग.
र त्रयांतीं गुरू येक साजे, । भामिनी नाम तीचें विराजे.
मानली सत्कवींलागिं चित्ता. । योजते पुष्प तें, भाग्यवंता. ॥५१॥
मनोरमा. ( कामदा )
गण - र, य, ज, ग.
हे मनोरमा रा य जा गुरू, । सत्कवी जनां फार आदरू.
रंजवी मना पद्मलोचना, । अंगनामणी, आणिं लोचना. ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP