TransLiteral Foundation

दासोपंत चरित्र - पदे ६७६ ते ७००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


पदे ६७६ ते ७००
त्यागून संपूर्ण विषये । ह्रदयी धरुनि दत्तात्रेय । वृत्ति करुन तन्मये । तप करितसे स्वानंद ॥७६॥ आधीच ते सौंदर्यसिंधु । तपबळेच शोभतसे सुखेंदु । त्यास पाहतां तेथील मुनिवृंदु । ब्रह्मानंद मनी होतसे ॥७७॥ मांडून दृढासन । करुन एकाग्र मन । एकाकार आपण होऊन । एकपणे एका ध्यातसे ॥७८॥ एकावांचून नसे अनेक । अनेकी पाहतां एकले एक । जेवि अनेक घटी तरणी देख । एकला दिसे अलिप्त ॥७९॥  एकमेवाद्वितीय ब्रह्म । ऐशी श्रुती गर्जतसे संभ्रम । यास्तव पंत होऊन सप्रेम । एका करितां तप करितसे ॥८०॥ एक तो नामरुपातीत । सच्चिदानंद सदोदित । सहजानंदकारक सद्भक्त - । स्वामी श्रीदिगंबरु ॥८१॥ दिगंबर करुनि चित्तप्रवेश । तप करिता द्वादश वरुषॅं । स्वप्नी प्रकटून स्वप्रकाश । अवधूत काय आज्ञापि ॥८२॥ गंगातीरी राक्षसभुवन । तेथे तूं जाय येथून । वाळवंटी पादुका जाण । असे माझ्या सत्यत्व ॥८३॥ तेथे तूं तप करित असतां । सहज होईल साक्षात्कारता । भेटेन मी अवधूता । अनायासें तुजलागी ॥८४॥ यापरी पाहतां स्वप्न । काय केलें पंत आपण । येते झाले राक्षसभुवन । जेथे पादुका श्रीदिगंबरु ॥८५॥ तेथे पाहतां गंगा गोमटी । पंतास न समाये हर्ष पोटी । साष्टांग वंदून उठाउठी । स्तवन करितसे स्वानंद ॥८६॥ जय जय गंगे त्रितापभंगे । जय जय गंगे शिवजटातरंगे । जय जय गंगे परम सौभाग्ये । सौभाग्यकारके सज्जने ॥८७॥ जय जय गंगे अनंगजनकदोद्भूते । जय जय गंगे सौख्यदाते । जय जय गंगे दारिद्रदु:खहर्ते । सद्भक्तपाळके नमोस्तु ते ॥८८॥ जय जय गोदे गौतमवचनपालके । जय गोदे गोकृतपातकहारके । जय गोदे गोविंदपददायके । भवहारके कल्याणी ॥८९॥ गंगे तव मज्जनरंग । चढती ज्यासि बाह्यांतरंग । त्याचे पायी लोळे अनुराग । सर्व भोग भोगितां ॥९०॥ भोगितां सर्व राजभोग । त्याला न लागे संसाररोग । तव प्रसादें पावे पद अभंग । श्रीरंगाचे निश्चये ॥९१॥ अद्वयानंद भरुन दोन्ही तीर । अखंड वाहतसे निर्मल नीर । त्यावरि उठतसे प्रेमलहर । पाहतां सप्रेम चढतसे ॥९२॥ गंगा गोदा ऐसे म्हणतां । शत योजनी कां असे तो वदता । सर्व पापांपासूनि मुक्तता । करुन देशी विष्णुपद ॥९३॥ अच्युतपदापासूनि तूं च्युत । तरी तव स्नाने देशी अच्युत । ऐसा तव महिमा अत्यद्भुत । आदिमाते श्रीगंगे ॥९४॥ यास्तव तुझे वाळवंटी । सहज वसे श्रीजगजेठी । आतां पाहीन मी निजदृष्टी । स्वामी माझा श्रीदिगंबरु ॥९५॥ यापरी स्तवूनि हरिख । पाहते झाले पादुका सुरेख । कोटिसूर्यप्रभासारिख । दत्तात्रेयाची त्या काळी ॥९६॥ पाहतां पादुकां गोमटी । पंतास न माये हर्ष पोटी । ब्रह्मानंदे दाटली सृष्टी । आटले सहज भेदजळ ॥९७॥ उघडितां दृष्टि अद्वय । वृत्ति झाली तन्मय: । स्तवनस्तुतीचे बोल निश्चये । राहिले सहजसिंहज तेव्हा ॥९८॥ ऐसे होतां घटिका चार । पंत पाहतसे उघडून नेत्र । नेत्री चालिले असे प्रेमनीर । तेणे अभिषिंचती पादुका ॥९९॥ पादुकांची करुन पूजा । जोडून दोन्ही हस्तांबुजां । स्तवन करीतसे सहजींसहजा । योगिराजासि तेधवा ॥७००॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:51:49.9830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

युद्ध

  • न. दोन पक्षांमधील द्वंद्व ; झुंझ ; यामध्यें अनेक लढाया होतात व हें दीर्घकाल चालतें . ( सं .) 
  • न. 
  • लढाई ; रणकंदन . 
  • भांडण ; मारामारी ; झुंज ; दोन व्यक्तींचा , पक्षांचा , झगडा , लढा , सामना . समासांत कुक्कुटयुद्ध ( कोंबड्यांची झुंज ); मेषयुद्ध ( मेंढ्यांची साठमारी ); गजयुद्ध ; मल्लयुद्ध ( मल्लांची झोंबी , कुस्ती ); तलातलयुद्ध ( हातांनीं केलेली मारामारी ); गदायुद्ध ; मुष्टियुद्ध इ० [ सं . युद्ध , युध = लढणें ] ( वाप्र . ) युद्धास तोंड लागणें - युद्ध सुरु होणें . कलहास , मारामारीस , वादास वगैरे आरंभ होणें . सामाशब्द - 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

कोणतीही ही पूजा करण्याआधी संकल्प कां करावा?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site