दासोपंत चरित्र - पदे ६५१ ते ६७५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


यापरी बोलतां तेथील लोक । बोले काय ते सद्भक्तटिळक । कार्य असतां सम्यक । दिगंबरे येथे आणिले असे ॥५१॥ तरी तें काय कार्य । ऐसे ह्मणतां निश्चये । सांगेन त्याचे अभिप्राय । ते ऐकावे सज्जनहो ॥५२॥ जें कार्य साधितां सहज । उरुंच नये कार्य दुजॅं । ते कार्य असतां सहज । सहज आलों या स्थळा ॥५३॥ या स्थळी ते कार्यसिध्दि । होईल वाटे त्रिशुध्दी । ऐसे बोलत असतां विशुध्दी । साचे बोला मी आलों ॥५४॥ जै वेदासि न कळे ज्याची गती । शास्त्रांची मति खुंटती । पुराणै वर्णितां थकती । तय वस्तूस्तव मी आलो ॥५५॥ जे मनोवाचा अगोचर । शेषादिक नेणती पार । जो मायानियंता परात्पर । त्यास्तव सहज मी आलों ॥५६॥ ज्यास्तव करिती हटयोग, । ज्यास्तव साधिती अष्टांगयोग, । ज्यास्तव दाविती राजयोग, । त्यास्तव सहज मी आलो ॥५७॥ जे ब्रह्मादिकांचे देवतार्चन । सनकादिकांचे ध्येय पूर्ण। त्याचे प्राप्तीस्तव जाण । सहज येथे मी आलो ॥५८॥ त्यांचे प्राप्तीचे द्वार । हा नरदेह हे खरॅं । आह्मां प्राप्त असतां निर्धार । पातलों त्यास्तव या स्थळी ॥५९॥ नरदेहइच्छा ब्रह्मादिकां । असे की पावून कर्मभूमिका । साधून घ्यावें आत्मसुखा । तरी मजला सहज प्राप्त असे ॥६०॥ जरी नरदेह जाय वोखर । कैचा प्राप्त श्रीदिगंबर । दिगंबरप्राप्तीस्तव निर्धार । आलों सहज जाणावे ॥६१॥ यापरी पंताची विवेकवाणी । पडतां तेथील लोकश्रवणी । ते ह्मणती अंत:करणी । हा कोण असे कळेना ॥६२॥ हा तो दिसे अत्यंत बाळ । परी अगाध असे याचे बोल । बोलमाजी सुखाचे डोला सहज आह्मां येतसे ॥६३॥ हा तो नव्हे सामान्य । हा तो दिसे अति सुज्ञ । याचे बोलमाजी प्राज्ञाकळून येतो आह्मांसि ॥६४॥ हा असेल योगभ्रष्ट । पुढे होईल अति श्रेष्ठ । ऐकतां याची गोष्ट । प्रबोधासि हेतु पै होतो ॥६५॥ यापरी बोलून एकमेक । पंतांसि बोलती अति हरिख ।" तुझा कोण असे देशिक ? । नांव सांग निर्धार ॥६६॥ कोणते श्रीगुरुपाशी । हे ज्ञान प्राप्त तुह्मांसि । ते सांगावे सविस्तरेसि । बाळराजा निजसखया ॥६७॥ पंत बोले मधुरोत्तर । आमुचा गुरु श्रीदिगंबर । तो वसे माझे ह्रदयांतर । नेणो त्याविण दुजयासि ॥६८॥ तोच माझा मातापिता । तोच बहिणी आणि भ्राता । त्याविण कोणीच तत्वतां । मजला नसे सज्जनहो ॥६९॥ आक्षेपूं नये श्रोते आपण । पंतास नसतां उपदेश पूर्ण । त्यांला कैचे देहज्ञान । श्रीगुरुविण असेल ॥७०॥ गुरु न सांगता मंत्र पूर्ण । कैचे घडेल अनुष्ठान । आणि त्यांचे न होतां पुनश्चरण । दिगंबर कैचे त्या प्राप्ती ॥७१॥ दिगंबरप्राप्तीकारण । शरण रिघावे सद्गुरुचरण । देशिकाराजदयेविण । प्राप्त कैचा दिगंबरु ॥७२॥ तारी ते मानवी लोकांस । आधी पाहिजे गुरुपदेश । तेणे योगे तयांस । प्राप्त होय गुरुपद ॥७३॥ हे तरा अवतारपुरुष । सहज जग तारवयास । अवतरुन मानवी वेष । क्रीडतसे स्वच्छंद ॥७४॥ असो महाराज दासोपंत । पुसून तेथील लोकांते । आपण बसले तप करीत । अन्नादि विषय त्यागून ॥६७५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP