दासोपंत चरित्र - पदे २२६ ते २५०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


यापरी बोलोनि त्यांसि । पुढे वोतिल्या द्रव्यराशी । ते द्रव्य पाहतां सर्वत्रासि । आश्चर्य फार पै झाले ॥२६॥ द्रव्य मोजिजेपर्यंत । तो तेथेच होता उगीच पाहत । पादशासहि द्रव्यासक्त । पाहतांच गेला तेथून ॥२७॥ मग पादशा हुडका - हुडक । त्यास्तव फार करवितां देख । न सापडतां बोलती लोक । आतांच येथे उभा असे ॥२८॥ पादशाचे अंत:करणी । पुनरपि त्यास पाहवे नेत्र भरुनि । तो कांहीच न सांपडे कोणालागूनि । सर्वत्र पाहती अधोवदन ॥२९॥ लोक ह्मणती, घालून मोहन । गेला काय त्या मनुष्यान । यापरी त्रिविध प्रकारे जन । बोलते झाले एकमेकां ॥३०॥ मीहीं एकदां तरी येथ । नाही पाहिला जी तो दूत ।परंतु तो होता वोळखित । मजला फार स्नेहाने ॥३१॥ संपूर्ण द्रव्य मोजिजेपर्यंत । तो उभा होता मजकडे पाहत । मज पाठवा ह्मणून त्वरित । करीत होता त्याकाळी ॥३२॥ तो तेव्हा मज अत्यंत आप्त । भासत होता मनांत । काय वोंवाळून जाऊं त्यावरुन । ऐसे फार गमतसे ॥३३॥ तो केवळ माझा प्राणसखा । किंवा माझे ब्रह्मत्व देखा । यास्तव पातला की एकाएकी । यापरी आनंद होतसे ॥३४॥ त्या आनंदाची गति । काय वर्णावी तुह्मांप्रति । तो दूत नोव्हे आनंद - मूर्ति । ऐसे गमतसे सर्वस्व ॥३५॥ तेव्हां पादशा बोले काय । धन्य तुझा पिता होये । धन्यच तुमचा वंश निश्चये । सत्यवादी शिखामणी ॥३६॥ यापरी करुन हर्षभाषण । मजला करुन सन्मान । मणिमय अलंकारादि देऊन । पाठविता झाला मजलागी ॥३७॥ नूतन करुन सुखासन न। निजसंनिधि मज आरोहण । करुन मज अत्यंत मधुर भाषण । दर्शनास आपुले पाठविले ॥३८॥ आपुले असतां आशीर्वाद । कालत्रयी मज असे आनंद । आनंदमय आपुले पाद । ह्मणूनि पुनरपि वंदिले ॥३९॥ ऐकता निजपुत्रांचे वचन । पित्याचे नेत्री प्रेमजीवन । येतांच बोले काय सुतालागून । तें ऐकावें भाविक हो ॥४०॥ कैचे द्रव्य रे आह्मापाशी । कोणी पाठविले दूतासि । हे कांहीच ठाऊक नसे आह्मांसि । मनुष्य कोठील । कोण ? कळेना ॥४१॥ आह्मी केवळ द्रव्यहीन । कोठून पाठविले द्रव्य पूर्ण । तुझी आशा समूळ सोडून । राहिलो होतो चिंता तुर ॥४२॥ धन्य स्वामी श्रीअवधूत । जो मम कुळीचा कुळदैवत । तोच येऊनि निश्चित । तुज पुत्रासि मुक्त केला ॥४३॥ आतां याचिया उपकारा । कांहीच नसे पारावारा । तोच माझा आप्त सोइरा । अंतरात्मा दयाळू ॥४४॥ आह्मी केवळ पामराहूनि पामर । आमुचे अपराधांस नसे पार । तो भक्तवत्सल जगदोध्दार । जगदानंदकारक ॥४५॥ ज्यास वर्णितां वेद मुकावले । सहा शास्त्रांची गति खुंटले । अठराही हिंपुटी झाले । मग इतरांची काय गती ॥४६॥ ज्याचिये श्रीचरणकमळी । इंद्रादिक देव सकळी । मिलिंद होऊनि वेळोवेळी । मकरंद सेविती आल्हादे ॥४७॥ जो योगीमनोब्ज - भृंग । जो निर्गुण निर्विकार नि:संग । नित्यानंद निर्मळ अभंग । अंगागंचाळक अविनाश ॥४८॥ ज्यास्तव करिती सत्कर्म सांग । ज्यास्तव दाविती हटयोग । करिता शीणती राजयोग । अशांसही तो सापडेना ॥४९॥ तीर्थ करितां वय नासती । त्यांसही नव्हेचि प्राप्ति । कैसा तुष्टला मज दीनाप्रती । दीनवत्सल दयाळू ॥२५०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP