मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
दु:खाच्या गा भिंती पाडाव्...

प्रा. विठ्ठल सदामते - दु:खाच्या गा भिंती पाडाव्...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


दु:खाच्या गा भिंती
पाडाव्यात किती
कधी ना पडती
आपसूक

कुणी ना सुटले
कुणा ना चुकले
दु:खात पोळले
राजा - रंक

टाकीचे हे घाव
पाषाणाला ठावं
मगचि गा देव
होय सुख

मेजवाने थाट
पक्वान्नाचे ताट
तरी लागे मीठ
तसे दु:ख

ऐक रे माणसा
दु:खाच्या जाणिवा
मार्गातला ठेवा
दिवा एक

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP