मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
आई मेंढ्या हाकत आहे, पाप ...

भूषण कटककर - आई मेंढ्या हाकत आहे, पाप ...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


आई मेंढ्या हाकत आहे, पाप दिवंगत आहे
लुगढ्याच्या झोपाळ्यावरती बाळ तरंगत आहे

पायामध्ये चाळ बांधुनी बैठकीस आल्यावर
मूल रडत नाही ना, बघणे फार विसंगत आहे

स्थलांतराच्या सातत्याची चिंता नाही त्यांना
स्वार्थासाठी त्यावरती लिहिणारा खंगत आहे

‘ तुम्ही फक्त माझे काका ना, ’ म्हणत बिलगली पोरे
हीच एक त्या अनाथ जगण्यामधली रंगत आहे

ढकलाढकली करत मिळवती जागा जेवायला
उद्या कदाचित नसणार्‍यांची अंतिम पंगत आहे

मीच एकटेपणा स्वत:चा इथे घालवत बसलो
वृद्धांना तर आश्रमात स्मरणांची संगत आहे

मनातले जर व्यक्त न केले, अशीच घुसमट होते
तुला रात्रभर झोप न येणे पूर्ण सुसंगत आहे

आमच्यातले प्रेम कसे वाढेल...पाहण्यामध्ये
मी पारंगत नसलो तर मग ती पारंगत आहे

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP