मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
आणि तू वृद्धाश्रमवासी मला...

दिगंबर जोशी - आणि तू वृद्धाश्रमवासी मला...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


आणि तू वृद्धाश्रमवासी मला म्हणालास :
“ ...खांदा देणार्‍या माझ्या चारही काठ्या
सागरापलीकडच्या समृद्ध परदेशांत असतात;
पण तुझी एकुलती एक काठी तर
अगदी हाकेच्या अंतरावर आहे ना ?
मग होते का रे तुमची कधी ओझरती दृष्टिभेट ? ”
मी तुला समजावत म्हणालो :
“ आमच्या गाठी - भेटीबद्दल विचारशील तर
अशी अपेक्षा करणं म्हणजेसुद्ध -
कुणा दूरदृष्टीच्या योग्यानं इशारा देऊनही -
फ़ळाची अपेक्षा धरणं, असंच नाही का होणार ? ”
त्यावर तू म्हणालास : “ अरे, या मावळत्या, एकाकी आयुष्यात
उरल्यासुरल्या काठीचा आधार असावा,
असं नाही का रे वाटत ? ”
मी आवंढा गिळून म्हटलं :
“ ज्यांच्याकडं एकतरी काठी आहे,
त्यांच्याबद्दल तू विचारतोयंस तर...? ”
आणि श्वासाच्या विरामानंतर मी पुटपुटलो ;
“ उभं आयुष्य ज्यांच्या पुढं आ वासून उभं आहे अशा,
माझ्यापेक्षा आधाराची अधिक गरज असणार्‍याला
ती काठी आधार देत असेल
अशी आपणच आपल्या अडगळीतल्या
वेडगळ मानची समजूत घालू शकत नाही का ? ”
“ हे तर स्वत:चं सांत्वन स्वत:च करण्यासारखं झालं...! ”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP