मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
कितीतरी दिवसांनी काल स्वत...

संदीप वाकोडे - कितीतरी दिवसांनी काल स्वत...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


कितीतरी दिवसांनी
काल स्वत:लाच भेटलो
स्वत:चीच केली थोडी चौकशी
अन् स्वत:जवळच बसलो घटकाभर...

तेव्हा लक्षात आलं,
ज्याच्यासाठी धावत होतो गर्दीसोबत
गर्दीतला एक होऊन

तो सापडला आहे मला माझ्यातच
कितीतरी दिवसांनी
काल...!

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP