माला २५१ ते ३००

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य


वा  सना दुष्ट धरूनी । दुष्टसंगती करूनी ।
पाप केलें हर्षूनी । भागी कोणी नसे त्याचा ॥५१॥
र  डोनी ऐसी स्वकर्मासी । संतापूनी मानसी ।
शरण जावूनी द्विजासी । निवेदी त्यासी सर्वही ॥५२॥
य  मयातना टाळाया । जन्मारभ्य पाप तया ।
निवेदितां माझी दया । आली तया विप्रासी ॥५३॥
नि  र्मळ होसी म्हणे द्विज । सर्व सोडुनी दे आज ।
थोर तीर्थ प्रयागराज । तारील तूज निर्धारें ॥५४॥
वा  रावया पापासी । शीघ्र जायीं प्रयागासी ।
क्षाळिसी सर्व पापासी । अनुतापासी पावतां ॥५५॥
र  मणीय त्याचें वचन । निश्चयें अंगीकारून ।
गृह भूषा धन स्वजन । सर्व सोडून दिधलें ॥५६॥
य  मयातना पुढें जाणूनी । पाप मनीं आणूनी ।
चित्तीं अनुतापूनी । विप्रा वंदुनी विनविलें ॥५७॥
व्या  कूळ झालें माझें मन । करा त्याचें समाधान ।
प्रयागीं करितां माघस्नान । मत्समान तरे कीं ॥५८॥
धीन्  धीन् थै थै करोनी । सर्व जन लुटोनी ।
पाप केलें त्याची धुणी । कराया मनीं स्थिरावें ॥५९॥
वि  श्वास व्हावया चित्ता । सांग एक प्राचीन कथा ।
कोण पापी प्रयागीं न्हातां । तरला दुरितापासुनी ॥२६०॥
ना  नापरी विनवितां । विप्र वदे ऐक आतां ।
गती लाधली पुरुहूता । सर्व दुरिता वारुनी ॥६१॥
श  ची ज्याची असे प्रिया । उर्वश्यादि वश्य जया ।
दुर्बुद्धी त्या देवराया । बरी न या दवडूनी ॥६२॥
य  मादि योगसंपन्न । गौतमर्षीं तपोधन ।
तत्पत्नी अहल्या जाण । तीवरी मन इंद्र करी ॥६३॥
वि  वेक सोडुन स्वर्गाहुन । इंद्र आला भुलोन ।
गौतमस्वरूप धरून । कामुक होवुन पातला ॥६४॥
ना  हीं गौतम जाणून । स्वयें गौतम बनून ।
अहल्येपासीं येवून । तीला फसवून उपभोगी ॥६५॥
श  तक्रतू करोनी । देवाधिपत्य पावुनी ।
स्वर्गी राहे तोची मनीं । हें घेवोनी बुडाला ॥६६॥
य  ज्ञीं ज्याचा पूर्वभाग । तो करी ऐसें आग ।
तत्क्षणीं ये ऋषी सवेग । जाणोनी मग इंद्र भ्याला ॥६७॥
दु:  खी होवूनी ये बाहेर । गौतमें जाणोनी सत्वर ।
शापिला कीं अंगावर । भगें सहत्र पडतील ॥६८॥
खं  ती करी अहल्या ती । अज्ञानें हो दुर्मती ।
मुनी शापूनि शिला करिती । पुढें रामें ती उद्धरिली ॥६९॥
ह  तदैव देवेश । भगें पडतां शरीरास ।
मेरुपर्वती गुहावास । करी त्रास पासून ॥२७०॥
र  डे केल्या कर्मासी । धिक्कारी आपणासी ।
विरह झाला शचीसी । बृहस्पतीसी ती पुसतसे ॥७१॥
ह  सोनी म्हणे बृहस्पती । चला दावूं देवपती ।
शची देवांसह येती । मेरुपर्वतीं तेधवां ॥७२॥
र  डत बैसला देवेश । बृहस्पती दावी तयांस ।
लाजोनी इंद्र देहास । झांकोनी ठेवी ते क्षणीं ॥७३॥
दा  टोनी शोकें गुरूला । इंद्र म्हणे तारा मला ।
पुन: न करीं ह्या कर्माला । अनुग्रह केला पाहिजे ॥७४॥
रि  घतां शरण गुरूतें । दयेनें तो वदे त्यातें ।
जावूनी ब्रह्मक्षेत्रातें । तीर्थराजातें सेवीं तूं ॥७५॥
द्रं  ममित धन दान । देतां होय मेरुसमान ।
खास ज्याला उपमान । न ये त्रिभुवनतीर्थाची ॥७६॥
वि  विध पापें जो हरी । तेथें तूं स्नान करीं ।
हें ऐकूनी वृत्रारी । जावूंनी करी मकराकीं स्नान ॥७७॥
द्रा  क्पाप जावून । इंद्र झाला सहस्रनयन ।
तूं करीं त्रिवेणीस्नान । चित्तीं चिंतून शंकरा ॥७८॥
व  चन ऐसें विप्राचें । परिसोनी मनाचें ।
स्थैर्य करोनी प्रयागाचें । केलें त्याचें दर्शन ॥७९॥
य  त्स्नान तीन दिन । करितां पाप जावून ।
शेष मासस्नानें जाण । अप्सरापण मज आल्यें ॥२८०॥
वि  दुषी होवुनी कैलासीं । राहें गौरीहरापासीं ।
अद्यापी माघमासीं । प्रतिवर्षीं स्नान करीं ॥८१॥
द्रा  क्तारिलें हा उपकार । स्मरोनी कराया दूर ।
कृतघ्नत्वा सादर । ऐसा निर्धार केला म्यां ॥८२॥
व  चन तीचें परिसूनी । राक्षस वदे नमूनी ।
पूर्वजन्म आठवूनी । खिन्न होवुनी निवेदीं मी ॥८३॥
य  न्नामाचें स्मरण । करी पाप निवारण ।
त्या काशींत जन्मून । श्रेष्ठ ब्राह्मण मी होतों ॥८४॥
दे  वर्षिपित्रर्चन । न घडलें विप्रतर्पण ।
न केलें इष्टापूर्तदान । न केलें स्नान गंगेचें ॥८५॥
हं  सजप किंवा ध्यान । न केलें घेतलें दान ।
दुष्टापासून अनुदिन । ब्रह्मस्व हिरोन घेतलें ॥८६॥
पो  ट भरीं अभक्ष्यभक्षणें । सत्यवार्ता कधीं नेणें ।
सर्व पापें पूर्णपणें । देती ठाणें माज्याठायीं ॥८७॥
ष  डिंद्रियें नावरलीं । थोरांची बोली नायकिली ।
काशीक्षेत्रीं मृती आली । दैवें झाली दुर्दशा ॥८८॥
य  न्नाम अविमुक्त । जेथें सर्व होती मुक्त ।
तेथें होतां पापसक्त । भैरव युक्त दंडी त्याला ॥८९॥
पो  ञ्चतां अन्यत्र मरण । त्याला यमयातना दारुण ।
काशींत मरतां जाण । भैरवशासन क्षेत्रपाप्या ॥२९०॥
ष  ट्शास्त्रीं असोनि निपुण । क्षेत्रीं केलें पापाचरणं ।
म्हणोनीं विश्वेश्वरें जाण । भैरवशासन योजिलें ॥९१॥
य  च्छासनें नवू योनी । प्रेतभूतादि भोगूनी ।
दाहावें जन्म ये स्थानीं । राक्षसयोनी मिळाली ॥९२॥
चित्  तीं नसे सुखलेश । भोगीतसें दारुन क्लेश ।
माझे दृढकर्मपाश । मोक्षीं निराश होतों मी ॥९३॥
तं   टा करोनी ब्राह्मण । जिंकीं विद्यामदें जाण ।
त्याचें फळ हें दारुण । राक्षसपण शेवटीं ॥९४॥
तो  क्षेत्रवास केवळ । झाला आतांची सफळ ।
पदरीं तेंची पुण्यबळ । दर्शनें कळतसे तुझ्या ॥९५॥
ष  ष्ठीसहस्र संवत्सर । या जन्मास झाले फार ।
कष्ट भोगिले आतां तार । मातें सत्वर दयेनें ॥९६॥
य  थार्थ सर्व सांगून । ब्रह्मराक्षस नमून ।
आड पडला तें पाहुन । वळली कांचनमालिनी ॥९७॥
तो  जरीं महापाप । त्याला कराया विपाप ।
ती दयेनें आपोआप । त्याचे ताप निवारी ॥९८॥
ष  ष्ठीसहस्र वर्षें तूं रे । पाप भोगिलें येथें रे ।
नवू जन्मीं तसें सारें । कर्म बरें क्षाळिलें ॥९९॥
य  मयातना जरीं होत्या । चौर्‍याऐशीं लक्ष धिरट्या ।
कदापीही न चुकत्या । क्षेत्रवासें त्या वारिल्या ॥३००॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP