मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
अष्टत्रिंशोsध्याय:

अष्टत्रिंशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


गुरूं  स  भिक्षा द्याया आला । भास्कर विप्र सामग्रीला ।
तिघां पुरति घेउनी त्याला । भक्तीं नेला प्रसादा ॥१॥
तो स  र्व  सामग्रीला । निजे घेउनि उसेला ।
तीन मास असा त्याला । न मिळाला शून्य वार ॥२॥
त्या हा  स्य  करिती लोक । गुरु करविती पाक ।
म्हणती सांगें सर्व लोक । तो सांगे सर्वां भोजना ॥३॥
ते त्या  चा  बोला हंसती । कण वांट्या न ये म्हणती ।
तें तो सांगे गुरूप्रती । बोलाविती ते त्यां सर्वां ॥४॥
निर  हं  कार तो ब्राह्मण । करी पाक सुनिष्पन्न ।
गुरू वस्त्रें झांकवून । नेववून वाढविती ॥५॥
द्विज  हृ  ष्टचित्त जेविती । थोर सान सर्व येती ।
चार हजार झाली मिती । ते जेविती आकंठ ॥६॥
अन्न  दि  ल्हें सर्व जातीला । आचंडालश्वकाकांला ।
तरी तोटा नाहीं आला । जेवविला गुरूनें विप्रा ॥७॥
अन्न  सं  पेना  तें जळीं । जलचरां दे त्या वेळीं ।
झाली ख्याती भूमंडळीं । वर त्यावेळीं देती विप्रा ॥८॥
हर्षु  नि  यां वदती लोक । तिघांपुरता होता पाक ।
जेविले हे अमित लोक । हें कौतुक दुसरें ऐक ॥९॥
इतिश्री० प० प० वा० स ० वि० सारे अन्नपूर्तिकरणं नाम अष्टत्रिंशो० ॥३८॥ग्रं० सं०॥५१३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP