TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|स्तोत्र भारती कण्ठहारः|
श्रीकपिलस्तुति:

श्रीकपिलस्तुति:

स्वामि श्री भारतीकृष्णतीर्थ यांनी जी देवदेवतांवी स्तुती केली आहे, अशी क्वचितच् इतरांनी कोणी केली असेल.


श्रीकपिलस्तुति: [ नलिनी ]
त्रिजगत्कुशलप्रवणस्वधियम् । त्रिदशालिनुतं कपिलं कलये ॥१॥
प्रणवत्करुणाम्रुतनीरनिधिम् । भजदीप्सितदं कपिलं कलये ॥२॥
गजवाजिमुखप्रदपादनतिम् । मनुजातनयं कपिलं कलये ॥३॥
विजितेन्द्रियधीमनसां सुलभम् । नतहर्षकरं कपिलं कलये ॥४॥
कुशलार्थकलानिकरे कुशलम् । उरगेशनुतं कपिलं कलये ॥५॥
उडुपाग्रभवापतिरूपधरम् । नतकामितदं कपिलं कलये ॥६॥
अखिलामृतपप्रणतस्वपदम् । द्रविणव्रजदं कपिलं कलये ॥७॥
सुरहूत्युदरोद्भवकर्दमजम् । विभवावलिदं कपिलं कलये ॥८॥
द्विरदाननषण्मुखमुख्यनतम् । चतुरास्यनुतं कपिलं कलये ॥९॥
करुणाजनिभूहृदयाम्बुभवम् । निटिलाक्षनुतं कपिलं कलये ॥१०॥
अजदाररमागिरिजादिनुतम् । रुचिरात्मतनुं कपिलं कलये ॥११॥
जलराशिजनुस्ततिहासिमुखम् । नयसन्ततिदं कपिलं कलये ॥१२॥
जितबिम्बनिजाधरबिम्बरुचिम् । नतसद्गतिदं कपिलं कलये ॥१३॥
प्रणवप्रमुखाखिलमन्त्रतनुम् । प्रणवप्रवणं कपिलं कलये ॥१४॥
सुखदु:खसमाशयवत्सुलभम् । जगतामधिपं कपिलं कलये ॥१५॥
अधरीकृतवाग्धरकान्तिरुचम् । निखिलार्त्तिहरं कपिलं कलये ॥१६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:55:46.6470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दुर

 • अ. दुष्टपणा ; वाईटपणा , कठिणपणा , दुःख इ०कांच्या वाचक शब्दापूर्वी योजावयाचा उपसर्ग . जसेः - दुराचार = वाईट वर्तणूक ; दुर्लभ = मिळण्यास कठिण ; दुस्सह = सहन करण्यास कठिण इ० . याची संधिनियमानुरुप दुर , दुस , दुष , दुश इ० रुपे होतात . जसेः - दुर्लभ दुष्कर , दुश्चल , दुस्सह , दुस्साध्य , दुराचार , दुरंत इ . हा उपसर्ग जोडून अनेक सामासिक शब्द बनतात . त्यांपैकी कांही येथे दिले आहेत . दुरंत - वि . १ अपार ; अनंत ; अमर्याद ; अंत लागण्यास कठिण असा ( मोह , माया इ० ). २ अतिशय कठिण ; तीव्र ( दुःख इ० ). [ दुर + अंत = शेवट ] दुरतिक्रम - वि . १ ओलांडून जाण्यास कठिण ; दुस्तर ; दुर्लघ्य . २ असाध्य . [ दुर + अतिक्रम = ओलांडणे ] दुरत्यय - यी - वि . १ नाश करुन टाकण्यास कठिण . २ प्रतिबंध करण्यास , टाळण्यास कठिण ; अपरिहार्य . ३ असाध्य ( दुःख , आजार , रोग इ० ). अप्रतीकार्य ( अडचण , संकट ). ४ मन वळविण्यास कठिण असा ( मनुष्य ); दुराराध्य . [ दुर + अत्यय = पार पडणे , जाणे इ० ] दुरदृष्ट - न . दुर्दैव ; वाईट अदृष्ट की आड आले दुरदृष्ट माझे । - सारुह १ . १० . [ दुर + अदृष्ट ] दुरधिगम्य - वि . १ समजण्यास कठिण ; दुर्बोध ; दुर्ज्ञेय . २ दुष्प्राप्य ; मिळण्यास कठिण ; दुर्गम . [ दुर + सं . अधि + गम = मिळविणे ] दुरभिमान - पु . पोकळ , वृथा , अवास्तव अभिमान ; फाजील गर्व . [ दुर + अभिमान ] दूरवबोध - वि . दुर्बोध ; गूढ . [ दुर + सं . अव + बुध = जाणणे ] दुराकांक्षा - स्त्री . दुष्प्राप्य वस्तूचा अभिलाष . [ दुर + आकांक्षा = इच्छा , अभिलाष ] दुराग्रह - पु . हट्ट , लोकविरोध , शास्त्रविरोध , संकटे इ० कांना न जुमानतां एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरविण्याचा हट्ट ; अनिष्ट आग्रह . न सुखद दुराग्रह सखा हा सर्वाऽनर्थ गेह ठक राया । - मोकर्ण ४६ . ५० . [ दुर = वाईट + आग्रह = हट्ट ] दुराग्रही - वि . दुराग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा ; हेकेखोर ; हटवादी ; हट्टी . [ दुराग्रह ] दुराचरण , दुराचार - नपु . निंद्य , वाईट , वागणूक ; दुर्वर्तन ; दुष्ट आचरण . [ दुर = दुष्ट + सं . आचरण = वर्तन ] दुराचरणी , दुराचारी - वि . निंद्य , वाईट , दुष्ट वर्तनाचा ; बदफैली . [ दुराचार ] दुरात्मत्व - न . १ दुष्ट अंतकरण ; मनाचा दुष्टपणा . २ दुष्ट कृत्य . किमपि दुरात्मत्व घडले । [ दुर = दुष्ट + आत्मा = मन ] दुरात्मा - वि . दुष्ट मनाचा ( मनुष्य ); खट ; शठ . [ दुर + आत्मा ] दुराधर्ष - वि . जिंकण्यास , वर्चस्वाखाली आणण्यास कठिण . [ दुर + सं . आ + धृष = जिंकणे ] दुराप - वि . मिळविण्यास कठिण ; दुर्लभ ; अप्राप्य . राया , भीष्माला जे सुख , इतरां ते दुराप , गा , स्वापे । - मोभीष्म ६ . २९ . दुरापस्त , दुरापास्त - वि . घडून येण्यास कठिण ; दुर्घट ; असंभ्याव्य . वाळूचे तेल काढणे ही गोष्ट दुरापस्त आहे . [ दुर + सं . अप + अस = ] दुराराध्य - वि . संतुष्ट , प्रसन्न करण्यास कठिण , अशक्य ; मन वळविण्यास कठिण . मोक्षु दुराराध्य कीर होय । परि तोही आराधी तुझे पाय । - ज्ञा ११ . ९९ . [ दुर + सं . आराध्य ] दुराशा - स्त्री . निरर्थक , फोल , अवास्तव आशा ; दुष्प्राप्य गोष्टीची आशा दुष्ट वासना . आम्हास अन्न खावयास मिळेना आणि पालखीत बसण्याची दुराशा धरावी हे चांगले नव्हे . दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणी । - राम १६८ . [ दर + आशा ] दुरासद - वि . कष्टाने प्राप्त होणारे ; जिंकण्यास , मिळण्यास कठिण . [ दुर + सं . आ + सद = मिळविणे ] दुरित - न . पाप ; पातक ; संचितकर्म . पुन्हां न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो । - केका ११९ . [ दुर + सं . इ = जाणे ] दुरुक्त - न . वाईट , दुष्टपणाचे , अश्लील भाषण . [ दुर + सं . उक्त = बोललेले ; भाषण ] दुरुक्ति - स्त्री . वाईट भाषण ; शिवी ; अपशब्द ; दुर्भाषण ; अश्लील बोलणे . [ दुर + उक्ति = बोलणे ] दुरुत्तर - न . अपमानकारक , उर्मटपणाचे उत्तर ; दुरुक्ति . [ दर + उत्तर ] दुरुद्धर - वि . खंडण करण्यास , खोडून काढण्यास कठिण असा ( पूर्वपक्ष , आक्षेप , आरोप ). या सिद्धांतावर दोष दिला हा सर्वांस दुरुद्धर आहे . [ दुर + सं . ऊह = अनुमानणे ] दुर्गत - वि . गरीब ; दीन ; दरिद्री ; लाचार . झांकी शरपटलानी आढ्य जसा दुर्गतांसि वस्त्रांनी । - मोभीष्म ९ . ६५ . [ दुर + सं . गत = गेलेला ] दुर्गति - स्त्री . १ दुर्दशा ; वाईट स्थिति ; संकटाची , लाजिरवाणी स्थिति ; अडचण ; लचांड . २ नरक ; नरकांत पडणे . [ दुर + गति = स्थिति ] दुर्गंध - गंधी - पुस्त्री . घाण ; वाईट वास . - वि . घाण वास येणारे [ दुर = वाईट + सं . गंध = वास ] 
 • ०नाशक वि. ( रसा . ) दुर्गंधाचा नाश करणारे ; ( इं . ) डिओडरंट . [ दुर्गंध + सं . नाशक = नाश करणारा ] दुर्गंधिल वि . ( रासा . ) आर्सेनिक व मेथिल यांच्या संयोगापासून बनलेला विषारी , दुर्गंधी ( पदार्थ ) ( इं . ) कॅकोडिल . दुर्गम वि . जाण्यास कठिण ( स्थळ , प्रदेश इ० ). [ दुर + सं . गम = जाणे ] दुर्गुण पु . वाईट गुण ; दोष ; अवगुण ; दुर्मार्गाकडील कल . ( क्रि० आचरणे ). [ दुर + गुण ] दुर्गुणी वि . वाईट गुणांचा ; अवगुणी ; दुराचरी ; दुर्वर्तनी . [ दुर्गुण ] दुर्घट वि . घडवून आणण्यास , घडून येण्यास , सिद्धीस नेण्यास कठिण . [ दुर + सं . घट = घडणे , घडवून आणणे ] दुर्घटना स्त्री . अशुभ , अनिष्ट गोष्ट घडणे ; आकस्मित आलेले संकट , वाईट परिस्थिति . [ दुर + सं . घटना = स्थिति ] दुर्घाण स्त्री . दुस्सह घाण ; ओरढाण ; उग्रष्टाण . [ दुर + घाण ] दुर्जन पु . वाईट , दुष्ट मनुष्य . [ दुर + जन = मनुष्य , लोक ] दुर्जय वि . १ जिंकण्यास कठिण . २ दुस्साध्य ; दुस्तर . [ दुर + सं . जि = जिंकणे ] दुर्जर वि . पचविण्यास , विरघळण्यास कठिण . [ दुर + सं . जृ = जिरणे ] दुर्दम वि . दमन करण्यास , वर्चस्वाखाली आणण्यास कठिण . तिला इंग्लंडांतील प्रबल व दुर्दभ प्रजाजनांच्या अडथळ्याशिवाय दुसरे कोणतेच नियमन नसे . - पार्ल ६ . [ दुर + दम ] दुर्दर्श वि . दिसण्यास , पाहण्यास कठिण ; अतिशय अस्पष्ट . [ दुर + सं . दृश = पाहणे ] दुर्दशा स्त्री . अवनतीची , अडचणीची , संकटाची , वाईट , दुःखद स्थिति ; दुर्गति ; दुःस्थिति . भिजल्यामुळे शालजोडीची दुर्दशा जाली . [ दूर + दशा = स्थिति ] दुर्दिन न . १ वाईट दिवस . २ अकाली अभ्रे आलेला दिवस . ३ वृष्टि . - शर . [ दर + सं . दिन = दिवस ] दुर्दैव न . कमनशीब ; दुर्भाग्य . की माझे दुर्दैव प्रभुच्या मार्गात आडवे पडले . - मोसंशयरत्नमाला ( नवनीत पृ . ३४९ ). - वि . कमनशिबी ; अभागी . [ दुर + दैव = नशीब ] दुर्दैवी वि . अभागी ; कमनशिबी . [ दुर्दैव ] दुर्धर पु . एक नरकविशेष . [ सं . ] दुर्धर वि . १ धारण ; ग्रहण करण्यास कठिण . २ दुस्साध्य ; दुष्राप्य . ३ ( काव्य ) ( व्यापक ) बिकट ; खडतर ; असह्य ; उग्र ; कठिण . तप करीत दुर्धर । अगी चालला धर्मपूर । ४ भयंकर ; घोर ; भयानक . महादुर्धर कानन । [ दुर + सं . धृ = धरणे , धारण करणे ] दुर्धर्ष वि . दुराधर्ष ; दमन करण्यास , वर्चस्वाखाली आणण्यास कठिण ; दुर्दम्य ; अनिवार्य . [ दुर + धृष = जिंकणे , वठणीवर आणणे ] दुर्नाम न . अपकीर्ति ; दुष्कीर्ति ; बदनामी . [ दुर + सं . नामन = नांव ] दुर्निमित्त न . अन्याय्य , निराधार कारण , सबब , निमित्त . [ दुर + निमित्त = कारण ] दुर्निर्वह वि . १ दुःसह ; असह्य ; सहन करण्यास कठिण ; निभावून जाण्यास , पार पाडण्यास कठिण ( अडचण , संकट ). २ दुस्साध्य ; दुष्कर ; [ दुर + सं . निर + वह ] दुर्निवार , दुर्निवारण वि . १ निवारण , प्रतिबंध करण्यास कठिण ; अपरिहार्य ; अनिवार्य . २ कबजांत आणण्यास कठिण ; दुर्दम्य . [ दुर + नि + वृ ] दुर्बल वि . १ दुबळा ; अशक्त ; असमर्थ . २ गरीब ; दीन ; दरिद्री . ऐसे असतां एके दिवशी । दुर्बळ द्विज आला परियेसी । - गुच ३८ . ७ . [ दुर + बल = शक्ति ] दुर्बळी वि . ( काव्य . ) दुर्बळ पहा . दुर्बुद्ध वि . १ दुष्ट बुद्धीचा ; खुनशी वृत्तीचा . २ मूर्ख ; मूढ ; मंदमति ; ठोंब्या . [ दुर + बुद्धि ] दुर्बुद्धि स्त्री . १ दुष्ट मनोवृत्ति ; खुनशी स्वभाव ; मनाचा दुष्टपणा . दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा । - तुगा ७९८ . २ मूर्खपणा ; अनिष्ट परिणामकारक बुद्धि . - वि . दुष्ट मनाचा ; दुर्बुद्ध पहा . [ दुर + बुद्धि ] दुर्बोध वि . समजण्यास कठिण ( प्रंथ , भाषण इ० ). [ दुर + बोध = समजणे , ज्ञान ] दुर्भग वि . कमनशिबी ; दुर्दैवी ; भाग्यहीन . [ दुर + सं . भग = भाग्य ] दुर्भर वि . भरुन पूर्ण करण्यांस कठिण ; तृप्त करण्यास कठिण ( पोट , इच्छा , आकांक्षा ). इंद्रिये वज्रघाते तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिले काय करुं दुर्भर हे चांडाळ । - तुगा ३५४ . - न . ( ल . ) पोट . तरा दुस्तरा त्या परासागराते । सरा वीसरा त्या भरा दुर्भराते । - राम ८० . [ दुर + सं . भृ = भरणे ] दुर्भक्ष्य वि . खाण्यास कठिण , अयोग्य ; अभक्ष्य . [ दुर + सं . भक्ष्य = खाद्य ] दुर्भाग्य न . कमनशीब ; दुर्दैव . - वि . दुर्दैवी ; अभागी . [ दुर + सं . भाग्य = दैव ] दुर्भाव पु . १ दुष्ट भावना ; कुभाव ; द्वेषबुद्धि . २ ( एखाद्याविषयीची ) संशय ; वाईट ग्रह ; ( विरु . ) दूष्टभाव . [ दूर + भाव = भावना , इच्छा ] दुर्भाषण न . वाईट , अपशब्दयुक्त , शिवीगाळीचे बोलणे ; दुर्वचन पहा . [ दुर + भाषण = बोलणे ] दुर्भिक्ष न . १ दुष्काळ ; महागाई . २ ( दुष्काळ इ० कांत होणारी अन्नसामुग्री इ० कांची ) टंचाई ; कमीपणा ; उणीव . [ सं . ] 
 • ind  A depreciative particle and prefix employing inferiority, badness, grievousness, difficulty &c. 
 • ०रक्षित वि. दासांतील एक प्रकार ; आपले दास्य करावे एतदर्थ दुष्काळांतून वांचविलेला ( दास , गुलाम इ० ). - मिताक्षरा - व्यवहारमयूख दाय २८९ . [ दुर्भिक्ष + सं . रक्षित = रक्षण केलेला ] दुर्भेद वि . बुद्धीचा प्रवेश होण्यास कठिण ; दुर्बोध . तैसे दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय । - ज्ञा ६ . ४५९ . [ दुर + सं . भिद = तोडणे ] दुर्भेद्य वि . फोडण्यास , तुकडे करण्यास कठिण ( हिरा ; तट ). [ दुर + सं . भेद्य = फोडण्यासारखा ] दुर्मति स्त्री . १ दुर्बुद्धि ; खाष्टपणा ; कुटिलपणा . २ मूर्खपणा ; खूळ ; वेडेपणा . - पु . एका संवत्सराचे नांव . - वि . १ दुष्ट बुद्धीचा ; खाष्ट स्वभावाचा . २ मूर्ख ; खुळा ; वेडा . [ दुर + मति = बुद्धि , मन ] दुर्मद पु . दुराग्रहीपणा ; हेकेखोरी ; गर्विष्ठपणाचा हटवादीपणा . किती सेवाल धन दुर्मदा अमृतपदे ५८ . - वि . मदांध ; मदोन्मत्त ; गर्विष्ट . सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगी दुर्मद । - ज्ञा ११ . ४८० . [ दुर + मद = गर्व ] दुर्मनस्क , दुर्मना वि . खिन्न ; उदास मनाचा ; विमनस्क ; दुःखित . [ दुर + सं . मनस = मन ] दुर्मरण न . ( वाघाने खाऊन , पाण्यांत बुडून , सर्प डसून इ० प्रकारांनी आलेला ) अपमृत्यु ; अपघाताने आलेले मरण ; अमोक्षदायक मरण . [ दुर + मरण ] दुर्मिल , दुर्मील , दुर्मिळ , दुर्मीळ वि . मिळण्यास कठिण ; दुर्लभ . [ दूर + सं . मिल = मिळणे ] दुर्मुख पु . एका संवत्सराचे नांव . - वि . १ घुम्या ; कुरठा ; तुसडा ; आंबट तोंडाचा . २ तोंडाळ ; शिवराळ ; शिनाळ जिभेचा . दुर्मुखी स्त्रीचा त्याग करुन । संन्यास ग्रहण करावा । [ दुर + मुख ] दुर्मुखणे अक्रि . तोंड आंबट होणे ; फुरंगुटणे ; गाल फुगविणे ; ( एखाद्या कार्याविषयी ) उत्साहशून्यतेची चर्या धारण करणे . खायास म्हटले म्हणजे हांसत येतात आणि उद्योगाचे नांव घेतले म्हणजे लागलेच दुर्मुखतात . [ दुर्मुख ] दुर्मुखला वि . आंबट चेहर्‍याचा ; घुम्या ; कुरठा ; तुसडा . [ दुर्मुख ] दुर्मेधा वि . १ मंदबुद्धीचा . २ दुष्ट स्वभावाचा ; दुर्मति . [ दुर + सं . मेधा = बुद्धि ] दुर्योग पु . सत्तावीस योगांतील अशुभ , अनिष्ट योगांपैकी प्रत्येक . [ दुर + योग ] दुर्लघ्य वि . १ ओलांडता येण्यास कठिण ; दुस्तर ( नदी इ० ). २ मोडता न येण्यासारखी , अनुल्लंघनीय ( आज्ञा , हुकूम , शपथ इ० ). ३ निभावून जाण्यास कठिण ( काळ , वेळ इ० ). [ दुर + सं . लघ्य = ओलांडावयाजोगे ] दुर्लभ वि . मिळण्यास कठिण ; अलभ्य ; दुर्मिळ ; दुष्प्राप्य ; विरळा . अलीकडे आपले दर्शन दुर्लभ जाले . दुर्ललित न . चेष्टा ; खोडी . आमच्या विविध दुर्ललिताबद्दल गुरुजींनी कसे शासन केले ... - आश्रमहारिणी ७ . [ दुर + सं . ललित = वर्तन , चेष्टा ] दुर्लक्ष न . लक्ष नसणे ; हयगय ; निष्काळजीपणा ; गफलत ; अनवधान . - वि . १ लक्ष न देणारा ; अनवधानी ; गाफील ; बेसावध . तुम्ही गोष्ट सांगीतली पण मी दुर्लक्ष होतो म्हणून ऐकिली नाही . २ दिसण्यास , समजण्यास कठिण ; ईश्वराचे निर्गुण स्वरुप दुर्लक्ष आहे . [ दुर + सं . लक्ष्य ] दुर्लक्षण न . १ ( मनुष्य , जनावर इ० कांचे ) अशुभसूचक लक्षण , चिन्ह ; दुश्चिन्ह ; दोष ; वाईट सवय ; खोड ; दुर्गुण . हा घोडा लात मारतो एवढे यामध्ये दुर्लक्षण आहे . [ दुर + लक्षण = चिन्ह ] दुर्लक्षण णी वि . १ दुर्लक्षणाने , वैगुण्याने युक्त ( मनुष्य , घोडा इ० ). ( विरु . ) दुर्लक्षणी . २ दुर्गुणी ; दुराचारी ; दुर्वर्तनी . दुर्लक्ष्य वि . १ बुद्धीने , दृष्टीने अज्ञेय ; अगम्य . २ दुर्लक्ष्य इतर अर्थी पहा . [ दुर + सं . लक्ष्य ] दुर्लौकिक पु . अपकीर्ति ; दुष्कीर्ति ; बेअब्रू ; बदनामी ; कुप्रसिद्धि . [ दुर + लौकिक = कीर्ति ] दुर्वच , दुर्वचन , दुर्वाक्य न . १ वाईट बोलणे ; दुर्भाषण ; अशिष्टपणाचे , अश्लील , शिवीगाळीचे भाषण . २ अशुभ , अनिष्टसूचक भाषण . [ सं . दुर + वचस , वचन , वाक्य = बोलणे ] दुर्वह वि . १ वाहण्यास , नेण्यास कठिण . २ सोसण्यास , सहन करण्यास कठिण . - शर . प्रतिकूल . प दुर + वह ] दुर्वात उलट दिशेचा वारा . तुज महामृत्यूचिया सागरी । आता हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे । - ज्ञा ११ . ३४८ . [ दुर + सं . वात = वारा ] दुर्वाद पु . वाईट शब्द ; दुर्वच ; वाईट बोलणे ; भाषण . हां गा राजसूययागाचिया सभासदी । देखता त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वादी । निस्तेजिलासी । - ज्ञा ११ . १०१ . [ दुर + वाद = बोलणे ] दुर्वार वि . दुर्निवार ; अनिवार्य ; टाळण्यास , प्रतिकार करण्यास कठिण ; अपरिहार्य . २ आवरतां येण्यास कठिण ; अनिवार ; अनावर . [ दुर + वारणे ] दुर्वास सासुरवास ; कष्ट ; त्रास ; जाच . [ दुर + वास = राहणे ] दुर्वासना स्त्री . वाईट इच्छा ; कुवासना ; दुष्प्रवृत्ति . [ दुर + वासना ] दुर्विदग्ध वि . विद्येत न मुरलेला तथापि विद्येचा गर्व वाहणारा ; अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला . [ दुर + सं . विदग्ध = विद्वान ] दुर्विपाक पु . वाईट परिणाम . [ दूर + सं . विदग्ध = विद्वान ] दुर्विभावनीय वि . समजण्यास , कल्पना करण्यास कठिण . [ दुर + सं . विभावनीय = कल्पना करतां येण्यासारखे ] दुर्वृत्त वि . दुराचारी ; दुर्व्यसनी ; दुर्वर्तनी . [ दुर + सं . वृत्ति = वर्तन ] दुर्व्यसन नी वि . वाईट व्यसन , संवय लागलेला ; दुराचारी ; बदफैली . ( प्र . ) दुर्व्यसनी . दुर्व्रात्य वि . अतिशय दुष्ट ; व्रात्य ; खोडकर ; खट्याळ ; ( मुलगा अथवा त्यांचे आचरण ). [ दुर + व्रात्य = खोडकर , द्वाड ] दुर्हृद , दुर्हृदय वि . वाईट , दुष्ट मनाचा . [ दुर + सं . हृदु , हृदय = मन ] दुर्ज्ञेय वि . समजण्यास कठिण ; गूढ ; गहन . ही पद्धत कशी सुरु झाली असावी हे समजणे दुर्ज्ञेय आहे . - इमूं ७६ . [ दुर + सं . ज्ञेय = समजण्याजोगे ] दुःशक वि . करण्यास कठिण ; अशक्यप्राय . [ दुस + सं . शक = शकणे ] दुःशकुन पु . अपशकुन ; अनिष्टसूचक चिन्ह . [ दुस + शील ] दुश्चरित्र न . पापाचरण ; दुष्कृत्य . [ दुस + चरित्र ] दुश्चल वि . ( अक्षरशः व ल . ) पुढे जाण्यास , सरसावण्यास , चालण्यास कठिण . [ दु + सं . चल = चालणे ] दुश्चित , दुश्चीत वि . १ ( काव्य ) अयोग्य , चुकीचा , अपराधी ( माणूस , कृत्य ). अंगुष्ठ धरुनि मस्तकपर्यंत । अखंड दुश्चित आचरलो । २ खिन्न ; उदास ; दःखी . राजा प्रजा पिडी । क्षेत्रो दुश्चितासी तोडी । - तुगा २९८४ . [ सं . दुश्चित अप . ] दुश्चित्त वि . १ खिन्न ; दुर्मनस्क ; दुःखित ; उदास ; उद्विग्न . अबदुल्याची खबर ऐकतां मनांत झाले दुश्चित्त . - ऐपो १३२ . २ क्षुब्ध . परि कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयाते म्हणे परौती । - ज्ञा ६ . २३८ . [ दुस + चित्त = मन ] दुश्चिंत वि . ( काव्य ) खिन्न ; दुःखी ; उदास ; दुश्चित्त . अर्थ २ पहा . डोळे लावुनियां न होतो दुश्चिंत । तुझी परचीत माव होती । [ दुश्चित्त अप . ] दुश्चिन्ह न . अशुभ , वाईट लक्षण ; अपशकुन . दुश्चिन्हे उद्भवली क्षिती । दिवसा दिवाभीते बोभाति । [ दुस + चिन्ह ] दुश्शाप वाईट , उग्र , खडतर शाप . [ दुस + शाप ] दुश्शासन पुविना . दुर्योधनाचा भाऊ . - वि . व्यवस्था राखण्यास , अधिकार चालविण्यास कठिण . [ दुस + शासन = अधिकार चालविणे ] दुष्कर वि . १ करण्यास कठिण ; बिकट ; अवघड . म्हणोनि अभ्यासासि काही । सर्वथा दुष्कर नाही । - ज्ञा १२ . ११३ . २ दुष्परिणामकारक . - मोल . [ दुस + सं . कृ = करणे ] दुष्कर्म न . वाईट , पापी , दुष्टपणा़चे कृत्य ; कर्म . [ दुस + कर्म ] दुष्कर्मा , दुष्कर्मी पु . दुष्ट कृत्य करणारा ; पापी ; दुरात्मा . [ दुस + कर्मन ] दुष्काल पु . अतिवृष्टि किंवा अनावृष्टि होऊन पिके बुडून अन्नाची वाण पडते तो काळ ; दुकाळ ; महागाई . जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । कां भणगा दुष्काळु पाहला । - ज्ञा ११ . ४२८ . [ दुस + काल ] म्ह ० दुष्काळात तेरावा महिना = दुष्काळांत वर्षाचे बारा महिने काढतां काढताच मुश्किल पडते . अशा वेळी अधिक मास ( तेरावा महिना ) आला म्हणजे संकटांत भर पडते असा अर्थ . दुष्कीर्ति स्त्री . अपकीर्ति ; बदनामी ; बेअब्रू . [ दुस = कीर्ति ] दुष्कृत ति नस्त्री . १ पापकर्म ; वाईट कृत्य . आणि आचरण पाहतां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वाटां । - ज्ञा ९ . ४१६ . २ कृतींतील , वागणुकीतील दुष्टपणा . [ दुस + कृत - ति ] दुष्प्रतिग्रह पु . जो प्रतिग्रह ( दानाचा स्वीकार ) केला असतां , स्वीकारणारा अधोगतीस जातो ती ; निंद्य प्रतिग्रह ; अशुभप्रसंगी केलेले दान स्वीकारणे ; वाईट कृत्याबाबत स्वीकारलेले दान इ० उदा० . वैतरणी , शय्या , लोखंड , तेल , म्हैस हे दुष्प्रतिग्रह होत . [ दुस + सं . प्रतिग्रह = दान स्वीकारणे ] दुष्प्राप प्य वि . दुर्लभ ; मिळण्यास कठिण ; विरळा ; दुर्मिळ . [ दुस + सं . प्र + आप = मिळविणे ] दुस्तर वि . तरुन जाण्यास , पार पडण्यास कठिण . समुद्रापेक्षां हा संसार मला दुस्तर वाटतो . - न . ( ल . ) संकट . थोर वोढवले दुस्तर । तुटले सासुरे माहेर । - एरुस्व ८ . ५५ . [ दुस + सं . तृ = तरणे ] दुस्पर्श वि . स्पर्श करण्यास कठिण , अयोग्य . [ दुस + सं . स्पृश = स्पर्श करणे ] दुस्संग पु . दुष्टांची संगत ; कुसंगति . [ दुस + संग ] दुस्सह वि . सहन करण्यास कठिण ; असह्य . [ दुस + सं . तृ = तरणे ] दुस्सही वि . ( प्र . ) दुस्सह - स्सह अप ] दुस्साध्य वि . १ सिद्धीस नेण्यास , साधावयास कठिण . थोर वय झाल्यावर विद्या दुःसाध्य होते . २ बरा करण्यास कठिण ( रोग , रोगी ). आटोक्यांत आणण्यास कठिण ( शत्रु , अनिष्ट गोष्ट , संकट इ० ). [ दुस + सं . साध्य = साधण्यास सोपे ] दुस्स्वप्न न . १ अशुभसूचक स्वप्न . २ ( मनांतील ) कुतर्क , आशंका , विकल्प . [ दुस + स्वप्न ] दुस्स्वभाव पु . वाईट , दुष्ट स्वभाव . - वि . वाईट , दुष्ट स्वभावाचा . [ दुस + स्वभाव ] 
RANDOM WORD

Did you know?

ADHYAY 43 OF GURUCHARITRA IS WRONGLY PRINTED AND ADHYAY 47 AND 48 ARE SAME KINDLY CHANGE or make correction for it
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.