मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
वार संबंधाने विषघटीदोष

तिथी - वार संबंधाने विषघटीदोष

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


दररोजचा चंद्र ज्या नक्षत्रचक्रातून जात असतो, त्या प्रत्येक नक्षत्राच्या भोगाच्या कालास ‘ तिथी ’ ही संज्ञा आहे. या दररोजच्या तिथिकालात काही घटका अशा असतात की, त्या घटकांवर केलेल्या विवाहादी कृत्यांचे परिणाम चांगले न होऊ देणार्‍या घटका-वारांतही आहेतच. अशा प्रकारच्या घटकांत ‘ विषघटी ’ असे म्हणतात, व त्या प्रत्येक शुभप्रसंगी टाळाव्या असे ज्योति:शास्त्राचे मत आहे. या विषनाडीवर विवाहसंबंध घडला असता विवाहित कन्या तीन वर्षांच्या आत विधवा होते. व इतर मांगलिक कृत्ये या घटीवर झाली असतील, तर मृत्यू आणि दारिद्र्य या दोहोंची प्राप्ती होते, असे वसिष्ठाचे मत आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP