TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
वचनांचा अर्थ

वचनांचा अर्थ

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


वचनांचा अर्थ
या वचनांचे अर्थ क्रमाने येणेप्रमाणे :
( १ ) कन्या बुद्धिमान पुरुषास द्यावी.
( २ ) वर विद्वान असावा.
( ३ ) वरास बंधू असावे, त्याचे शील चांगले असावे, व तो चांगल्या लक्षणांनी युक्त असावा.
( ४ ) वराचे कुल, शील ( स्वभाव ), वय, रूप, विद्या, संपत्ती व त्याचे पोषण करण्यास कोणकोण मंडळी आहेत, याची परीक्षा पाहून नंतर कन्या द्यावी. इतर गोष्टींबद्दल चौकशी करण्याची जरूर नाही.
( ५ ) उन्मत्त, पतित म्हणजे धर्मबाह्य झालेले, कुष्ठरोगी नपुंसक, एकगोत्री, आंधळे, बहिरे, फ़ेफ़रे येणारे, वंदन करण्यास अयोग्य, दूर ठिकाणी राहणारे, मोक्षमार्गाचे अनुसरण करणारे, शूर व संसारातून निवृत्त झालेले, अशा पुरुषांस शहाण्याने कन्या देऊ नये.
( ६ ) वयाने वृद्ध, नीच, कुरूप अगर वाईट स्वभावाचा, अशा पुरुषास कन्या देणारा मनुष्य यास जिवंत म्हणण्यापेक्षा मेलेला असे म्हणावे.
( ७ ) अंगी गुण नसलेला, वृद्ध, अज्ञानी, दरिद्री, मूर्ख, रोगी, कुत्सित, अत्यंत रागीट, अत्यंत दुर्मुखलेला, पांगळा, अंगाचे भाग कमी असलेला, आंधळा, बहिरा, जड, मुका, नपुंसक, व महापातकाचे आचरण करणारा, अशा पुरुषास जो कोणी आपली कन्या देतो त्यास ब्रह्महत्येचा दोष लागतो.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:55:15.6570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

earned

  • = acquired 
RANDOM WORD

Did you know?

तीन रस्ते एकत्र येऊन मिळतात, त्या ठिकाणास काय म्हणतात
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.