वधूवरांच्या ‘ गुणां ’ ची तुलना

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


एकंदर गोष्टी : वधूवरांच्या ‘ गुणां ’ ची तुलना : या शास्त्रावरील ग्रंथात आणखीही अनेक गोष्टी पाहणे अगत्याचे असल्याविषयी सांगितले आहे, तथापि त्यांतल्या मुख्य गोष्टींचा मात्र संग्रह वर दर्शविल्याप्रमाणे केला आहे. प्रत्येक गोष्टीच्या फ़ळास ‘ गुण ’ असे म्हणतात, व लोकव्यवहारात वर व वधू यांचे ३६ गुण पाहावयाचे असतात हे प्रसिद्धच आहे. शास्त्रदृष्ट्या हे गुण पाहणे अगत्याचे म्हटले, तरी असे सर्व गुण सहसा केव्हाही जुळत नाहीत; व अशा प्रसंगी निरनिराळ्या दोषांचे बलाबल पाहून दोषांपेक्षा गुणांचे आधिक्य असले म्हणजे लग्ने ठरण्याचा योग येतो. अर्थात हे आधिक्य ठरविण्याचे काम जोशीबोवांचे असते, व ते त्यांजकडून निर्मळ बुद्धीने होत असणे इष्ट आहे. वधूचे गुण ठरविताना ते अर्थातच वरास लाभतील असेच असले पाहिजेत, व यासाठी वधूच्या पत्रिकेप्रमाणे वराची पत्रिकाही पूर्णपणे पाहिली पाहिजे. दोन्ही पत्रिका पाहण्याचा प्रकार एकच आहे, तथापि वराच्या संबंधाने आणखी निराळे ‘ कर्तरी ’ ( = शब्दश: कातर्‍या ) इत्यादी योग पाहावे लागतात. या योगांचा उल्लेख पुढे वरप्रकरणी करण्यात येईल.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP