मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा|
वधूंची निषिद्ध व ग्राह्य बाह्यलक्षणे

वधूंची निषिद्ध व ग्राह्य बाह्यलक्षणे

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


बाह्य लक्षणांपैकी ‘ निषिद्ध ’ कोणती व ‘ ग्राह्य ’ कोणती याबद्दल प्रयोग ग्रंथातून ‘ तनुलोमकेशदशन ’ इत्यादी मनुवचनांचा मोघम हवाला दिला आहे. मनुस्मृती अ. ३ येथे वचने पुढीलप्रमाणे आली आहेत:
नोद्वहेत्कपिलां कन्यां नाधिकाङ्गीं न रोगिणीम् ॥
नालोमिकां नातिलोमां न वाचाटां न पिंगलाम् ॥८॥
नर्क्षवृक्षनदीनाम्नीं नान्त्यपर्वतनामिकाम् ॥
न पक्ष्यहिप्रेष्यनाम्नीं न च भीषणनामिकाम् ॥९॥
[ नातिस्थूलां नातिकृशां न दीर्घां नातिवामनां ॥
वयोधिका नाङ्गहीनां न सेवत्कलहप्रियाम् ॥ ]
अव्यंगाङ्गीम सौम्यनाम्नीं हंसवारणगामिनीम् ॥
तनुलोमकेशदशनां मृद्वंगीमुद्वहेत्स्त्रियम् ॥१०॥
यस्यास्तु न भवेद् भ्राता न विज्ञायेत वा पिता ॥
नोपयच्छेत तां प्राज्ञ: पुत्रिकाधर्मशंकया ॥११॥
अर्थ : जी कन्या वर्णाने कपिल म्हणजे सोन्याप्रमाणे पिवळी असेल, अथवा अशा प्रकारचा जिन्या केशांचा वर्ण असेल; जिला ( सहावे बोट इत्यादी प्रकारचे ) जास्ती अंग असेल; जी असाध्य व्याधीने ग्रस्त असेल, जिच्या मस्तकावर केश आले नसतील, अगर ते आले असल्यास गळून गेले असतील; जिला फ़ारच केश असतील; जी कठोर शब्दांनी बडबड करणारी असेल; जिचे नेत्र रोगादिकांच्या कारणाने पिंगट वर्णाचे अथवा बुबुळे वर उचललेली अशा प्रकारचे असतील; जिला नक्षत्र, वृक्ष, नदी, चांडाळ, पर्वत, पक्षी, सर्प, दासी यांपैकी कोणतेही भयंकर नाव असेल; जी अंगाने अतिस्थूल अथवा अतिकृश असेल; जी अंगाने उंच काठीची असेल तर अगर फ़ार ठेंगणी असेल; जिचे वय वराच्या वयाहून अधिक असेल; जिचे ( हाताची बोटे कमी इत्यादी प्रकारे ) कमी अंग असेल; अथवा जी भांडखोर असेल, अशा कन्येस वरू नये. जिच्या अंगात काही व्यंग नाही; जिचे नाव सौम्य आहे; जिची लव अथवा केश जाड नाही; जिचे दात मोठे नाहीत; व जिचे अंग मृदू आहे, अशा स्त्रीस वरावे. जिला भाऊ नसेल, किंवा जिच्या पित्याचे नाव माहीत नसेल, ती पुत्रिका-धर्माची अनुसरणारी असेल अशा शंकेने तिच्याशी जाणत्या मनुष्याने विवाह करू नये.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP