मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ६५

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६५

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


सकल उचित कर्में करावीं । तेणें केलीं म्हणावी । अहंता फलाशा सांडावी । या नांव ईश्वरार्पण ॥७४६॥
ऐसिया भावना वर्ततां । दोष न घडे सर्वथा । सकल कर्में त्यासी अर्पितां । लेप न लागे आपणां ॥७४७॥
कामक्रोधाभिमान । हे कोणाही न सुटले जाण । परि तेही करितां ईश्वरार्पण । हतबल होऊनि राहती ॥७४८॥
कामना विषयांची टाकावी । ईश्वराची मनीं धरावी । तेणें निष्कामता पावावी । ऐसी कृपा तयाची ॥७४९॥
काम सकळांते छळी । परी ईश्वरासन्निध होय निर्वळी । भक्त होऊनि पायांतळी । वास करी तयाच्या ॥७५०॥
म्हणोनि कामना जरी झाली । तरी ईश्वराचीच पाहिजे केली । क्रोधाची उर्मी जरी आली । तरी ते अर्पावी तयासी॥७५१॥
जग सर्व ईश्वराधीन । त्यावरी कोपावें काय कारण । क्रोधासीही अधिष्ठान । तयाचेंचि कल्पावें ॥७५२॥
तयावरी कोप करितां । त्याचेंचि अनुसंधान जडतां । तोचि कल्याणकारक तत्वंता । होय जाणा निश्चयें ॥७५३॥
हिरण्यकश्यपु हिरण्याक्ष । त्यावरी कोपले कंसादिक । परि सायुज्य मुक्ति पावले देख । अखंड अनुसंधानें तयाच्या ॥७५४॥
तयांचा कोप अनावर । अंगीं जडोनि राहिला थोर । जन्मांतरींचें साधिलें वैर । अंतीं गति मोक्षाची ॥७५५॥
तैसा चिही तो अभिमान । आणिक सकळ दोषगुण । तयासी अर्पण करितां क्षण । लया जाती संपूर्ण ॥७५६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP