मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ५१

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५१

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


भगवत्प्रेम अनिर्वचनीय । तयाचें वर्णन करावें काय । बोलों जातांही बोलों नये । तेंचि स्वरूप तयाचें ॥५२९॥
नये बोलतां सांगतां । तयाचें चिन्ह नये दावितां । नये हातें घेतां देतां । अनुवादितां कवणाही ॥५३०॥
वर्णनासी विषय होय । तरी तें द्वैताश्रित होऊनि ठाय । अद्वैत समाधानाची सोय । लाभे तेथ अनुभवें ॥५३१॥
प्रेम तेंचि परब्रम्ह । ब्रह्म तेंचि परमप्रेम । प्रेम आणि परब्रम्ह । एके ठायीं निवासु ॥५३२॥
प्रेम कशानें भंगेना । शस्त्रादिकी तुटेना । जळामाजी बुडेना । वन्हि दाहक नव्हे तया ॥५३३॥
विषयांचे प्रेम सकाम । भगवत्प्रेम तें निष्काम । स्वानिभवें आत्माराम । पदवी पाववी निश्चित ॥५३४॥
विषयप्रेम नाशिवंत । जीवांचा नित्य करी घात । भगवत्प्रेम अविरत । शाश्वत सुखासी पाववी ॥५३५॥
द्वैतसंबंधी विषयप्रेम । होय आत्मयासी श्रम । सकल प्रपंचाचा होय विराम । तें भगवत्प्रेम वोलिलें ॥५३६॥
सर्वोतर्यामीं श्रीहरी । नित्य सुखरूप चराचरी । नांदुनि राहिला आंत बाहेरी । अनुभवरूपें प्रत्यक्ष ॥५३७॥
त्याचें वर्णन काय करावें । अनुभव घेऊन पाहावें । अनुभवितां होऊनि जावें । तेंचि स्वयें आपण ॥५३८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP