मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ३०

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३०

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


भक्तिज्ञानासी नव्हे भेद । दोन्ही नांदती अभेद । साध्य साधनादि संबध । यथार्थ स्वरूपीं उरेना ॥३०४॥
कां जे भक्ति तेंची ज्ञान । ज्ञानेचि भक्ति संपूर्ण । एकमेकांते शोभवून । नांदती अनादि एकपणें ॥३०५॥
शर्करेविरहित गोडी नाहीं । गोडीवाचूंन शर्करा नाहीं । शर्करा गोडी एके ठायीं । अव्यभिचारें नांदती ॥३०६॥
जे शर्करा तीच गोडी । गोडी तेचि शर्करा फुडी । व्यक्त अव्यक्त परवडी । एकरूपणें ॥३०७॥
तैसा ज्ञानरूप परमात्मा । भक्ति तरी त्याचीच प्रतिमा । भेदाभेदाची झाली सीमा । एक आत्मरूप सकळ ॥३०८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP